कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक 'POEM' प्रक्रियेच्या साहाय्याने गिळताना त्रास होत असलेल्या रुग्णांवर यशस्वीपणे उपचार

 कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये अत्याधुनिक 'POEM' प्रक्रियेच्या साहाय्याने गिळताना त्रास होत असलेल्या रुग्णांवर यशस्वीपणे उपचार 


पेरोरल एंडोस्कोपिक मायोटॉमी किंवा POEM ॲकलेसिया यासारख्या एसोफॅगसमध्ये स्नायू विकारांनी त्रस्त लोकांसाठी एक नवीन उपचार पर्याय आहे. 

सामान्य अनेस्थेशिया देऊन केली जाणारी POEM ही अतिशय कमीत कमी इन्व्हेसिव्ह प्रक्रिया आहे आणि यामध्ये शरीरावर दिसून येतील असे व्रण राहत नाही.



नवी मुंबई, 23 डिसेंबर, 2023:  कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईने दोन दुर्मिळ केसेसची माहिती दिली आहे, ज्यामध्ये गिळताना त्रास होण्याच्या समस्येवर आधुनिक पेरोरल एंडोस्कोपिक मायोटॉमी प्रक्रियेचा उपयोग करून यशस्वीपणे उपचार केले गेले. यापैकी एक ४१ वर्षांचे श्री अशोक यांना गेल्या दहा वर्षांपासून जेवताना छातीमध्ये त्रास होत होता. दुसरी केस श्रीमती सिराज देवी या ७० वर्षांच्या महिलेला गेल्या पाच वर्षांपासून गिळताना त्रास होत होता, खूप जुना खोकला होता, सतत होणाऱ्या एस्पिरेशन न्यूमोनियामुळे फुफ्फुसांचे फायब्रोसिस झाले होते. अन्ननलिकेवर परिणाम करणारी एक स्थिती, ॲकलेसिया कार्डियाचे निदान करण्यात आल्यावर रुग्णांवर खूपच कमी इन्व्हेसिव्ह असलेली POEM प्रक्रिया करण्यात आली.  त्यामुळे लक्षणांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा दिसून आली. तिसऱ्या दिवशी त्यांना घरी पाठवण्यात आले. मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोनामुळे या दोन्ही रुग्णांना बरे होण्यात मदत मिळाल्याचे या दोन्ही केसेसमधून दिसून येते.  


कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये कन्सल्टन्ट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ दीपक भंगाळे यांनी सांगितले, "ॲकलेसिया अशी स्थिती आहे, ज्यामध्ये आपण खाल्लेले अन्न पोटापर्यंत घेऊन जाणारी अन्नप्रणाली नीट आकुंचन पावत नाही, त्यामुळे अन्न पोटापर्यंत नेणे कठीण होऊन बसते. त्याशिवाय अन्नप्रणालीच्या खालच्या भागातील एक स्नायू एसोफेजियल स्फिन्क्टर नीट रिलॅक्स होऊ शकत नाही, त्यामुळे अन्न गिळणे कठीण होते. त्यामुळे खोकला येतो किंवा श्वास अडकतो. तसेच अन्न नलिकेमध्ये अडकू शकते. हळूहळू रुग्णाचे वजन कमी होत जाते, पोषण कमतरतेमुळे जीवन गुणवत्ता देखील खालावते."


कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागामध्ये उपलब्ध करवून देण्यात आलेली POEM एक मेडिकल प्रक्रिया आहे, जिचा उपयोग करून गिळण्यामध्ये होत असलेल्या त्रासावर उपचार केले जातात. POEM प्रक्रिया सर्वात पहिल्यांदा २००८ साली जपानमध्ये आणि त्यानंतर नोव्हेंबर २०१३ मध्ये युकेमध्ये केली गेली. तेव्हापासून या आधुनिक प्रक्रियेचा उपयोग ॲकलेसियासारख्या एसोफेजियल मोटीलिटी समस्यांच्या उपचारांसाठी केला गेला आहे. शरीरावर कोणतेही बाह्य घाव न करता ही प्रक्रिया केली जाते आणि यासाठी साधारणपणे ६० ते ९० मिनिटे लागतात. यासाठी सामान्य अनेस्थेशिया दिला जातो. अमेरिकन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोइन्टेस्टायनल एंडोस्कोपीने याला सुरक्षित व प्रभावी उपचार पर्याय म्हणून मान्यता दिली आहे.


पहिल्या केसमध्ये ४१ वर्षांचे श्री अशोक यांना दुसरा काहीच आजार नव्हता. गेल्या दहा वर्षांपासून जेवताना छातीमध्ये त्रास होत होता. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये येण्याच्या आधी अनेक डॉक्टरांकडून तपासण्या करून घेतल्या होत्या आणि त्यातून दिसून आले होते की त्यांचे हृदयाचे आरोग्य नीट आहे. जीआय एंडोस्कोपी आणि मॅनोमेट्रिक तपासणीतून त्यांच्या समस्येचे कारण समजले की त्यांना टाईप १ ॲकलेसिया कार्डिया आहे. या रुग्णाने पारंपरिक पर्यायांऐवजी आधुनिक POEM प्रक्रिया करून घेण्याचा निर्णय घेतला. प्रक्रियेनंतर लगेचच श्री अशोक यांची दहा वर्षे जुन्या आजारातून सुटका झाली.


दुसऱ्या केसमध्ये ७० वर्षांच्या श्रीमती सिराज देवी यांना गेल्या पाच वर्षांपासून गिळताना त्रास होत होता, जुनाट खोकला होता आणि पुन्हा पुन्हा होणाऱ्या एस्पिरेशन न्यूमोनियामुळे त्यांच्या फुफ्फुसांमध्ये फायब्रोसिस झाले होते. टाईप २ ॲकलेसिया कार्डियाचे निदान करण्यात आले होते. त्यांचे वय आणि फुफ्फुसांमधील गुंतागुंत यामुळे सर्जरीमध्ये खूप जास्त धोका होता, म्हणून त्यांच्यावर POEM प्रक्रिया केली गेली. प्रक्रिया यशस्वी झाली आणि गिळताना होणारा त्रास व जुनाट खोकला या दोन्हींपासून त्यांची सुटका झाली.


कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईचे संचालक व प्रमुख डॉ बिपीन चेवले यांनी सांगितले, "POEM प्रक्रिया कमीत कमी इन्व्हेसिव असल्याने खूप धोका असलेल्या रुग्णांसाठी, एसोफेजियल मोटीलिटी समस्येवर उपचार म्हणून पारंपरिक सर्जिकल पद्धतींना अतिशय प्रभावी पर्याय म्हणून उपयुक्त ठरते. आम्हाला अभिमान वाटतो की, आम्ही नवी मुंबई आणि आजूबाजूच्या भागातील रुग्णांसाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये ही आधुनिक POEM प्रक्रिया सादर केली आहे. आमच्या रुग्णांची सर्वोत्तम देखभाल करण्यासाठी नवीन मेडिकल प्रगती आणि मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन वापरण्याप्रती आमची बांधिलकी यामधून दर्शवली जाते."

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth