एका मोबिलिटीचा, भारतात आघाडीची जागतिक ओईएम तयार करण्याच्या उद्देशाने मित्सुई आणि व्हीडीएल ग्रुपशी सहयोग

 एका मोबिलिटीचा, भारतात आघाडीची जागतिक ओईएम तयार करण्याच्या उद्देशाने मित्सुई आणि व्हीडीएल ग्रुपशी सहयोग


एका, मित्सुई आणि व्हीडीएल ग्रुप ह्यांच्यात दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी; ह्यात संयुक्त गुंतवणुका, इक्विटी व तंत्रज्ञान सहकार्य आदींचा समावेश

100 दशलक्ष डॉलर्स (850 कोटी रुपये) एवढी संयुक्त गुंतवणूक टप्प्या-टप्प्याने केली जाणार, ह्या सहकार्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांसाठीचे जागतिक दर्जाचे उत्पादन व सोर्सिंग केंद्र म्हणून भारताचे स्थान पक्के होणार 



मुंबई, 27 डिसेंबर 2023: - एका मोबिलिटी ह्या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन व तंत्रज्ञान कंपनीला मित्सुई अँड कंपनी लिमिटेड (जपान) आणि व्हीडीएल ग्रुप (नेदरलॅण्ड्स) ह्यांच्यासोबत भागीदारीची घोषणा करताना आनंद होत आहे. ही धोरणात्मक भागीदारी भारतातील वाहन उद्योगाच्या उत्क्रांतीतील महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि भारताला शाश्वत वाहतुकीचे जागतिक केंद्र होण्यासाठी ह्यामुळे चालना मिळत आहे. ह्या भागीदारीद्वारे ह्या भागात सर्वांत अत्याधुनिक ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चुअर्स (ओईएम) स्थापन केले जाणार आहे. 


भारतातील नवीन वाहतूक विभागातील सर्वांत मोठ्या व महत्त्वपूर्ण भागीदारींपैकी ही एक आहे. ह्याद्वारे आशिया व युरोपमधील तीन आघाडीच्या वाहन उत्पादन समूहांची बलस्थाने व कौशल्ये एकत्र आणली जात आहेत. ह्याद्वारे जगभरातील नवोन्मेषकारी इलेक्ट्रिक वाहतूक उत्पादनांच्या विकासाला व स्वीकृतीला वेग दिला जाणार आहे. ह्या सहयोगाखाली, अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहने व सर्वसमावेशक ईव्ही परिसंस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या एका मोबिलिटीमध्ये मित्सुई ही जागतिक ट्रेडिंग व गुंतवणूक कंपनी गुंतवणूक करणार आहे. औद्योगिक नवोन्मेषाला योगदान देण्याचा समृद्ध वारसा ह्या कंपनीकडे आहे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानात्मक सहाय्य व ईक्विटी भागीदारी व्हीडीएल ग्रुप करणार आहे. व्हीडीएल ग्रुप ही आघाडीची डच तंत्रज्ञान व उत्पादन कंपनी आहे. ह्या तिन्ही कंपन्यांची एकत्रित कौशल्ये व संसाधने ह्यांच्या माध्यमातून शाश्वत वाहतूक व उत्पादनातील उत्कृष्टता ह्यांचे नवीन युग सुरू होणार आहे. 


भागीदारीची ठळक वैशिष्ट्ये:

1. धोरणात्मक गुंतवणूक: मित्सुई अँड कंपनी लिमिटेड एका मोबिलिटीमध्ये लक्षणीय आर्थिक गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे कंपनीला आपल्या उत्पादनाच्या कामाचा आवाका वाढवता येईल तसेच उत्पादनांचा पोर्टफोलिओही विस्तारता येईल. मित्सुई एकाला निर्यातीसाठीही सहाय्य पुरवणार आहे. उगवत्या बाजारपेठा निवडण्यासाठी तसेच प्रणाली व प्रक्रियांच्या स्थापनेसाठी मित्सुई एकाला मदत करणार आहे.  


2. तंत्रज्ञानात्मक नेतृत्व: ह्या भागीदारीचा एक भाग म्हणून, व्हीडीएल ग्रुपची उपकंपनी तसेच युरोपातील इलेक्ट्रिक बसेस व कोचेस विभागातील अग्रेसर कंपनी व्हीडीएल बस अँड कोच, एका मोबिलिटीला, भारतात भारतीय बाजारपेठेसाठी इलेक्ट्रिक बसेसचे उत्पादन करण्यासाठी, तंत्रज्ञान हस्तांतराच्या माध्यमातून मदत करणार आहे. 

3. ‘मेक इन इंडिया’ भक्कम करणे: स्थानिक उत्पादन आणि रोजगार निर्मीतीला चालना देणाऱ्या, ‘मेक इन इंडिया’ ह्या भारत सरकारच्या उपक्रमाशी ही भागीदारी संलग्न आहे. 

4. शाश्वतता: ह्या भागीदारीत शाश्वतता व पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक वाहतूक उत्पादनांप्रती बांधिलकीवर भर देण्यात आला आहे. ह्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यात मदत होणार आहे. 


एका मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता ह्यांनी ह्या भागीदारीबद्दल आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, "मित्सुई आणि व्हीडीएल ग्रुप ह्यांच्यासोबत झालेली भागीदारी ही भारताला इलेक्ट्रिक वाहन उत्पादनातील जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्यातील महत्त्वाची पायरी आहे. शाश्वत, नफाक्षम व कार्यक्षम वाहतुकीचे सामाईक उद्दिष्ट ठेवणाऱ्या सहयोगींसोबत काम करण्याची संधी मिळत आहे ह्याचा आम्हाला अभिमान आहे."


मित्सुई अँड कंपनी इंडियाच्या मोबिलिटी बिझनेस डिव्हिजनचे जीएम (महाव्यवस्थापक) नोबुयोशी उमुझावा म्हणाले: "एका, व्हीडीएल आणि मित्सुई ह्यांच्या सहयोगामार्फत, एकाच्या इंजिनीअरिंगमधील उत्कृष्टतेचा व स्थानिक संपर्काचा लाभ घेऊन  ‘मेक इन इंडिया’मध्ये योगदान देण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. शिवाय, एकाची स्पर्धात्मक उत्पादने परदेशी बाजारपेठांमध्ये निर्यात करण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक समाजाच्या निर्मितीत योगदान देण्यासाठी मित्सुईच्या जागतिक नेटवर्कचा उपयोगही आम्ही करणार आहोत."

व्हीडीएल बस अँड कोचचे सीईओ रोल्फ-जॅन झ्वीप म्हणाले: "एका मोबिलिटी आणि मित्सुई ह्यांच्याशी भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे. आमच्या उच्च दर्जाच्या विकास व उत्पादन क्षमतेचा पाया वायव्य युरोपात असला तरी, आम्हाला भारतातही अनेक संधी दिसत आहेत. भारत ही नक्कीच एक आश्वासक वाढीची बाजारपेठ आहे. ह्या सहकार्याच्या माध्यमातून आम्हाला खरेदी व विकास ह्या क्षेत्रांमध्ये अनेक समन्वयात्मक लाभ दिसत आहेत."  

एका मोबिलिटी ही भारत सरकारच्या ऑटो पीएलआय धोरणातील चॅम्पियन ओईएम स्कीम व ईव्ही कम्पोनण्ट मॅन्युफॅक्चुअरिंग स्कीमअंतर्गत मंजुरी देण्यात आलेल्या व्यावसायिक वाहन उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. भारतात नवीन ऊर्जेवरील वाहनांसाठी एण्ड-टू-एण्ड डिझाइन, उत्पादन व तंत्रज्ञान सेवा देणारी एका ही एकमेव भारतीय कंपनी आहे. कंपनीने महाराष्ट्रातील पुणे येथे अत्याधुनिक संशोधन, विकास व नवोन्मेष केंद्र स्थापन केले आहे. कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये लक्षणीय वाढ होऊन, 500हून अधिक इलेक्ट्रिक बसेस आणि 5000हून अधिक इलेक्ट्रिक कमी वजनाची व्यावसायिक वाहने ह्यांचे उत्पादन सध्या सुरू आहे. ही सर्व वाहने एकाच्या मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रस्तावित अतिप्रगत उत्पादन कारखान्यांच्या माध्यमातून, संपूर्णपणे भारतात डिझाइन व उत्पादित केली जाणार आहेत. गेल्या दोन वर्षांत कंपनीने इलेक्ट्रिक सिटी बस, स्टाफ कॅरियर व स्कूल बस, 9 मीटर लांबीची हायड्रोजन फ्युएल-सेल इलेक्ट्रिक बस बाजारात आणली आहे आणि आता भारतीय ग्राहक व व्यावसायिकांच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या तसेच दुर्गम भागात माल पोहोचवण्याच्या दृष्टीने तयार केल्या जाणाऱ्या ई-एलसीव्ही वाहनांच्या क्षेत्रात प्रवेश करण्यास कंपनी सज्ज आहे. 

=======================================================

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24