पी डी हिंदुजा हॉस्पिटल खारने गेरियाट्रिक रिस्क असेसमेंट क्लिनिक सुरु केले

 पी डी हिंदुजा हॉस्पिटल खारने गेरियाट्रिक रिस्क असेसमेंट क्लिनिक सुरु केले


वयस्क कॅन्सर रुग्णांसाठी पी डी हिंदुजा हॉस्पिटलने गेरियाट्रिक रिस्क असेसमेंट क्लिनिक सुरु केले आहे.

मेडिकल ऑन्कोलॉजीचे कन्सल्टन्ट डॉ. (प्रो.) विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवा क्षेत्रातील अनुभवी प्रोफेशनल्स प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आलेले ट्रीटमेंट प्लॅन उपलब्ध करवून देतील.

मुंबई, ३०मे २०२३: मुंबईतील एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पी डी हिंदुजा हॉस्पिटल खारने गेरियाट्रिक रिस्क असेसमेंट क्लिनिक सुरु केले आहे. मुंबईतील खाजगी रुग्णालयाने सुरु केलेले, हे अशा प्रकारचे पहिलेच क्लिनिक आहे. शरीराची कार्ये पार पाडण्यात अडथळा आणणारे अपंगत्व किंवा पडण्याचा धोका, आकलनामध्ये येत असलेल्या समस्या, मूडसंबंधी विकार यांच्यासह प्रमुख आजार असलेल्या किंवा काही विशिष्ट वैद्यकीय किंवा सर्जिकल कारणांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या (उदाहरणार्थ, फ्रॅक्चर, पुन्हा पुन्हा होणारा न्यूमोनिया इत्यादी) किंवा ज्यांना रुग्णालयात पुन्हा भरती करावे लागू शकते अशा ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांसाठी हे क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. वयस्क कॅन्सर रुग्णांना शक्य तितकी सर्वोत्तम देखभाल पुरवणे या क्लिनिकचा उद्देश आहे.

गेरियाट्रिक असेसमेंट सर्वसमावेशक असून त्यामुळे वयस्कर कॅन्सर रुग्णांच्या आयुर्मानाचा तसेच उपचारांच्या, खासकरून केमोथेरपीच्या साईड इफेक्ट्सच्या धोक्याचा अंदाज लावण्यात मदत मिळते. इतर निकष उदाहरणार्थ, भावनिक आरोग्य स्थिती, शारीरिक क्षमतांचा अभाव, सामाजिक साहाय्याची गरज इत्यादींबद्दल माहिती घेण्यात देखील याची मदत होते.

गेरियाट्रिशियन, नर्स, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींची कोर टीम सुरुवातीचे असेसमेंट करते व फिजिशियन किंवा फिजिशियन असिस्टंट मेडिकल असेसमेंट करतात. आवश्यकता भासल्यास, सायकॉलॉजिस्ट, डाएटिशियन यासारख्या इतर प्रोफेशनल्सकडून अजून सखोल मूल्यांकन केले जाईल. हे क्लिनिक नेमक्या समस्या ओळखेल, त्या समस्यांचा रुग्णाच्या दैनंदिन कामांवर पडणारा प्रभाव समजून घेऊन रुग्णांच्या गरजा व उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यात मदत करेल अशी योजना विकसित करेल.

क्लिनिकची सुरुवात होत असल्याबद्दल पी डी हिंदुजा हॉस्पिटल, खारचे मेडिकल ऑन्कोलॉजीचे कन्सल्टन्ट डॉ. (प्रो.) विजय पाटील यांनी सांगितले, "कॅन्सर होण्याची शक्यता आणि मृत्यू दर या दोन्हींमध्ये वयोमानाप्रमाणे वाढ होते.  वयस्कर रुग्णांना वयोमानाप्रमाणे येणाऱ्या सहव्याधी असतात, त्यामुळे कॅन्सरसाठी दिल्या जाणाऱ्या उपचारांमध्ये गुंतागुंत वाढते. गेरियाट्रिक रिस्क असेसमेंटमुळे विपरीत परिणामांचा जास्त धोका असलेले रुग्ण ओळखता येतात आणि त्यांच्यासाठी अधिकाधिक अनुकूल उपचार व एकंदरीत व्यवस्थापन यांची योजना करता येते. प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार विशेष तयार करण्यात येणाऱ्या उपचार योजना या क्लिनिकमध्ये पुरवल्या जातात, त्यामुळे रुग्णांना अधिक चांगले उपचार मिळतात, त्यांच्या जीवन गुणवत्तेमध्ये सुधारणा होते."

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च - नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामने २०२५ सालापर्यंत देशात कॅन्सर केसेसचा आकडा १५.७ लाखांवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली आहे.


Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE