खर्चिक, कटकटीची आणि त्रासदायक असलेली यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे कितपत योग्य आहे ?

 खर्चिक, कटकटीची आणि त्रासदायक असलेली यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे कितपत योग्य आहे ? 


प्राध्यापक, डॉ.टॉम चेरियन,  यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पीटल आणि संस्थापक, साऊथ एशियन लिव्हर इन्स्टीट्यूट


मुंबई १८ एप्रिल २०२३ :- यकृत हा शरीरातील सगळ्यात मोठा भाग असतो. यकृत हे तुम्हाला संसर्गापासून दूर ठेवते आणि रक्त शुद्ध करण्याचेही काम करते.  यकृतामुळे खाल्लेले अन्न पचन होण्यास मदत होते आणि त्यातून मिळणारी उर्जा  शरीराला वापरण्यासाठी साठवून ठेवण्यासही यकृत मदत करते. यकृताची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. जर यकृत नीटपणे काम करत नसेल तर त्रास व्हायला सुरुवात होते. यकृताने काम करणे पूर्णपणे बंद केले तर प्राण जाण्याची शक्यता असते. 


यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमध्ये काम करत नसलेले यकृत काढून त्याजागी चांगले यकृत बसवण्यात येते. यकृत प्रत्यारोपणानंतर रुग्ण किमान 1 वर्ष जगण्याची शक्यता ही 90 टक्के इतकी असते. जगभरातील हजारो लोकांना यकृत प्रत्यारोपणामुळे फायदा होत असतो. मात्र ही शस्त्रक्रिया खर्चिीक असते,  तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे असते आणि या शस्त्रक्रियेनंतर बरे होण्याता कालावधीही बराच असतो. प्राध्याक टॉम चेरिअन- यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पीटल यांनी यकृत प्रत्यारोपणाचा पर्याय हा सगळ्यात शेवटी अवलंबा असं सांगतात. यकृताची मोठी हानी झाली असेल,  ते आपले नियमित कार्य करू शकत नसेल  तेव्हाच हा मार्ग स्वीकारावा असं ते म्हणतात. नियमित कार्य करू शकत नसल्यास वैद्यकीय भाषेत त्याला सिऱ्हॉसिस म्हणतात. यकृत पूर्णपणे काम बंद करणार असल्याची वेळ जेव्हा येते तेव्हा त्याला end-stage liver disease म्हणतात. यातून बाहेर येण्यासाठीची शस्त्रक्रिया ही खर्चिक असते. 


यकृतानं काम बंद केल्यानंतर त्या रुग्णला जगवण्यासाठी एकच मार्ग उरतो तो म्हणजे यकृत प्रत्यारोपणाचा. याच कारणामुळे युनायडेट किंगडममध्ये सरकारी आरोग्य यंत्रणेद्वारे वर्षाला किमान 1 हजार यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. अमेरिकेमध्ये हीच संख्या 5 हजाराच्या आसपास आहे.  यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ही आता सामान्य बाब झाली असली तरी ही शस्त्रक्रिया ही एक मोठी शस्त्रक्रिया असते. यातील सगळ्यात मोठी चिंतेची बाब असते ती म्हणजे शरीर नवे यकृत न स्वीकारण्याची शक्यता असते.  असे होऊ नये यासाठी तुम्हाला उरलेले आयुष्य  औषधे घ्यावी लागतात आणि प्रतिरोधक शक्ती प्रबळ होऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागतात. अवयव दान करणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेले यकृत आणि यकृत प्रत्यारोपण करावे लागणाऱ्यांची संख्या ही जास्त  आहे. यकृताची उपलब्धता कमी असून मागणी जास्त आहे. भारतामध्ये साधारणपणे 1700 ते 2000 यकृत प्रत्यारोपणे केली जातात. मात्र यकृत प्रत्यारोपणाची गरज असलेल्यांची संख्या ही 29,000 -35,000 च्या घरात आहे. यकृत प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांची संख्या कमी करायची असेल तर त्यासाठी हयात असलेल्या व्यक्तीच्या यकृताचा वापर करून यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे. यामध्ये हयात असलेल्या व्यक्तीच्या इच्छेने त्याच्या यकृताचा तुकडा घेतला जातो आणि तो प्रत्यारोपित केला जातो. कारण यकृताचा तुकडा जरी कापला तरी त्याची पुन्हा वाढ होत असते. म्हणजेच दाता आणि रुग्ण यांचे यकृत काळानुसार पूर्ववत होण्यास मदत होत असते. 


यकृत खराब का होतं इथे हे देखील समजून घेणे गरजेचे आहे. याला विविध गोष्टी कारणीभूत ठरतात. आजारपणा, संसर्गाची लागण, दारूसारखी विषारी द्रव्ये यामुळे यकृत खराब होत असतं. या बाबींमुळे जर एखाद्याचे यकृत पूर्णपणे खराब झाले असेल तर ते बदलण्याची गरज असते. यकृतातील पेशींना झालेल्या संसर्गामुळे हेपेटायटीस होतो ज्यामुळे यकृत खराब होण्याची भीती असते. हेपेटायटीसचेही प्रकार असतात उदा. A, B, C, D, आणि E टाईप हेपेटायटीस. या हेपेटायटीसचा परिणाम यकृतावर होत असतो.  ऑटोइम्युन हेपेटायटीसमध्ये शरीराची प्रतिकार शक्ती ही यकृताच्या पेशी ओळखण्यात असमर्थ ठरते ज्यामुळे या पेशींची हानी व्हायला लागते. यामुळे जळजळीचा त्रास होतो आणि यकृताचा इजा देखील होते. दारू न पिणाऱ्या व्यक्तींमध्येही फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होते. यामध्ये यकृताच्या आतील बाजूला चरबीचे थर जमा व्हायला सुरूवात होते. सर्वसाधारणपणे मधुमेह आणि लठ्ठपणाची समस्या असलेल्यां व्यक्तींमध्ये ही समस्या उद्भवू शकते. कधीकधी अशीही परिस्थिती येते जेव्हा यकृत कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय खराब होतं. यामध्ये रुग्णाला हेपेटायटीसही झालेला नसतो किंवा इतर समस्याही नसतात तरीही त्याचे यकृत खराब झालेले असते. याला क्रिप्टोजेनिक सिऱ्हॉसिस म्हणतात. यकृत प्रत्यारोपण कराव्या लागणाऱ्या रुग्णांमध्ये अशा रुग्णांचे प्रमाण हे 20 टक्के इतके आहे. लहान मुलांमध्ये यकृतातील पित्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना इजा झाली, त्यात अडथळे निर्माण झाले तर त्यांनाही यकृत प्रत्यारोपण करण्याची गरज भासू शकते.


यकृत प्रत्यारोपण केव्हा करावे हे तुम्हा तज्ज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतरच कळू शकेल. मात्र तुमचे यकृत खराब झाल्याचे काही संकेत तुम्हाला मिळत असतात उदाहरणार्थ त्वचा किंवा डोळे पिवळे होणे, कावीळ होणे, थकवा जाणवणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, अशक्तपणा, खाज येणे, पटकन रक्तस्त्राव होणे,पोट फुगणे, शौचावाटे रक्त जाणे, गोष्टी लक्षात न राहणे हे त्यातील काही संकेत आहेत. 

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE