'गोदरेज अप्लायन्सेस'तर्फे कल्याणमधील ग्राहकांसाठी घरगुती उपकरणांच्या खरेदीचा उत्कृष्ट अनुभव सादर

 'गोदरेज अप्लायन्सेस'तर्फे कल्याणमधील ग्राहकांसाठी

घरगुती उपकरणांच्य खरेदीचा उत्कृष्ट अनुभव सादर

 

Ø  'गोदरेज इन्स्पायर हब'चे अनावरण - कल्याणमध्ये 'गोदरेज अप्लायन्सेस'चे दुसरे खास आउटलेट



 

 

मुंबई२९ ऑगस्ट २०२३ : 'गोदरेज अप्लायन्सेस'ने आपल्या विशेष ब्रँड आउटलेट्सचे नेटवर्क आणखी वाढवण्याची योजना आखली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये कंपनीच्या आणखी एका ब्रँड आउटलेटचे उद्घाटन आज करण्यात आले. गोदरेज समुहाची प्रमुख कंपनी असलेल्या 'गोदरेज अँड बॉइस'चा 'गोदरेज अप्लायन्सेस' हा एक व्यवसाय आहे. या कंपनीतर्फे आज ही घोषणा करण्यात आली.

 

कल्याणमधील ग्राहकांना घरगुती उपकरणांच्या खरेदीचा उत्कृष्ट अनुभव देण्याच्या उद्देशाने 'गोदरेज अप्लायन्सेस'ने आपले हे विशेष ब्रँड आउटलेट सादर केले आहे. 'गोदरेज इन्स्पायर हब' या नावाचे हे आऊटलेट कल्याण शीळ रस्त्यावरील नेतिवली या ठिकाणी सुरू झाले. सुमारे १२०० चौ. फूट जागेत व्यापलेले हे आऊटलेट लासी ट्रेडर्स या चॅनेल भागीदारांच्या सहकार्याने उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन कंपनीचे बिझनेस हेड व कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यांच्या उपस्थितीत झालेग्राहकांसाठी ब्रॅंड आऊटलेटचे दरवाजे आजपासून खुले झाले आहेत.

 

ग्राहकांसाठीच्या सोयी आणि सुविधा या बाबींना आज सर्वाधिक महत्त्व आले आहेप्रीमियम उत्पादनांच्या मागणीत हळूहळू वाढ होत असल्याने हे अधोरेखित होते. विशेष ब्रँड आउटलेट्सच्या माध्यमातून 'गोदरेज अप्लायन्सेस'ने देशभरात पूर्वीपासून आपले मोठे नेटवर्क उभे केलेले आहे. यातून ग्राहकांच्या प्रीमियम उत्पादनाच्या गरजा पूर्ण होतातचत्याशिवाय त्यांना निवडण्यासाठी येथे घरगुती उपकरणांच्या विस्तृत श्रेणी उपलब्ध असतात.

 

कल्याणमधील आउटलेटच्या उद्घाटनप्रसंगी 'गोदरेज अप्लायन्सेस'चे राष्ट्रीय विक्री प्रमुख संजीव जैन म्हणाले, “आम्ही नेहमी आमच्या ग्राहकांच्या शक्य तितक्या जवळ राहण्याचा प्रयत्न केला आहे. आमचा विश्वास आहे की आमची विशेष ब्रँड आउटलेट्स आमच्या निष्ठावान ग्राहकांना अधिक मूल्य देईल. 'गोदरेज इन्स्पायर हब' शोरूममध्ये आमची सर्वोत्कृष्ट श्रेणीतील उपकरणे एकाच ठिकाणी प्रदर्शित करण्याची संधी आम्हाला मिळते. महाराष्ट्र ही आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम खरेदीचा अनुभव देण्यास उत्सुक आहोत."

 

'लासी ट्रेडर्स'चे मालक जीतेंद्र धलाराम कारिया म्हणाले, “आम्हाला 'गोदरेज अप्लायन्सेस'सोबत भागीदारी केल्याचा अतिशय आनंद होत आहे. हा एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह असा ब्रँड आहे. आम्‍हाला खात्री आहे की गोदरेजच्या अनेकविध उत्पादनांमुळे आमचे हे आऊटलेट ग्राहकांसाठी एक उत्‍तम डेस्टिनेशन ठरेल.”

 

या विशेष ब्रँड आउटलेटमध्ये रेफ्रिजरेटर्सएअर कंडिशनर्सवॉशिंग मशीनडिशवॉशरमायक्रोवेव्ह ओव्हनएअर कूलरडीप फ्रीझर्सथर्मोइलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर चालणारे गोदरेज क्यूब इत्यादींसह गोदरेज अप्लायन्सेसची संपूर्ण श्रेणी मांडण्यात आली आहे. उद्घाटनानिमित्त ऑफर म्हणून ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्याची आणि १० हजार रुपयांपर्यंतच्या भेटवस्तू जिंकण्याची संधी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, निवडक मॉडेल्सच्या खरेदीवर खात्रीशीर कॅश-बॅक ऑफर आणि मोफत भेटवस्तू अशीही येथे ऑफर आहे. गोदरेज अप्लायन्सेसच्या या विशेष ब्रँड आउटलेटमध्ये ग्राहकांना (निवडक मॉडेल्सवर) एक वर्षाची मोफत विस्तारित वॉरंटी आणि एका वर्षाच्या उत्पादन विम्याचा लाभ घेता येईलकंपनीकडून ग्राहकांना विक्री-पश्चात सेवाही प्राधान्याने देण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE