मत्स्यप्रेमी खवय्यांसाठी आकर्षण ठरले आहे `द फिशरमन रेस्टॉरन्ट’
मत्स्यप्रेमी खवय्यांसाठी आकर्षण ठरले आहे `द फिशरमन रेस्टॉरन्ट’
मत्स्यप्रेमी खवय्यांना अधिकाधिक स्वादिष्ट पद्धतीचे जेवण हवे असते. त्यासाठी ते सदैव त्याच्या शोधात असतात. पण हा शोध त्यांचा गोरेगांवच्या बांगूर नगर भागात असलेल्या `दि फिशरमन रेस्टॉरन्ट’पाशी त्यांना घेऊन येतो. मालक प्रशांत शेट्टी यांनी अत्यंत कुशलतेने या ठिकाणी आपल्या चवीचा दर्जा राखत आणि उत्तम प्रकारची सेवा देत ही किमया साध्य केली आहे. ग्राहकांशी प्रत्यक्षात संवाद साधत, त्यांच्या अपेक्षांना समजून घेत त्यांनी या पदार्थांची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर अस्सल तेच त्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे रेस्टॉरन्ट अल्पावधीत अत्यंत लोकप्रिय झाले आहे.
उद्योगातील १२ वर्षांचा अनुभव आणि हॉटेल मॅनेजमेंटची पार्श्वभूमी असल्यामुळे हा उद्योग उभारताना अडचण आली नाही, माझे सीफूड रेस्टॉरंट कुशलतेने व्यवस्थापित करण्यासाठी आणि उन्नत करण्यासाठी मी माझे कौशल्य सुधारले आहे. त्याचबरोबर आईचा देखील या निर्मितीमागे फार मोठा प्रोत्साहानाचा भाग आहे. तिच्यामुळेच अनेक गोष्टी नव्याने तयार करता आल्या आणि ग्राहकांनादेखील उत्तम चवीचा आनंद देता आला, असे प्रशांत शेट्टी यांनी सांगितले.
इथे एक पाककृती ज्यामध्ये किनारपट्टीवरील चव, मँगलोरियन
आणि मालवणी स्वादिष्ट पदार्थ भारतातील सुगंधी मसाल्यांचा वापर करून तयार करण्यात
आले आहेत. त्याचबरोबर श्रीलंकन प्रॉन्स हा प्रकारदेखील इथे नव्याने मिळतो. त्याची
विशेषता असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
दी फिशरमनची अंतर्गत रचनादेखील अत्यंत आकर्षक आहे. आपण सुशोभित
आमच्या मनमोहक जागेत पाऊल ठेवल्याचा आनंद आपल्याला मिळतो. चित्तथरारक
भित्तिचित्रांसह, समुद्राच्या शांत सौंदर्याकडे जाण्यासाठीच आपण इथे बसलो आहोत, अशी
अनुभूती मिळत असते. विचारपूर्वक क्युरेट केलेला मेनू किनारी आणि भारतीय पदार्थांची
वैविध्यपूर्ण निवड देतो तसेच आमचे रेस्टॉरंट हे कुटुंबांसाठी एकत्र येण्याचे एक
उत्तम ठिकाण आहे, असेही प्रशांत शेट्टी सांगतात.
या ठिकाणी येणारे ग्राहक तसेच घरी
अथवा इच्छित स्थळी इथून पदार्थ मागवणारे ग्राहक हे आजुबाजूच्या परिसरातून मोठ्या
प्रमाणावर आहे. त्यांच्या खिशाला परवडेल अशा किंमतीत हे पदार्थ मिळत असल्यामुळे
त्यांची मागणीदेखील वाढत असते. हा प्रतिसाद बघून भविष्यात नक्कीच अजून दि फिशरमनच्या
शाखा इतरत्र सुरु करण्याचा मनोदय असल्याचेही प्रशांत शेट्टी यांनी याबाबत बोलताना
सांगितले.
Comments
Post a Comment