मूडीज आणि पीजीपी अकादमीच्या माध्यमातून द वेल्थ कंपनीने जागतिक दर्जाचे वेल्थ मॅनेजमेंट आणि एसआयएफ प्रशिक्षण सुरू केले
मूडीज आणि पीजीपी अकादमीच्या माध्यमातून द वेल्थ कंपनीने जागतिक दर्जाचे वेल्थ मॅनेजमेंट आणि एसआयएफ प्रशिक्षण सुरू केले
भारतातील 5000+ वितरकांना सक्षम करण्यासाठी खास तयार करण्यात आलेले प्रशिक्षण
भारतातील म्युच्युअल फंड वितरकांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, द वेल्थ कंपनीने तीन विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. यातील दोन कार्यक्रम मूडीज आणि पीजीपी अकादमी सोबत राबवले जाणार असून तिसरा द वेल्थ कंपनीने विकसित केला आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. उद्योगातील हे प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णपणे प्रायोजित आहेत आणि भविष्यातील संपत्ती व्यवस्थापन, गुंतवणूकदार वर्तन आणि नवीन काळातील गुंतवणूक उत्पादनांच्या दृष्टीने वितरकांना तयार करण्यासाठी ते डिझाइन केलेले आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर 5,000 वितरकांना सक्षम करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. यामुळे विकसित होत असलेल्या उद्योग क्षेत्रात वितरकांना सखोल ज्ञान, आत्मविश्वास तसेच आवश्यक ते कौशल्य निर्माण करण्यास मदत होईल. हे प्रशिक्षण कार्यक्रम 15 जुलै 2025 पासून सुरू होणार आहेत.
पीजीपी अकादमी: स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंडसाठी (एसआयएफ) ट्रेनिंग
एनआयएसएमच्या तेराव्या सिरीज सोबतच कॉमन डेरिव्हेटिव्ह्ज सर्टिफिकेशन एक्झामिनेशनशी संलग्न ऑनलाइन 15 (15 आठवडे) एसआयएफ प्रशिक्षण सत्रांचा (रेकॉर्डिंगसह) फायदा मिळेल. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, सहभागींना पीजीपी अकादमी आणि द वेल्थ कंपनीकडून संयुक्त प्रमाणपत्र मिळेल आणि हे सगळं अगदी निःशुल्क.
मूडीज आणि पीजीपी: आंतरराष्ट्रीय संपत्ती व्यवस्थापनातील (एआयडब्ल्यूएम) अभ्यासक्रम
जागतिक पातळीवर ग्राहकांच्या विकसित गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने यात प्रयत्न केले जातील. त्यासाठी प्रस्थापित आणि उदयोन्मुख व्यावसायिकांना विशेष प्रशिक्षण देऊन सक्षम करण्याच्या दृष्टीने एकूण 20 प्रशिक्षण सत्रे (20 आठवडे) लाइव्ह घेतली जातील. मूलभूत गोष्टींची माहिती देणारा हा कार्यक्रम सहभागींना संपत्ती व्यवस्थापनातील क्लिष्ट आव्हानांना तोंड देण्यासाठी कौशल्याने सज्ज करतो तसेच सध्याच्या विस्तारित परस्पर जोडलेल्या जगाच्या अनुरूप पर्याय देण्याची त्यांची क्षमता वाढवतो.
याशिवाय, द वेल्थ कंपनीने विशेष करून विकसित केलेल्या 'द सायकॉलॉजी ऑफ वेल्थ कॉन्व्हर्सेशन्स' या विषयावरील एका बोनस सत्राचा देखील सहभागींना फायदा होईल. हे सत्र वितरकांच्या दैनंदिन अनुभवावर आधारित आहे तसेच ग्राहकांशी जोडलेले राहण्यासाठी एक पद्धतशीर मार्ग देखील सांगेल. अनेक वर्षांपासून सोबत असल्याने आर्थिक निर्णय घेताना अनेकदा कसे अतार्किक निर्णय घेतले जातात आणि वर्षानुवर्षे व्यावहारिक अंतर्दृष्टी वापरून, वितरक गुंतवणूकदारांच्या आर्थिक सवयींना कसा आकार देतात, कसा विश्वास वाढवतात आणि अधिक अर्थपूर्ण तसेच संवाद सुधारणा कशी करतात हे देखील सांगेल.
वितरक-प्रथम दृष्टिकोनासह नवीन काळातील म्युच्युअल फंड लँडस्केपला आकार देत, द वेल्थ कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक सुश्री मधू लुनावत म्हणाल्या, "वितरक हे भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगाचा कणा आहेत. हा उपक्रम म्हणजे त्यांच्या भविष्यासाठी आमची गुंतवणूक आहे. भविष्यातील गुंतवणूकदारांना सेवा देण्यासाठी आवश्यक साधने, आत्मविश्वास तसेच माहिती देण्यासाठी हे प्रशिक्षण कार्यक्रम तयार केलेले आहेत."
यालाच जोडून, द वेल्थ कंपनीचे मुख्य धोरण अधिकारी श्री. देबाशिष मोहंती म्हणाले, "MFDs नी आज शिकण्यात गुंतवलेला प्रत्येक तास आयुष्यभराच्या क्लायंट विश्वासात बदलतो, यावर आमचा ठाम विश्वास आहे. कोणत्याही अटीशिवाय, संपूर्णपणे पारदर्शक व्यवहारासह आणि फक्त अर्थपूर्ण, व्यावहारिक समर्थनासह - वितरक-प्रथम दृष्टिकोनावर असलेला आमचा विश्वास हे अभ्यासक्रम प्रतिबिंबित करतात."
या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून, द वेल्थ कंपनी एक माहितीपूर्ण, भविष्यासाठी तयार वितरक परिसंस्था विकसित करण्याचे आपले वचन पूर्ण करते. शिक्षणात गुंतवणूक करून आणि जागतिक दर्जाची प्रमाणपत्रे विनामूल्य देऊन, द वेल्थ कंपनी केवळ प्रशिक्षणच देत नाही तर सर्वात महत्त्वाच्या भागीदारांचे - वितरकांचे - तिच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, हे देखील सिद्ध करते. हा उपक्रम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही तर त्यापेक्षा जास्त आहे - गुंतवणूक वाढावी यासाठी भारताच्या वितरक नेटवर्कला सक्षम, प्रगत आणि सुसज्ज करण्याची ही एक चळवळ आहे.
Comments
Post a Comment