पेटीएम यूपीआय लाईट 10 बँकांत सुरू7
पेटीएम यूपीआय लाईट 10 बँकांत सुरू
भारताच्या स्वदेशी पेटीएम पेमेंट्स बँकने आपल्या पेटीएम यूपीआय लाईटद्वारे सुनिश्चित वेळेत एकाच टिचकीवर वेगवान यूपीआय पेमेंट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. व्यवहाराची गडबड असताना बँकाना यशस्वी देवाण-घेवाणीत समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र अशा स्थितीतही या पर्यायाच्या माध्यमातून करण्यात आलेले पेमेंट अयशस्वी ठरणार नाही.
सध्या पेटीएम यूपीआय लाईट’ला 10 बँकांचे पाठबळ असून त्यात पेटीएम पेमेंट्स बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकचा समावेश आहे.
पेटीएम यूपीआय लाईटद्वारे करण्यात आलेल्या व्यवहारांचा सक्सेस रेट आणखी सुधारणार असून त्यामुळे छोट्या रकमेच्या पेमेंटकरिता बँक प्रणालीवर पडणारा ताण हलका करण्याच्या अनुषंगाने याचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. याला यशस्वी पेमेंटसाठी नवीन यूपीआय लाईट टेक्नॉलॉजीचे पाठबळ असून 3-स्तरीय बँक-दर्जाचे संरक्षण उपलब्ध आहे.
Comments
Post a Comment