अपोलो ग्रुपच्‍या अपोलो कनेक्‍ट उपक्रमाची पोहोच व केअर वाढवण्‍याच्‍या दिशेने मोठी झेप

 अपोलो ग्रुपच्‍या अपोलो कनेक्‍ट उपक्रमाची पोहोच व केअर वाढवण्‍याच्‍या दिशेने मोठी झेप

भारतात सर्वात मोठी कनेक्‍टेड हेल्‍थकेअर इकोसिस्‍टम निर्माण करण्‍याचा संकल्‍प


राष्‍ट्रीय, ऑगस्‍ट २९, २०२३: अपोलो या जगातील सर्वात मोठ्या एकीकृत आरोग्‍यसेवा प्रदाता कंपनीने आज त्‍यांचा अद्वितीय कनेक्‍टेड केअर उपक्रम *अपोलो कनेक्‍ट*चा संपूर्ण भारतात विस्‍तार करण्‍याची घोषणा केली. यासह, अपोलोचा भारतात सर्वात मोठी कनेक्‍टेड हेल्‍थकेअर इकोसिस्‍टम निर्माण करण्‍याचा, तसेच सर्वांगीण व उच्‍च दर्जाची रूग्‍ण केअर सेवा प्रदान करण्‍यासाठी मेट्रो व नॉन-मेट्रो शहरांमधील हॉस्पिटल्‍स व नर्सिंग होम्‍सना सक्षम करण्‍याचा उद्देश आहे. अपोलो कनेक्‍टने संपूर्ण भारतात ईआयसीयू, निदान, शस्‍त्रक्रियेमध्‍ये सल्‍लामसलत, रिमोट मॉनिटरिंग, क्लिनिकल व दर्जात्‍मक प्रशिक्षण, तसेच अॅक्रेडिशन सपोर्ट (मान्‍यता समर्थन) अशा सेवा सुरू केल्‍या आहेत. 


सहयोगांच्‍या माध्‍यमातून प्रबळ कनेक्‍टेड केअर सहयोगी नेटवर्क निर्माण करण्‍याच्‍या उद्देशाने अपोलो कनेक्‍टचा शेवटच्‍या अंतरापर्यंत रूग्‍णांना उपलब्‍धता, किफायतशीरपणा व अनुभवामध्‍ये सुधारणा करत भारतातील आरोग्‍यसेवा इकोसिस्‍टम प्रबळ करण्‍याचा मनसुबा आहे. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून अपोलोचे सहयोगी हॉस्पिटल्‍स ते रूग्‍णांना प्रदान करणाऱ्या सेवा वाढवू शकतील, उच्‍च दर्जाच्‍या क्लिनिकल निष्‍पत्ती संपादित करू शकतील, रूग्‍ण धारणा सुधारू शकतील, खर्चांची बचत करू शकतील आणि व्‍यवसाय कार्यक्षमता अधिक प्रबळ करू शकतील. अपोलो कनेक्‍ट उपक्रम आसपासचे हॉस्पिटल्‍स व नर्सिंग होम्‍सना रूग्‍णांना त्‍यांच्‍या घरांपासून जवळ आवश्‍यक असलेली दर्जात्‍मक आरोग्‍यसेवा उपलब्‍ध करून देण्‍यास आणि प्रवास व लॉजिस्टिक्‍सचा आर्थिक भार कमी करण्‍यास मदत करण्‍यासयाठी इकोसिस्‍टम सपोर्ट देतो. 


*या उपक्रमाच्‍या दृष्टीकोनाबाबत मत व्‍यक्‍त करत अपोलोचे संस्‍थापक व अध्‍यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी म्‍हणाले,* ''आम्‍हा केअर प्रदात्‍यांसाठी कोणतीही आजारी व्‍यक्‍ती दर्जात्‍मक केअर उपलब्‍धतेच्‍या अभावामुळे उपचारापासून वंचित राहणार नाही याची खात्री घेण्‍यासाठी सहयोग करणे व एकमेकांना साह्य करणे महत्त्वाचे आहे. या कटिबद्धतेसह आम्‍ही अपोलो कनेक्‍ट उपक्रम सुरू केला आहे. सहयोगाने आरोग्‍यसेवा निर्माण करणारा हा उपक्रम रूग्‍णांना त्‍यांच्‍या घराजवळ दर्जात्‍मक केअर देण्‍यासाठी एकाच व्‍यासपीठावर आरोग्‍यसेवा प्रदात्‍यांना एकत्र आणतो. भारतातील सर्वात मोठी हॉस्पिटल साखळी निर्माण करण्‍यासह कार्यान्‍वित करत असल्‍यामुळे आम्‍हाला आरोग्‍यसेवासंदर्भातील वास्‍तविकता व आव्‍हानांबाबत माहित आहे. आम्‍ही हॉस्पिटल्‍स व नर्सिंग होम्‍सना अपोलोच्‍या अपवादात्‍मक सर्विस सपोर्टच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे कार्यसंचालन व व्‍यवसाय कार्यक्षमता सुधारण्‍यास मदत करण्‍याकरिता अपोलो कनेक्‍ट डिझाइन केला आहे. सहयोग अत्‍यंत प्रबळ साधन आहे आणि आमचा विश्‍वास आहे की, सहयोग करत आम्‍ही भारतातील आरोग्‍यसेवा इकोसिस्‍टम अधिक प्रबळ करू आणि प्रत्‍येक व्‍यक्‍तीला आवश्‍यक असलेली योग्‍य केअर सुविधा मिळण्‍याची खात्री घेऊ.'' 


गेल्‍या दोन वर्षांपासून अपोलो भारतभरातील स्‍पेशालिटी हॉस्पिटल्‍स व नर्सिंग होम्‍ससोबत सहयोगाने अपोलो कनेक्‍ट उपक्रम राबवत आहे आणि बोर्डमध्‍ये या उपक्रमाला व्‍यापक यश मिळाले आहे. उदाहरणार्थ, मोरादाबादमधील सुपर स्‍पेशालिटी हॉस्पिटलने अपोलो डायग्‍नोस्टिक्‍ससोबत सहयोगाने त्‍यांची स्‍वत:ची इन-हाऊस लॅबोरेटरी स्‍थापित केली आहे. छत्तीसगडमधील मल्‍टीस्‍पेशालिटी हॉस्पिटलने अपोलोच्‍या ईआयसीयू सर्विससोबत सहयोगाने आयसीयू ऑक्‍यूपन्‍सी ५० टक्‍क्‍यांनी वाढवली आहे. बेंगळुरूमधील सुपर स्‍पेशालिटी हॉस्पिटल चेन अपोलोच्‍या क्रिटीकल केअर टीमकडून वारंवार प्रशिक्षण व सल्‍लामसलतीच्‍या माध्‍यमातून अधिक गुंतागूंतीच्‍या आपत्‍कालीन केसेस हाताळण्‍यास सक्षम आहे. 


*अपोलोच्‍या संयुक्‍त व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. संगिता रेड्डी म्‍हणाल्‍या,* ''स्‍थापनेपासून आम्‍ही सर्वोत्तम आरोग्‍यसेवा सोल्‍यूशन्‍स निर्माण करण्‍यासह प्रदान करत भारताला आरोग्‍यदायी करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. आमच्‍यासाठी अपोलो कनेक्‍ट याच दिशने आणखी एक पाऊल आहे, जेथे आम्‍ही रूग्‍णांना त्‍यांच्‍या घराजवळ दर्जात्‍मक आरोग्‍यसेवा उपलब्ध करून देण्‍यास मदत करतो. या सेवेमध्‍ये इमर्जन्‍सी केअर, निदान, रिमोट मॉनिटरिंग, तसेच शस्‍त्रक्रियेसंदर्भात सल्‍लामसलत यांचा समावेश आहे. प्रत्‍येक हॉस्पिटल व नर्सिंग होम अधिकाधिक रूग्‍णांपर्यंत पोहोचण्‍यासाठी व अधिकाधिक व्‍यक्‍तींचे जीवन वाचवण्‍यासाठी आरोग्‍यसेवा इकोसिस्‍टमकरिता संधी आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की या संस्‍थांना सक्षम करत आम्‍ही भारतात जागतिक दर्जाची आरोग्‍यसेवा यंत्रणा तयार करण्‍यामध्‍ये यशस्‍वी होऊ, जेथे प्रत्‍येकाला सर्वोत्तम उपचारांसाठी उच्‍च दर्जाच्‍या सुविधा व संधी उपलब्‍ध होतील. आमचा इकोसिस्‍टमला एकत्र आणण्‍याच्‍या क्षमतेवर दृढ विश्‍वास आहे आणि आम्‍ही या ध्‍येयाला वास्‍तविकतेमध्‍ये आणण्‍यासाठी अधिक अथक मेहनत घेण्‍यास सज्‍ज आहोत.'' 


अपोलो कनेक्‍ट आपल्‍या सहयोगी हॉस्पिटल्‍सना चार प्रमुख लाभांच्‍या माध्‍यमातून विविध सेवा देतो. हे चार लाभ आहेत - महसूल वाढवणे व खर्चांची बचत करणे. धोरणात्‍मक व्‍यवसाय पाठिंबा, रूग्‍ण धारणेस साह्य करण्‍याकरिता उच्‍च दर्जाची केअर मार्गदर्शकतत्त्वे प्रदान करणे आणि प्रशिक्षण व उपक्रम आणि कोर्सेसवर देखरेख.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE