क्रांतिकारी निर्णय : सूरतस्थित औद्योगिक स्टीम आणि गॅस पुरवठादार स्टीमहाऊस इंडियाने आयपीओसाठी सेबीकडे सादर केला गोपनीय डीआरएचपी

क्रांतिकारी निर्णय : सूरतस्थित औद्योगिक स्टीम आणि गॅस पुरवठादार स्टीमहाऊस इंडियाने आयपीओसाठी सेबीकडे सादर केला गोपनीय डीआरएचपी


औद्योगिक ग्राहकांसाठी केंद्रीकृत स्टीम पुरवठा करण्यासाठी समर्पित भारतातील पहिली कंपनी स्टीमहाऊस इंडियाने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) साठी गोपनीय ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (सीडीआरएचपी) दाखल केला आहे.

 01 जुलै 2025 रोजीच्या सार्वजनिक माहितीत इश्यू साइज उघड करण्यात आलेला नसला तरी, सूत्रांच्या माहितीनुसार हा इश्यू सुमारे 500-700 कोटी रु. च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

 संजू ग्रुपच्या औद्योगिक परंपरेवर उभारलेली ही कंपनी 2014 मध्ये स्थापन करण्यात आली असून तिचे मुख्यालय सूरत येथे आहे. अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विशाल एस. बुधिया यांच्या नेतृत्वाखाली स्टीमहाऊस इंडिया औद्योगिक स्टीम क्षेत्रात क्रांती घडवून आणत आहे आणि देशभरात 167 हून अधिक क्लायंट्सना सेवा पुरवत आहे.

 कंपनीचे विस्तार प्रकल्प पिराणा, अहमदाबाद; दहेज एसईझेड; वापी फेज 3; अंकलेश्वर फेज 3; पानोली फेज 2; झगडिया; नांदेसरी फेज 2 येथे सुरू असून आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि हरियाणा येथेही विस्तार करण्याचे नियोजन आहे.

 सार्वजनिक माहितीवरून हेही समोर आले आहे की संजू ग्रुपच्या एका समूह कंपनीने कम्युनिटी बॉयलर संकल्पना सुरू केली. हा पारंपरिक कॅप्टिव्ह बॉयलर्सला एक नाविन्यपूर्ण आणि केंद्रीकृत पर्याय असून त्यामुळे उत्पादन कंपन्यांना उत्सर्जन कमी करता येते, कामकाज खर्चात कपात करता येते आणि कार्यक्षमतेत वाढ होते. या स्टीमची 190 अंश तापमानाला विक्री केली जाते आणि खरेदीपासून वितरणापर्यंत IoT आणि AI चा वापर करून नाविन्यपूर्ण पद्धतीने उपयोग केला जातो.

 वापी येथील कंपनीचा पहिला वेस्ट टू स्टीम बॉयलर कार्यान्वित झाला असून, तो पेपर मिल्समधून मिळणाऱ्या नॉन-रिसायकलेबल प्लास्टिक कचऱ्याचे रूपांतर करतो. मार्च 2024 मध्ये, सार्वजनिक अहवालांनुसार, कंपनीला अहमदाबाद महानगरपालिकेकडून 5MW W2S प्रकल्प मिळाला. यात PPP मॉडेलअंतर्गत 300 टन प्रतिदिन क्षमतेच्या या प्रकल्पात डिझाइन, बांधणी, कमिशनिंग आणि देखभाल यांचा समावेश होता.

 31 ऑगस्ट 2024 अखेर कंपनीची एकूण कामकाज आणि वितरण क्षमता अनुक्रमे 330 TPH आणि 200 TPH एवढी होती. कंपनी नायट्रोजन कंप्रेशन आणि वितरण; नगरपालिका कचऱ्याचे स्टीममध्ये रूपांतर आणि एव्हिएशन लॉजिस्टिक्स अशा इतर क्षेत्रांमध्ये विस्तार करत आहे. त्या  अंतर्गत कंपनीने मालवाहतूक आणि प्रवासी विमानवाहतूक क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी नॉन शेड्यूल्ड ऑपरेटर परवाना यासाठी अर्ज केला आहे.

स्टीमहाऊस इंडिया पाईपलाईन आधारित मॉडेलचा अवलंब करते आणि तिच्याकडे सचिन, वापी, अंकलेश्वर, सरीग्राम, पानोली आणि नंदेसरी यासारख्या प्रमुख औद्योगिक केंद्रांमध्ये 45 किमी पेक्षा जास्त पाईपलाईन पायाभूत सुविधा आहे. कंपनी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे तेथे अग्रणी आहे.  ग्राहकांना त्यांच्यापर्यंत अखंड स्टीम पुरवठा मिळत असल्यामुळे व्यक्तिगत छोटे बॉयलर्स वापरण्याच्या तुलनेत उत्पादन खर्चात 25–30% पर्यंत कपात होते.

 याशिवाय, कंपनीच्या प्रगत प्रदूषण नियंत्रण प्रणालींमुळे एकत्रित आणि अनुकूलित इंधन वापराच्या माध्यमातून 65–70% पर्यंत एकूण उत्सर्जनात घट होते. यातून कंपनीची शाश्वत औद्योगिक उपाययोजनांप्रती असलेली बांधिलकी ठळकपणे दिसून येते. आर्थिक वर्ष 23-24 च्या वार्षिक अहवालानुसार कंपनीचा एकूण महसूल 291.71 कोटी रु. होता, तर EBITDA मागील आर्थिक वर्षातील 58.79 कोटी रु. वरून वाढून 70.14 कोटी रु. झाला. याच कालावधीतील नफा 25.97 कोटी रु. इतका नोंदवण्यात आला.

Bottom of Form

 


Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth