न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स’च्या वतीने अत्याधुनिक स्वरूपाची प्रादेशिक संदर्भ प्रयोगशाळा आणि सर्वोत्तम ऑन्कोपॅथोलॉजी केंद्राचे उदघाटन
न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स’च्या वतीने अत्याधुनिक स्वरूपाची प्रादेशिक संदर्भ प्रयोगशाळा आणि सर्वोत्तम ऑन्कोपॅथोलॉजी केंद्राचे उदघाटन
मुंबई, न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स ही भारतामधील सर्वोच्च ४ पॅथॉलॉजी लॅबोरेटरी शृंखलांपैकी एक असून २०० हून अधिक प्रयोगशाळा (लॅबोरेटरीज) आणि २००० पेक्षा अधिक संग्रह केंद्र (कलेक्शन सेंटर) सह भारत, दक्षिण आफ्रिका, यूएई आणि अमेरिकेत अस्तित्वात असून मुंबईतील दहिसर, चेंबूर आणि विद्याविहार येथे तीन प्रादेशिक संदर्भ प्रयोगशाळा आणि सर्वोत्तम ऑन्कोपॅथोलॉजी केंद्र लॉन्च करण्यात आले. प्रयोगशाळांचे उदघाटन माननीय उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. जीएसके वेळू; न्यूबर्ग अजय शहा लॅबोरेटरीज’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शहा; न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स तांत्रिक संचालक डॉ राजेश बेंद्रे; न्यूबर्ग ऑन्कोपॅथ’चे अध्यक्ष आणि प्रमुख डॉ. जय मेहता उपस्थित होते.
न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स’ने दहिसर येथे लॅबोरेटरी सुरू करण्यासाठी एक जुने आणि अग्रगण्य वैद्यकीय निदान संपर्कजाळे डॉ अजय शहा समवेत भागीदारी केली असून चेंबूरमध्ये मोठी एकल संदर्भ प्रयोगशाळा (स्टँडअलोन रेफरन्स लॅब) ची उभारणी केली आहे. दहिसर आणि चेंबूर येथील नवीन प्रयोगशाळा विस्तृत प्रकारच्या चाचण्यांची प्रक्रिया करण्यासाठी सज्ज असून दिवसाला सुमारे ५००० नमुने हातळण्याची त्यांची क्षमता आहे. या प्रयोगशाळा सर्वोत्तम गुणवत्ता राखत सुनिश्चित वेळेत निदान परिणाम उपलब्ध करून देतात. त्याशिवाय, प्रयोगशाळांना संपूर्ण लॅब मेडिसन टेस्ट मेन्यूचा एक्सेस असून ६००० पेक्षा अधिक निदानांत नियमित तपासण्या आणि प्रगत तपासण्या, ज्यामध्ये जेनॉमिक्स, प्रोटीओमिक्स, मेटाबोलोमिक्स, ऑन्कोपॅथोलॉजी, ट्रान्सप्लांट इम्युनोलॉजी, न्यूबॉर्न स्क्रिनिंग, इत्यादीची सोय आहे. या सुविधांचा लाभ मुंबईसह महाराष्ट्रातील् आसपासच्या जिल्ह्यांना होईल. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या, घरी जाऊन नमुना गोळा करणे, विशेष प्रकारच्या रक्त चाचण्यांचा लाभ लोक घेऊ शकतात. घरी भेट देणे, नोंदणी आणि अन्य सेवांसाठी आमच्याकडे ९७००३६९७०० या टोल-फ्रि क्रमांकावर सेवा चौकशी करा. निदान केंद्रांची एकूण २५ संग्रह केंद्रे आहेत आणि आगामी वर्षात १०० संग्रह केंद्रे सुरू करण्याची योजना आहे.
न्यूबर्ग अजय शाह लॅबोरेटरी’चे भागीदार, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह म्हणाले, "दहिसरमध्ये उच्च दर्जाच्या पॅथॉलॉजी सेवा आणण्यासाठी न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स’सोबत भागीदारीचा मला अभिमान वाटतो. या संयुक्त उपक्रमामुळे भागातील लोकांना सर्वोत्तम पॅथॉलॉजी चाचणी सेवा उपलब्ध होतील याची खात्री वाटते." चेंबूर येथील न्यूबर्ग रेफरन्स लॅबोरेटरी’चे तांत्रिक संचालक डॉ राजेश बेंद्रे म्हणाले, "मुंबईतील जागतिक दर्जाच्या ग्राहक सेवेला आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. डॉक्टरांना अचूक, विश्वासार्ह निदान उपलब्ध करून देणे आणि ते थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हे आमचे मुख्य लक्ष्य आहे. आमची वैयक्तिक प्रतिबद्धता आणि स्मार्ट रिपोर्ट वापरकर्ता- स्नेही पद्धतीने विश्लेषणास मदत करतात.” कंपनीने विद्याविहार येथे न्यूबर्ग ऑन्कोपॅथॉलॉजी रेफरन्स लॅबोरेटरी ची स्थापना स्थापन केली असून हे उत्कृष्ट केंद्र तसेच ऑन्कोपॅथॉलॉजीसाठी अत्याधुनिक सेकंड ओपिनियन लॅबोरेटरी आहे. हे केंद्र अनुभवी ऑन्कोपॅथॉलॉजिस्ट आणि जेनेटीसिस्टसह प्रगत कर्करोग विषयक निदानाचा मार्ग मोकळा करेल आणि देशभरातील कर्करोग तज्ज्ञांना उत्तम निदान अंतर्दृष्टी वितरीत करण्यासाठी आणि कर्करोग रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्व आधुनिक तंत्रज्ञान आणि तांत्रिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल.
Comments
Post a Comment