रसनाचे निर्माते, दिग्गज उद्योगपती दिवंगत आरीस पिरोजशॉ खंबाटा यांना मरणोत्तर ‘पद्मश्री' पुरस्कार प्रदान
रसनाचे निर्माते, दिग्गज उद्योगपती दिवंगत आरीस पिरोजशॉ खंबाटा यांना मरणोत्तर ‘पद्मश्री' पुरस्कार प्रदान
मुंबई, 14 एप्रिल, 2023: रसना ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष दिवंगत आरीस पिरोजशॉ खंबाटा यांना गुजरात राज्यातील व्यापार आणि उद्योगातील त्यांच्या कार्याबद्दल पद्मश्री (मरणोत्तर) 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेला हा पुरस्कार खंबाटा यांच्या राष्ट्र उभारणीसाठी दीर्घकाळ केलेल्या कार्याची दखल घेऊन दिला गेला. हा पुरस्कार खंबाटा यांच्या वतीने त्यांची पत्नी श्रीमती पर्सिस आरीस खंबाटा आणि मुलगा पिरुझ आरीस खंबाटा यांनी स्वीकारला.
असा सन्मान मिळवणारे खंबाटा हे अहमदाबादचे पहिले पारशी आहेत. त्यांनी मूळ स्टार्टअप, “मेड इन इंडिया” कंपनीची स्थापना केली, जिने आपल्या दर्जाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जिंकली आहे. आज रसना इंटरनॅशनल ही जगातील सर्वात मोठी इन्स्टंट ड्रिंक आणि बेव्हरेजेस उत्पादक म्हणून ओळखली जाते. भारतात 80% बाजारपेठेत वाटा रसनाचा आहे.
राष्ट्र उभारणीच्या भावनेने खंबाटा यांनी विविध रुपाने सेवा केली आहे.
Comments
Post a Comment