पीएनजी ज्वेलर्सच्या ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून पुन्हा एकदा माधुरी दीक्षित
पीएनजी ज्वेलर्सच्या ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून पुन्हा एकदा माधुरी दीक्षित
मुंबई 20 मार्च 2023 : भारतातील आघाडीच्या ज्वेलरी ब्रँडपैकी एक असलेल्या 'पीएनजी ज्वेलर्स'ने माधुरी दीक्षितला पुढील दोन वर्षांसाठी 'ब्रँड अॅम्बेसिडर' म्हणून निवड केल्याची घोषणा केली आहे. प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित जागतिक स्तरावर आणि भारतभर या ब्रँडचे प्रतिनिधित्व करेल. माधुरी दीक्षित यापूर्वी दोन वर्षांच्या कालावधीसाठी 'पीएनजी ज्वेलर्स' या ब्रँडच्या 'ब्रँड अॅम्बेसिडर' होत्या.
'पीएनजी ज्वेलर्स' जवळपास गेल्या दोन शतकांपासून उत्कृष्ट दागिन्यांची निर्मिती करत असून भारत, अमेरिका आणि यूएईमध्ये या ब्रँडची ३६ दालने आहेत. नववधूचे दागिने, सोन्याचे दागिने, नैसर्गिक हिर्यांचे दागिने आणि चांदीच्या दागिन्यांच्या कलेक्शनची विस्तृत श्रेणी येथे उपलब्ध असते.
माधुरी दीक्षित 'पीएनजी ज्वेलर्स'च्या आगामी जाहिरात मोहीम, सोशल मीडिया कंटेंट आणि गुढीपाडव्याच्या मोहिमेपासून सुरू होणार्या इतर ब्रँड प्रमोशनल उपक्रमांमध्ये पाहायला मिळणार आहे.
'पीएनजी ज्वेलर्स'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, "माधुरी दीक्षित 'पीएनजी ज्वेलर्स'च्या ब्रँड अॅम्बेसिडर झाल्याने आम्हाला आनंद होत आहे आणि पुढील दोन वर्षांमध्ये त्यांच्यासोबत काम करण्यास आम्ही उत्सुक आहोत. माधुरीसोबतचा ब्रँडचा सहयोग खूप आधीपासूनचा असून त्या आणि त्यांचे कुटुंबीय अनेक वर्षांपासून आमचे ग्राहकदेखील आहेत. त्यांची लोकप्रियता आणि लोकांचे मनातील त्यांचे स्थान दृढ आहे. त्यांची मूल्ये आमच्या ब्रँडशी सुसंगत अशीच आहेत. या सहयोगामुळे आम्हाला आमच्या ब्रँडची प्रतिमा आणि भारतीय आणि जागतिक स्तरावरील अलंकार बाजारपेठेत आमचे स्थान अधिक मजबूत करण्यास मदत करेल. विस्ताराच्या पुढच्या टप्प्यात जात असताना आमच्या परिसंस्थेमध्ये त्यांची उपस्थिती ही महत्त्वाची असणार आहे. 'पीएनजी ज्वेलर्स' पुढील आर्थिक वर्षात आणखी किमान ५ दालने सुरू करणार आहे."
माधुरी दीक्षित म्हणाल्या, कलाकुसर, परंपरा आणि "अभिजातता यांच्याशी सुसंगत असलेल्या 'पीएनजी ज्वेलर्स' या ब्रँडसोबत जोडल्याचा मला अभिमान आहे. मला नेहमीच 'पीएनजी ज्वेलर्स'च्या अप्रतिम अशा दागिन्यांच्या कलेक्शनचे आकर्षण राहिले आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्या पुढील प्रवासातील एक भाग होण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. ब्रँडचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आणि 'पीएनजी ज्वेलर्स'च्या जगभरातील ग्राहकांसोबत जोडण्यासाठी मी सज्ज आहे!"
Comments
Post a Comment