डीएसपी म्युच्युअल फंडाने महिलांसाठी सुरू केली खास हॉटलाइन
डीएसपी म्युच्युअल फंडाने महिलांसाठी सुरू केली खास हॉटलाइन
स्त्रिया पुरुषांपेक्षा वेगळ्या
पद्धतीने विचार करतात आणि पैशांबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांच्या
आत्मविश्वासाच्या पातळीचा विचार करता त्यांना आधारित त्यांना अधिक वैयक्तिक
मार्गदर्शनाची आवश्यकता भासू शकते. युगोव्ह या संशोधन भागीदार संस्थेच्या
सहकार्याने तयार करण्यात आलेल्या डीएसपी विन्वेस्टर पल्स २०२२ अभ्यास अहवालानुसार
३ पैकी जवळपास २ पुरुष (६५%) गुंतवणूकीचे निर्णय मोठ्या प्रमाणावर स्वतंत्रपणे
घेतात परंतु महिलांचे हे प्रमाण खूपच कमी(४४%)आहे . अभ्यासात असेही आढळून आले की
स्त्रियांच्या तुलनेत पुरुष (४०%) जास्त प्रमाणात (२७%) पूर्णपणे स्वतंत्र
गुंतवणूक निर्णय(व्यावसायिक सल्लागाराचा सल्ला न घेता) घेतात.
आंतरराष्ट्रीय महिला
दिनानिमित्त जगभरातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील
महिलांच्या कामगिरीचा सन्मान केला जातो. करत त्याच बरोबर नवीन जगात लैंगिक समानता
प्राप्त करण्याच्या प्रयत्नांना गती देण्याचे स्मरणहि यानिमित्ताने केले जाते.
याचा अर्थ आर्थिक समानता आणि सक्षमीकरणाला देखील बळकटी देण्यात येते.
महिलांच्यादृष्टीने हा सर्व महत्वपूर्ण संवाद साधने सुरु असतांनाच आता ही नवीन
हॉटलाइन डीएसपीच्या दशकाहून अधिक जुन्या प्रवासातील आणखी एक नवे पाऊल आहे. ज्या
माध्यमातून महिलांना गुंतवणुकीच्या निर्णयात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले
जाते.
Comments
Post a Comment