सेन्‍चुरी मॅट्रेसकडून ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडरपदी 'पीव्‍ही सिंधू यांची नियुक्‍ती

 सेन्‍चुरी मॅट्रेसकडून ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडरपदी 'पीव्‍ही सिंधू यांची नियुक्‍ती

~` सेन्‍चुरी मॅट्रेसकडून भारतातील पहिली कॉपर-जेल तंत्रज्ञान आधारित मॅट्रेस लाँच ~


मुंबई, २९ ऑगस्‍ट २०२३: सेन्‍चुरी मॅट्रेस या भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या मॅट्रेस ब्रॅण्‍डने प्रतिष्ठित बॅडमिटन सेन्‍सेशन पीव्‍ही सिंधू यांची ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर म्‍हणून ऑनबोर्ड केल्‍याची घोषणा केली आहे. या सहयोगासह हैदराबादचे दोन चॅम्पियन्‍स एकत्र आले आहेत. एक चॅम्पियन बॅडमिंटन कोर्टवर सर्वोत्तम कौशल्‍यासाठी प्रसिद्ध आहे, तर दुसरा चॅम्पियन झोप व आरामदायीपणामध्‍ये विशेषीकृत आहे.

बॅडमिंटन कोर्टच्‍या बाहेर पीव्‍ही सिंधू आपल्‍या नवीन भूमिकेमध्‍ये सेन्‍चुरीच्‍या नाविन्‍यपूर्ण उत्‍पादनांचा वापर करत फिटनेस व आरोग्‍यासाठी योग्‍य मॅट्रेस असण्‍याचे महत्त्व सांगतील. राष्‍ट्रीय स्‍तरावर लोकप्रिय असलेल्‍या सिंधू पद्मभूषण पुरस्‍कार-प्राप्‍त व प्रतिष्ठित बॅडमिंटन खेळाडू आहेत. त्‍या ब्रॅण्‍डला देशभरातील विविध भौगोलिक क्षेत्रांपर्यंत पोहोचण्‍यास साह्य करतील.

सेन्‍चुरीने व्‍यक्‍तींच्‍या झोपण्‍याच्‍या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यासाठी नुकतेच जेल लॅटेक्‍स, ए-राइज व विस्‍कोपडिक मॅट्रेसेस लाँच केली. यासह मॅट्रेस ब्रॅण्‍ड कन्‍वेन्‍शनल जेल तंत्रज्ञानामधून कॉपर जेल तंत्रज्ञानामध्‍ये बदल करत उद्योग अग्रणी म्‍हणून उदयास आला आहे. शरीराला प्रेशर रीलीफ (आरामदायीपणा) देणारी नैसर्गिक अॅण्‍टी-इन्‍फ्लेमेटरी वैशिष्‍ट्ये असलेले नवीन कॉपर जेल तंत्रज्ञान मॅट्रेसच्‍या पृष्‍ठभागामुळे शरीरावर निर्माण होणारी उष्‍णता कमी करते. ही अद्वितीय वैशिष्‍ट्ये ग्राहकांना रात्रीच्‍या वेळी पुरेशी व उत्तम झोप मिळण्‍याची खात्री देतात.

सेन्‍चुरी मॅट्रेसचे कार्यकारी संचालक श्री. उत्तम मलानी म्‍हणाले, ''आम्‍हाला आमच्‍या नवीन ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर म्‍हणून पीव्‍ही सिंधू यांचे सेन्‍चुरी कुटुंबामध्‍ये स्‍वागत करण्‍याचा आनंद होत आहे. सर्वोत्तमता व समर्पिततेची समान मूल्‍ये असलेल्‍या सिंधू सेन्‍चुरीसाठी अगदी सहयोगी आहेत. सेन्‍चुरी भारतातील स्‍लीप स्‍पेशालिस्‍ट आहे, तर सिंधू निश्चितच भारतातील स्‍पोर्टस् स्‍पेशालिस्‍ट आहेत आणि त्‍यांच्‍या कामगिरीमधून ते सार्थ ठरते. आम्‍हाला सिंधू यांच्‍यासारख्‍या चॅम्पियनसेाबत सहयोग करण्‍याचा अभिमान वाटतो. तसेच आम्‍ही या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आमच्‍या नाविन्‍यपूर्ण उत्‍पादने व माहितीपूर्ण मोहिमांसह सर्व व्‍यक्‍तींपर्यंत पोहोचण्‍यास उत्सुक आहोत.''

भारतातील सर्वात यशस्‍वी खेळाडूंपैकी एक पद्मभूषण पीव्‍ही सिंधू म्‍हणाल्‍या, ''सेन्‍चुरी मॅट्रेससोबतचा सहयोग माझ्यासाठी उत्‍साहवर्धक पुढाकार आहे. नाविन्‍यपूर्ण स्‍लीप सोल्‍यूशन्‍सप्रती त्‍यांची समर्पितता आराम मिळण्‍याच्‍या महत्त्वावरील माझ्या विश्‍वासाशी परिपूर्णपणे संलग्‍न आहे. यशासाठी अथक मेहनत व प्रशिक्षण आवश्‍यक असते, अगदी तसेच रात्रीच्‍या वेळी पुरेशी व उत्तम झोप मिळण्‍यासाठी योग्‍य मॅट्रेस असणे गरजेचे आहे. मला सर्वांगीण आरोग्‍यासाठी आरोग्‍यदायी स्‍लीप सोल्‍यूशन्‍सचा प्रसार करण्‍याच्‍या सेन्‍चुरीच्‍या या प्रवासाचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे.'' 

सेन्‍चुरी मॅट्रेसेसने देशामध्‍ये प्रबळ उपस्थिती स्‍थापित केली आहे. १८ राज्‍यांमध्‍ये ४५०० हून अधिक डिलर्स व ४५० हून अधिक एक्‍सक्‍लुसिव्‍ह ब्रॅण्‍ड स्‍टोअर्स आहेत. कंपनीचे हैदराबाद व भुवनेश्‍वरमध्‍ये उत्‍पादन प्‍लाण्‍ट्स आहेत. कंपनी-संचालित विक्री डेपो पुणे, बेंगळुरू, वारंगल, विजाग, विजयवाडा, कुर्णूल, संबलपूर येथे आहेत आणि दक्षिण, पूर्व व पश्चिम भारतामध्‍ये विक्री कार्यालये आहेत.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE