अॅमेझॉनने भारताबरोबरची बांधिलकी केली आणखी मजबूत
अॅमेझॉनने भारताबरोबरची बांधिलकी केली आणखी मजबूत;
भारताच्या डिजिटल इकॉनॉमी आणि एक्सपोर्टला चालना देण्यासाठी केली नवीन उपक्रमांची घोषणा
· एमएसएमई निर्यातदारांसाठी क्रॉस बॉर्डर लॉजिस्टिक्स सुलभ करण्यासाठी इंडिया पोस्टसोबत सामंजस्य करार
· ग्राहकांपर्यंत विक्रेत्याच्या ऑर्डर जलदपणे पोहोचविण्यासाठी भारतीय रेल्वेच्या डेडीकेटेड फ्राईट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडियासह (डीएफसी) भागीदारी करणारी पहिली ईकॉमर्स कंपनी बनली आहे
· एमएसएमईसाठी ई-कॉमर्सचा अंगिकार करण्यातील अडथळे दूर करण्यासाठी ‘अॅमेझॉन सह एआय’ एक जनरेटिव्ह एआय समर्थित वैयक्तिक डिजिटल सहाय्यक
· मल्टी चॅनल फुलफिलमेंट (MCF) बरोबर डायरेक्ट-टू-कंझ्युमर (D2C) ब्रँडसाठी त्याची पूर्तता करण्याची क्षमता खुली करत आहे.
· या घोषणा अॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी जून २०२३ मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर केल्या आहेत.
३१ ऑगस्ट, नवी दिल्ली: “आम्ही भारतीय बाजारपेठेतील वाढ आणि दीर्घकालीन क्षमता आणि भारतातील लाखो ग्राहक आणि विक्रेत्यांना सेवा देण्याची संधी याबद्दल उत्सुक आहोत. आम्ही अलीकडेच २०३० पर्यंत संपूर्ण भारतात १५ अब्ज डॉलरच्या वाढीव गुंतवणुकीची घोषणा केली होती आणि २१ व्या शतकातही भारताच्या विकासामध्ये आम्ही कायम भागीदार राहू,” असे एसव्हीपी इंडिया आणि इमर्जिंग मार्केट्स, अॅमेझॉनचे अमित अग्रवाल यांनी आज नवी दिल्ली येथे झालेल्या अॅमेझॉन संभव समीटच्या चौथ्या सत्रात अॅमेझॉनचा भारतातील भविष्यातील दृष्टिकोन मांडताना सांगितले. अॅमेझॉन संभव ही अॅमेझॉनद्वारे आयोजित केली जाणारी वार्षिक विचार नेतृत्व शिखर बैठक असून धोरणकर्ते, उद्योगक्षेत्रातील प्रख्यात अग्रणी, स्टार्टअप्स आणि अॅमेझॉन नेतृत्व यांना डिजिटल इंडियासाठी अमर्याद शक्यता खुल्या करण्याच्या सर्वोत्तम मार्गांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आणते.
या कार्यक्रमामध्ये अॅमेझॉनने भारताबरोबरची बांधिलकी आणखी मजबूत करताना भारताच्या डिजीटल इकॉनॉमी आणि एक्सपोर्टला चालना देण्यासाठी नवीन उपक्रमांची मालिका जाहीर केली. भारताच्या दळणवळण आणि पुरवठा साखळी पायाभूत सुविधेचा कणा असलेल्या इंडिया पोस्ट आणि भारतीय रेल्वे यांच्याशी दीर्घकालीन संबंध अधिक दृढ करून कंपनीने एकात्मिक क्रॉस बॉर्डर लॉजिस्टिक सोल्यूशनसाठी इंडिया पोस्टसोबत सामंजस्य करार केला. त्यामुळे देशभरातील लाखो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांपर्यंत (एमएसएमई) ई-कॉमर्स निर्यातीची संधी वाढेल. याव्यतिरिक्त, अॅमेझॉनने त्यांच्या विक्रेत्यांना संपूर्ण भारतातील ग्राहकांपर्यंत जलद वितरण सेवा देण्यासाठी सक्षम करण्याकरता भारतीय रेल्वेच्या डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (DFC) सोबत सहयोग केला आहे. यामुळे भारतातील मालवाहतूक रेल्वे मार्गाद्वारे ग्राहकांच्या पॅकेजेसची वाहतूक करण्यासाठी डीएफसीचा लाभ घेणारी अॅमेझॉन ही भारतातील पहिली ई-कॉमर्स कंपनी बनली आहे. अॅमेझॉनने असेही जाहीर केले की ते विक्रेत्यांसाठी ‘अॅमेझॉन सह एआय’ नावाचा पहिला जनरेटिव्ह एआय आधारित वैयक्तिक डिजिटल सहाय्यक सादर करेल आणि मल्टी-चॅनल पूर्तता क्षमतांद्वारे भारतभरात डायरेक्ट -टू-कंझ्युमर (D2C) ब्रँड्ससाठी दळणवळण आणि पुरवठा साखळी क्षमता खुली करेल. यामुळे लहान व्यवसायांसाठी आणि डीटूसी ब्रँड्ससाठी त्यांच्या सर्व इन्व्हेंटरी व्यवस्थापित करण्यासाठी आणि त्यांच्या सर्व अॅमेझॉन आणि अॅमेझॉन बाहेरच्या व्यवसायांसाठी एकाच ठिकाणी ऑर्डर पूर्ण करण्याची क्षमता खुली करेल.
इंडिया पोस्ट आणि अॅमेझॉनने संभव 23 मध्ये संस्मरण टपाल तिकिटाचे अनावरण केले. भारतातील १००% सेवा मिळत असलेल्या पिन कोड्समध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचण्यामध्ये अॅमेझॉन आणि भारतीय टपाल खात्यातील दशकभराचा सहयोग यातून साजरा झाला. यामध्ये अॅमेझॉन विक्रेत्यांकडून त्यांच्या बाजारपेठीय स्थानावरून संपूर्ण भारतात पसरलेल्या ग्राहकांपर्यंत उत्पादने पाठवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या वाहतूक साधनांचा वापर करतो त्याचे दर्शन करण्यात आले आहे.
“संभव 23 बद्दल मी अॅमेझॉनचे अभिनंदन करतो. १० दशलक्ष एमएसएमईचे डिजीटलीकरण करण्यासाठी २ दशलक्ष रोजगार निर्मिती करत २०२५ पर्यंत भारतातून इ-कॉमर्स निर्यातीतून २० अब्ज डॉलरला चालना देण्याच्या अॅमेझॉनच्या बांधिलकीबाबत जाणून घेताना मी आनंदित आहे. भारतातील लाखो छोट्या व्यवसायांसाठी डिजिटलायझेशन आर्थिक विकास, व्यापक ग्राहक पोहोच, विपणन आणि वितरणावरील खर्च कमी करणे आणि परदेशी बाजारपेठामध्ये प्रवेश या गोष्टी सादर करू शकते,” असे भारत सरकारच्या अवकाश विभाग, आण्विक ऊर्जा विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन विभाग आणि पंतप्रधान कार्यालयातील माननीय राज्यमंत्री, उपमंत्री श्री. जितेंदर सिंग म्हणाले.
अॅमेझॉन इंडियाचे इंडिया कंझ्युमर बिझनेसचे कंट्री मॅनेजर मनीष तिवारी म्हणाले, “जसजसे आम्ही १० दशलक्ष एमएसएमईचे डिजिटायझेशन करण्यासाठी, २० अब्ज डॉलरची एकूण निर्यात सक्षम करण्याच्या आणि भारतात २ दशलक्ष प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आमच्या आश्वासनाच्या जवळ येत आहोत तसतसे आम्ही भारतातील दीर्घकालीन संधीबद्दल उत्सुक आहोत. आम्ही भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्यावर आणि ग्राहकांना सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत आणि भारतीय व्यवसायांना भारतात आणि जागतिक स्तरावर विस्तार करण्यास सक्षम बनवत आहोत. त्यायोगे भारताच्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेत योगदान देत आहोत.”
एमएसएमई प्रणीत ई-कॉमर्स निर्यातीला चालना देण्यासाठी अॅमेझॉन आणि भारतीय टपाल खात्यातील सर्वोत्कृष्ट गोष्टी एकत्र
भारतीय टपाल खात्याची देशव्यापी पोहोच, त्यांची डाक निर्यात केंद्रे आणि अॅमेझॉनची तंत्रज्ञान, दळणवळण आणि पायाभूत सुविधांमधली गुंतवणूक भारतीय उद्योजकांना निर्यातीच्या संधीचा लाभ घेण्यासाठी प्रवेशाचा अडथळा कमी करेल. हा सहयोग क्रॉस-बॉर्डर लॉजिस्टिक्स आणि भारतीय निर्यातदारांसाठी जगभरातील ग्राहकांना थेट शिपिंगसाठी अनुपालन सुलभ करेल. अॅमेझॉनच्या ग्लोबल सेलिंग प्रोग्रामवरील भारतीय निर्यातदार त्यांच्या शिपमेंट्स बुक करू शकतील, शिपिंग लेबल प्रिंट करू शकतील आणि त्यांच्या विक्रेत्याच्या केंद्रीय खात्यातून थेट शिपिंगसाठी पैसे देऊ शकतील. ते ही शिपमेंट भारतभरातील १०० हून अधिक डाक निर्यात केंद्रांवर पोहोचविण्यास सक्षम असतील आणि तेथून परदेशातील ग्राहकांना माल निर्यात केला जाईल.
पोस्टल सर्व्हिसेस बोर्डचे अध्यक्ष आणि पोस्ट विभागाचे सचिव श्री. विनीत पांडे म्हणाले, “भारतीय टपाल खात्याची डाक निर्यात केंद्रांची रचना भारतातील लहान व्यवसायांना सक्षम करण्यासाठी आणि भारताच्या एकूण निर्यातीत त्यांचा वाटा वाढवण्यासाठी करण्यात आली आहे. ईकॉमर्स निर्यातीच्या संधीचा फायदा घेण्यासाठी लाखो भारतीय लहान व्यवसायांसाठी प्रवेशाचा अडथळा कमी करण्यासाठी अॅमेझॉन सोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे.”
ग्राहकांच्या पॅकेजच्या जलद वितरणासाठी अॅमेझॉन इंडियाचा भारतीय रेल्वेच्या डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (डीएफसी) बरोबर सहयोग
डीएफसी सोबत अॅमेझॉन इंडियाच्या सहयोगामुळे ग्राहकांच्या पॅकेजेसचे वितरण अधिक शाश्वत, वेगवान आणि विश्वासार्ह पद्धतीने शक्य होईल. अॅमेझॉन इंडियाने आधीपासूनच डीएफसी सोबत ६५९ किमी लांबीच्या रेवाडी-पालनपूर (हरियाणा-गुजरात) मार्गावर काम सुरू केले आहे. पुढील काही वर्षांत डीएफसी नेटवर्क विस्तारत असताना, अॅमेझॉन इंडिया नवीन मालवाहतूक रेल्वे मार्ग आणि डीएफसीची क्षमता यात भर घालेल आणि वापर करेल. भारतीय रेल्वेने विद्यमान रेल्वे नेटवर्कची गर्दी कमी करण्यासाठी, मालवाहतूक गाड्यांची सरासरी गती वाढवण्यासाठी, अवजड गाड्यांचे संचालन सक्षम करण्यासाठी, मालवाहतुकीच्या जलद हालचालीसाठी विद्यमान बंदरे आणि औद्योगिक क्षेत्रांना जोडण्यासाठी आणि दळणवळण, मालवाहतुकीचा एकूण खर्च कमी करण्यासाठी डीएफसीची स्थापना केली आहे.
भारतीय रेल्वेच्या रेल्वे बोर्डच्या ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलपमेंटच्या सदस्य श्रीमती जया वर्मा सिन्हा म्हणाल्या, “डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर अतिरिक्त क्षमता निर्माण करण्यासाठी आणि कार्यक्षम, विश्वासार्ह आणि सुरक्षित गतिशीलता पर्यायांची हमी देण्यासाठी डिझाइन केले आहे. मी अॅमेझॉन इंडियाचे भारतीय रेल्वेसोबतचे दीर्घकालीन संबंध अधिक मजबूत केल्याबद्दल आणि डीएफसी वापरून ग्राहकांच्या पॅकेजेसची वाहतूक करणारी भारतातील पहिली ई-कॉमर्स कंपनी म्हणून अभिनंदन करू इच्छिते. पुढील काही वर्षात अॅमेझॉन इंडियाची भारतीय रेल्वेज बरोबरची भागीदारी विस्तारेल अशी मला आशा आणि अपेक्षा आहे.”
Comments
Post a Comment