बिर्ला इस्टेट्सतर्फे मलबार हिल मधील वाळकेश्वर येथे आलिशान निवासी प्रकल्पासाठी प्रीमियम जमिनीचे संपादन
बिर्ला इस्टेट्सतर्फे मलबार हिल मधील वाळकेश्वर येथे
आलिशान निवासी प्रकल्पासाठी प्रीमियम जमिनीचे संपादन
वाळकेश्वर येथील सुपर लक्झरी निवासस्थानांमध्ये ६०० कोटी रुपयांपेक्षा
जास्त उत्पन्नाची क्षमता
मुंबई: २४/०४/२३ : सेंच्युरी टेक्सटाइल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड अंतर्गत असलेल्या आदित्य बिर्ला समूहाची बांधकाम व्यवसाय शाखा बिर्ला इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेडने दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथील वाळकेश्वर येथील उच्चभ्रू निवासी भागात प्राइम जमीन संपादन केल्याचे आज जाहीर केले. या लक्झरी प्रकल्पाची ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नाची क्षमता असेल.
वरळीतील बिर्ला नियारा च्या अलिकडच्या यशानंतर, बिर्ला इस्टेट्स मुंबईच्या सर्वाधिक उच्चभ्रू भागांपैकी एक असलेल्या ठिकाणी बुटीक निवासस्थाने सादर करून सुपर लक्झरी रिअल इस्टेट मार्केटमध्ये प्रवेश करण्यास सज्ज आहे. दक्षिण मुंबईतील हा नवीन प्रकल्प सहज कनेक्टिव्हिटी आणि प्रमुख मनोरंजन, रिटेल आणि व्यवसाय तसेच शहरातील हॉटस्पॉट्समध्ये सहज अॅक्सेस प्रदान करतो.
बिर्ला इस्टेट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. के टी जितेंद्रन म्हणाले, "वाळकेश्वरमधील जमिनीच्या या मुख्य भूखंडाचे संपादन हा बिर्ला इस्टेट्ससाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. याचे कारण लक्झरी गृहनिर्माण विभागामध्ये विशेष स्थान निर्माण करण्याच्या आमच्या दीर्घकालीन विकास धोरणाशी हे एकदम सुसंगत आहे. दक्षिण मुंबईतील सर्वात जास्त मागणी असलेल्या ठिकाणांपैकी एक अशा या ठिकाणी बीस्पोक बुटीक निवास निर्माण करण्याच्या संधीबद्दल आम्ही उत्साहित आहोत. हा प्रकल्प निःसंशयपणे शहरातील लक्झरी राहणीमानासाठी एक नवीन मापदंड प्रस्थापित करेल आणि आमच्या चोखंदळ ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त जागतिक दर्जाचा विकास सादर करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत."
सेंच्युरी टेक्सटाइल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड (CTIL) चे प्रमुख विकास इंजिन असलेल्या बिर्ला इस्टेट्सचे सध्या देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये अनेक प्रकल्प आहेत. या नवीनतम संपादनासह, कंपनी आधुनिक गृहखरेदीदारांना जागतिक दर्जाच्या सुविधा आणि अतुलनीय समुद्र देखाव्यासह अत्युत्तम राहणीमानाचा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.
Comments
Post a Comment