तरूण व्यावसायिकांच्या सक्षमतेसाठी झेल एज्युकेशनची मोहीम
तरूण व्यावसायिकांच्या सक्षमतेसाठी झेल एज्युकेशनची मोहीम
मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३: आर्थिक क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या तरूण व्यावसायिकांना सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक शैक्षणिक व्यासपीठ झेल एज्युकेशनद्वारे 'फायनान्स फॉरवर्ड' ही मोहीम लॉन्च करण्यात आली आहे. समाजाचे ऋण फेडण्यासह तरूणांना फायनान्ससंदर्भात जागरूक करण्याच्या ध्येयासह मोहिम फायनान्स फॉरवर्ड उद्योगामधील दिग्गजांचा प्रेरणादायी प्रवास व बहुमूल्य माहितीला सादर करते.
झेल एज्युकेशनचे सह-संस्थापक व संचालक अनंत बेनगनी म्हणाले, "या उपक्रमाप्रती आमची कटिबद्धता ज्ञान व मार्गदर्शनाच्या क्षमतेमधील आमच्या अविरत विश्वासामधून निर्माण झाली आहे. 'फायनान्स फॉरवर्ड'चा तरूण फायनान्स उत्साहींसाठी महत्त्वाकांक्षा व उपलब्धी यामधील तफावत दूर करण्याचा मनसुबा आहे. प्रतिष्ठित फायनान्स व्यावसायिकांच्या प्रेरणादायी गाथा व व्यावहारिक ज्ञानाच्या माध्यमातून आम्ही भावी प्रमुखांना निपुण करण्यास आवश्यक असलेले मार्गदर्शन व प्रेरणास्रोत प्रदान करण्याची आशा करतो."
नुकतेच फायनान्स फॉरवर्ड एपिसोडमध्ये भारताचे माजी रेल्वेमंत्री व ऋषीहूड युनिव्हर्सिटीचे कुलगुरू सुरेश प्रभू यांनी सर्वोत्तम माहिती व वैयक्तिक किस्से शेअर केले आहेत. शिक्षण व व्यावहारिक उपयोजन यांमधील महत्त्वपूर्ण दुव्यावर भर देत प्रभू शिक्षण व वास्तविक जीवनातील स्थिती यांच्यामधील ऐतिहासिक सबंध प्रकाशझोतात आणत आहेत. तीन दशकांपासून युनिव्हर्सिटींशी सक्रियपणे संलग्न असलेले ते विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणाच्या मर्यादांना झुगारत क्लासरूमच्या भिंतींपलीकडील वास्तविकतांचा शोध घेण्यास मार्गदर्शन करतात. भारतातील नवीन शैक्षणिक धोरणाच्या सकारात्मक परिणामाचे कौतुक करत प्रभू यांनी सैद्धांतिक ज्ञान आणि वास्तविक विश्वात उपयोजनाच्या एकसंधी एकीकरणाची गरज व्यक्त केली आहे.
हा एपिसोड शिक्षणाव्यतिरिक्त जीवनातील गुंतागूंतींमधून नेव्हिगेट करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुसज्ज करणाऱ्या शैक्षणिक यंत्रणेला आवाहन करतो. 'फायनान्स फॉरवर्ड'मध्ये अव्वल फायनान्स प्रोफेशनल्स पाहायला मिळतील, जे विविध पैलू, सल्ले व यशोगाथा सादर करतील. या मोहिमेचा भावी फायनान्स प्रमुखांना प्रेरित, शिक्षित व मार्गदर्शन करण्याचा मनसुबा आहे, ज्यामुळे ते यशाच्या दिशेने स्वावलंबीपणे प्रवास सुरू करू शकतील.
Comments
Post a Comment