भारताच्या पिकअप सेगमेंट मध्ये महिंद्राची ऑल न्यू बोलेरो मॅक्सएक्स पिक-अप रेंज दाखल; ७.८५ लाख रुपयांपासून सुरू
भारताच्या पिकअप सेगमेंट मध्ये महिंद्राची ऑल न्यू बोलेरो मॅक्सएक्स पिक-अप रेंज दाखल; ७.८५ लाख रुपयांपासून सुरू
· अविश्वसनीय किंमतीत अभूतपूर्व वैशिष्ट्ये आणि कामगिरी सादर करण्यासाठी ऑल न्यू बोलेरो मॅक्सएक्स पिक-अप रेंजची अभियांत्रिकी.
· अधिक नफा मिळवून देण्यासाठीचे घटक मायलेज, कार्यप्रदर्शन, आराम, सुरक्षितता आणि उत्पादकता यावर मोठे वितरण
· महिंद्राची ग्राहकांप्रती असलेली बांधिलकी अधिक मजबूत करण्यासाठी ऑल न्यू बोलेरो मॅक्सएक्स पिक-अप रेंज: त्याच न बदललेल्या किंमतीत अत्याधुनिक वैशिष्ठ्यांसह नवीन कोरे करकरीत वाहन
· प्रभावी ३०५० एमएम कार्गो बेडसह १.३ t ते २ t ची पेलोड क्षमता. उद्योगक्षेत्रातील या विभागातील असे वैशिष्ट्य असणारे पहिलेच वाहन
· उत्कृष्ट पॉवर आणि टॉर्क असलेले नवीन m2Di इंजिन. त्यामुळे सहजतेने जड भार हाताळण्यास सक्षम
· ५० हून अधिक वैशिष्ट्यांसह iMAXX कनेक्टेड सोल्यूशनद्वारे समर्थित शक्तिशाली फ्लीट मॅनेजमेंट तंत्रज्ञान सहा भाषांमध्ये मोबाइल अॅपवर उपलब्ध. वाहन ट्रॅकिंग, मार्ग नियोजन, खर्च व्यवस्थापन, जिओ-फेन्सिंग आणि वाहन स्थिती निरीक्षण यासाठीची महत्वपूर्ण माहिती.
· एचडी सिरीज (HD 2.0L, 1.7L and 1.7, 1.3) आणि सिटी सिरीज (City 1.3, 1.4, 1.5 and City CNG) या दोन मालिकांमध्ये उपलब्ध
मुंबई, २५ एप्रिल २०२३: भारतातील अग्रगण्य पिकअप ब्रँड बोलेरो पिक-अपचे निर्माते महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) यांनी आज त्यांची ऑल न्यू बोलेरो मॅक्सएक्स पिक अप रेंज सादर केली आहे. त्याची किंमत रु. ७.८५ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होत असून ग्राहक आणि ऑपरेटर्सना अविश्वसनीय किंमतीत अभूतपूर्व वैशिष्ट्ये आणि कामगिरी सादर करण्यासाठी ऑल न्यू बोलेरो मॅक्सएक्स पिक-अप रेंजची अभियांत्रिकी करण्यात आली आहे.
हलकी, अधिक कॉम्पॅक्ट (आटोपशीर) आणि अष्टपैलू असलेली ऑल-न्यू बोलेरो मॅक्सएक्स पिक-अप रेंज पेलोड क्षमता, इंधन कार्यक्षमता, सुरक्षितता आणि एकूण ड्रायव्हिंग अनुभवासाठी नवीन मापदंड प्रस्थापित करते. आजवर कधी नव्हते एवढे अधिक मूल्य वितरीत करण्यासाठी यामध्ये स्मार्ट अभियांत्रिकी देखील समाविष्ट आहे.
नवीन बोलेरो मॅक्सएक्स पिक-अप रेंज २४,९९९ रुपयांच्या किमान डाउन पेमेंटवर बुक केली जाऊ शकते. महिंद्राने विनाअडथळा खरेदी आणि मालकी अनुभवासाठी आकर्षक वित्तपुरवठा योजना देखील सादर केल्या आहेत.
ऑल न्यू बोलेरो मॅक्सएक्स पिक अप रेंज मजबूतपणा, कणखरपणा, विश्वासार्हता, कमी देखभाल खर्च आणि उच्च पुनर्विक्री मूल्य या बोलेरो डीएनएशी जुळणारी सगळी मूलभूत वैशिष्ट्ये धारण करताना नवीन प्लॅटफॉर्मसह गेम चेंजर बनण्याचे अभिवचन देते. देशभरातील शहरी रस्ते आणि महामार्गांवर वर्चस्व गाजवणारी बोलेरोची किमान आणि कालातीत डिझाइन भाषा यात देखील कायम आहे.
महिंद्रा अँड महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे अध्यक्ष विजय नाकरा म्हणाले, “मेक इन इंडिया' उपक्रमासाठी मनापासून कटिबद्ध असलेली कंपनी म्हणून ग्राहक केंद्रित उत्पादनांची निर्मिती आणि विकास करण्यातच केवळ नाही तर भारताच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी असलेली आमची बांधिलकीही यातून प्रतीत होते याचा आम्हाला खूप अभिमान आहे. महिंद्रामध्ये, आम्ही आमच्या ग्राहकांसाठी विकास आणि समृद्धीला चालना देणारी अष्टपैलू वाहने सादर करून त्यांचे जीवन समृद्ध करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. ऑल न्यू बोलेरो मॅक्सएक्स पिक-अप रेंज अत्याधुनिक वैशिष्ट्ये, अतुलनीय शक्ती, कमाल पेलोड क्षमता आणि उच्च मायलेज देत प्रत्येक प्रवास ड्रायव्हर्ससाठी फलदायी आणि थकवा मुक्त असल्याचे आश्वासन देते. खरोखर कमाल अनुभव मिळण्यासाठी आसुसलेल्या प्रत्येकासाठी ही योग्य निवड आहे. या उत्पादन श्रेणीसह ग्राहकांना अतुलनीय मूल्य देण्यासाठी आणि पिक-अप विभागामध्ये उत्कृष्टतेची नवीन मानके प्रस्थापित करण्यासाठी महिंद्राची अतूट बांधिलकी दाखवताना आम्हाला आनंद होत आहे.”
महिंद्रा अँड महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी अँड प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आर. वेलुसामी, म्हणाले, “ऑल न्यू बोलेरो मॅक्सएक्स पिक-अप रेंज सादर करणाऱ्या उच्च गुणात्मक नवीन प्लॅटफॉर्मचा विकास म्हणजे महिंद्रा रिसर्च व्हॅली मध्ये तीन वर्षाहून अधिक काळ समर्पितपणे काम करणाऱ्या अभियंत्यांच्या नाविन्यपूर्ण कामाचा परिपाक आहे. १.३ t ते २ t ची पेलोड क्षमता आणि वेगवेगळी कार्गो लांबी असलेल्या उत्पादनांच्या दोन मालिका सादर करण्यासाठीची क्षमता असणे आणि त्यायोगे डिझेल आणि सीएनजी असे पर्याय सादर करताना कार्यक्षमता आणि उत्पादनक्षमताही जास्तीत जास्त वाढविणे हा महत्वपूर्ण मुद्दा आहे. प्रभावी इंधन कार्यक्षमताही पुरविताना २ t पर्यंत पेलोड पुरविण्यासाठी टॉर्क आणि पॉवर वाढवून या उपयोजनेसाठी आम्ही m2Di इंजिन विशेष प्रकारे अपग्रेड केले. त्याचवेळी आम्ही कार सारखे iMAXX कनेक्टेड तंत्रज्ञान बसवले. या विभागातील अशा प्रकारची ही पहिलीच उपाययोजना आहे. ही सगळी अद्वितीय वैशिष्ट्ये मिळून ऑल-न्यू बोलेरो मॅक्सएक्स पिक-अप रेंज बनली असून आमच्या ग्राहकांसाठी ड्रायव्हिंगचा अनुभव उंचवताना उत्पादनक्षमता आणि मिळकत क्षमताही वाढवितात.
ब्रँड सादर झाल्यापासून महिंद्राने वीस लाखांहून अधिक पिक-अप युनिट्स विकली आहेत. भारतासाठी भारतामध्ये डिझाइन केलेली आणि तयार केलेली त्यांची वाहनांची श्रेणी देशाच्या लॉजिस्टिक गरजांसाठी आत्यंतिक अनुकूल असून त्यामुळे ते देशाच्या लास्ट माईल लॉजिस्टिक नेटवर्कचा कणा बनले आहेत.
ऑल-न्यू बोलेरो मॅक्सएक्स पिक-अप श्रेणी दोन मालिकांमध्ये येते - एचडी सिरीज (HD 2.0L, 1.7L and 1.7, 1.3) आणि सिटी सिरीज (City 1.3, 1.4, 1.5 and City CNG). ग्राहकांना उच्च कामकाजीय आणि मिळकत क्षमता पुरविण्यासाठी तसेच ऑन-रोड अखंड आणि आनंददायी अनुभव मिळण्यासाठी डिझाइन केलेली आहे. याशिवाय, नवीन मालिका उच्च पेलोड क्षमता, अधिक चांगले मायलेज आणि कामगिरी, अधिक आरामशीरपणा आणि सुरक्षितता आणि अत्यंत विश्वासार्ह आणि कार्यक्षम वाहतूक उपाय सुविधा पुरविते.
बोलेरो मॅक्सएक्स पिक-अपच्या वैशिष्ट्यपूर्ण रेंजमध्ये 52.2kW/200Nm आणि 59.7kW/220Nm ची पॉवर आणि टॉर्क नोड वेगवेगळे आहेत आणि ते महिंद्राच्या प्रगत m2Di इंजिनद्वारे समर्थित डिझेल आणि CNG पर्यायांसह आहेत.
मॅक्सएक्स तंत्रज्ञान
संपूर्ण बोलेरो मॅक्सएक्स पिक-अप रेंज iMAXX कनेक्टेड सोल्यूशनसह सुसज्ज असून ती ग्राहक आणि फ्लीट मालकांना त्यांच्या फोनवर iMAXX अॅप वापरून त्यांच्या वाहनांचे सोयीस्करपणे निरीक्षण करू देते. हे अॅप इंग्रजी, हिंदी, तमिळ, कन्नड, तेलुगु आणि मल्याळम या सहा भाषांमध्ये उपलब्ध असल्यामुळे वापरकर्त्यांना संपूर्ण भारतात वापरणे सोपहोते. वाहन ट्रॅकिंग, मार्ग नियोजन, खर्च व्यवस्थापन, भू-फेन्सिंग आणि वाहन स्थिती निरीक्षण यासह ५० हून अधिक वैशिष्ट्यांसह असलेले iMAXX फ्लीट व्यवस्थापन आणि इतर अनेक गोष्टींच्या सुधारणेसाठी महत्वपूर्ण माहिती देते.
बोलेरो मॅक्सएक्स पिक-अप श्रेणीमध्ये अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे जे उत्कृष्ट आराम आणि कार्यक्षमता सुनिश्चित करतात. CMVR प्रमाणित D+2 आसन आणि उंची-अॅडजस्ट करता येणाऱ्या ड्रायव्हर सीट लांबच्या प्रवासासाठी उत्तम आरामाची खात्री देतात. केबिनचे बाह्य आणि अंतर्गत भाग देखील पूर्णपणे पुन्हा डिझाइन केले गेले असून त्यामुळे ते शहर आणि महामार्ग दोन्हीसाठी उपयुक्त आणि सुयोग्य बनले आहेत. एकूण आरामात वाढ करून केबिनमध्ये सहज प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या दृष्टीने देखील हे वाहन डिझाइन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment