सोनी सबवरील मालिका ‘अलिबाबा - एक अंदाज अनदेखा: चॅप्‍टर २’मध्‍ये पुन्‍हा पाहायला मिळणार सिमसिम

सोनी सबवरील मालिका ‘अलिबाबा - एक अंदाज अनदेखा:

चॅप्‍टर २’मध्‍ये पुन्‍हा पाहायला मिळणार सिमसिम 

सोनी सबच्या अलीबाबावर सिमसिमच्या भूमिकेत सायंतानी घोष - एक अंदाज अंधेखा (1)

‘अलिबाबा - एक अंदाज अनदेखा: चॅप्‍टर २’ ही सोनी सबवरील कौटुंबिक एंटरनेटर आहे, जी अलीच्‍या (अभिषेक निगम) अनेक साहसी कृत्‍यांना सादर करते. या मालिकेने लक्षवधेक कथानक व अनोख्‍या पात्रांसह प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. नुकतेच, प्रेक्षकांना पाहायला मिळाले की मरजीना (मनुल चुडासामा) मस्‍तक नसलेल्‍या महिलेच्‍या तावडीतून अलीची सुटका करण्‍यासाठी तलवारीसह लढाई करते. 

पुढील काही एपिसोड्समध्‍ये सिमसिम (सयंतनी घोष) राखेमधून फिनिक्‍सप्रमाणे पुन्‍हा उदयास येताना पाहायला मिळणार आहे. अलीने पिरॅमिडमध्‍ये बंदिस्‍त केल्‍यानंतर सिमसिम दिसेनासी झाली होती आणि तिच्‍याबाबत काही ऐकण्‍यात देखील आले नव्‍हते. पण चोरांना मेरिद दिसते तेव्‍हा सिमसिम बॉटलमध्‍ये बंदिस्‍त असल्‍याचे समजते. मेदिरच्‍या मदतीने सिमसिम बॉटलमधून बाहेर पडते आणि अलीचा सूड घेण्‍याचे षडयंत्र रचण्‍यास सुरूवात करते. सिमसिमची पुढील योजना काय असेल?

सिमसिम पुन्‍हा आल्‍याने अलीसाठी संकट निर्माण होईल का? 

सिमसिमची भूमिका साकारणारी सयंतनी घोष म्‍हणाली, ‘‘सिमसिम व अली यांच्‍यामध्‍ये नेहमीच मतभेद राहिले आहेत. एकमेकांना पराभूत करत विजयाचा आनंद घेण्‍याचे त्‍यांचे ध्‍येय आहे. मला वाटते की, मालिकेमध्‍ये सिमसिम व अली एकमेकांचे शत्रू असले तरी त्‍यांचे एकमेकाशिवाय अस्तित्‍व नाही. सिमसिमला बंदिस्‍त करण्‍यात आल्‍यानंतर अलीने अत्‍यंत प्रतिकूल आव्‍हानांचा सामना केलेला नाही. पण, अखेर ती बॉटलमधून बाहेर येते तेव्‍हा त्‍यांच्‍यामध्‍ये पुन्‍हा एकदा आमना-सामना होणार आहे. प्रेक्षक अली व सिमसिम यांच्‍यामधील आमना-सामना पाहण्‍यास उत्‍सुक होते आणि आता त्‍यांना त्‍यांच्‍यामधील साहसी कृत्‍ये पाहायला मिळणार आहेत.’’ 


Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE