आजच्या तरुणांमध्ये स्वामी विवेकानंदां सारखा माणूस घडवा:राज्यपाल
नमस्कार
आजच्या तरुणांमध्ये स्वामी विवेकानंदां सारखा माणूस घडवा:राज्यपाल
मुंबई: रामकृष्ण मिशन हे धर्मनिरपेक्षतेचे जिवंत उदाहरण आहे. आजच्या तरुणांमध्ये स्वामी विवेकानंदांचा माणूस घडवण्याचा, चारित्र्य घडवण्याचा संदेश देण्यासाठी रामकृष्ण मिशनने आपले प्रयत्न अधिक तीव्र करण्याचे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी रामकृष्ण मिशनच्या कार्यक्रमात केले.
विवेकानंदांचे हे स्वप्न साकार करायचे असल्यास काम करण्याच्या वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला कौशल्य शिक्षण मिळाले पाहिजे. शासन व विद्यापीठे युवकांना कौशल्य शिक्षण देत असताना रामकृष्ण मिशनसारख्या संस्थांनी नीतीमूल्यांच्या माध्यमातून युवकांचे चारित्र्य घडविण्याचे कार्य करावे. या दृष्टीने राज्यातील विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांनी रामकृष्ण मिशनसोबत काम करावे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केली.
रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन, मुंबई शाखेच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षाचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी रंगशारदा सभागृह, वांद्रे येथे पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रामकृष्ण मिशन, बेलूर मठ येथील उपाध्यक्ष स्वामी गौतमानंद, महासचिव स्वामी सुविरानंद, मुंबई मठाचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद, नरेंद्रपूर केंद्राचेnsप्रमुख स्वामी सर्वलोकानंद, व्यवस्थापन समितीचे सदस्य राकेश पुरी तसेच देश- विदेशातील रामकृष्ण मिशन शाखांचे प्रमुख उपस्थित होते.
मुंबई मठाचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद महाराज यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ८५० आसन क्षमता असलेलेलसभागृह यावेळी खचाखच भरलेले होते. त्यांनी विशेष उल्लेख केला की माननीय राज्यपालांचे मी खूप आभारी आहे ज्यांनी या सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारले आणि खूप व्यस्त वेळापत्रक असूनही ते आले.
आदिवासींसाठी केलेल्या कार्याचे कौतुक: रामकृष्ण मिशन, मुंबईने खार येथील अद्ययावत हॉस्पिटलच्या तसेच पालघर जिल्ह्यातील साकवार येथे आदिवासी बांधवांसाठी ग्रामविकास व कल्याण केंद्राच्या माध्यमातून मोठे कार्य उभे केले आहे, असे सांगून राज्यपालांनी मुंबई रामकृष्ण मिशनला कौतुकाची थाप दिली. यावेळी मठातील पदाधिकारी आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment