अपोलोने राष्ट्रीय डॉक्टर दिनी प्रतिबंधात्मक आरोग्याप्रती आपली वचनबद्धता जाहीर केली
अपोलोने राष्ट्रीय डॉक्टर दिनी प्रतिबंधात्मक आरोग्याप्रती आपली वचनबद्धता जाहीर केली
अपोलो भविष्यासाठी आरोग्यसेवेला सुसज्ज करत आहे
नवी मुंबई, २ जुलै २०२५ : अपोलो हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी यांनी राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून, भारताच्या आरोग्यसेवेच्या भविष्याला आकार देण्यासाठी एक नवी ऐतिहासिक वचनबद्धता जाहीर केली आहे. देशातील वाढत्या असंसर्गजन्य रोग (एनसीडी) संकटाला तोंड देण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्सने प्रतिबंधाला प्राधान्य या तत्त्वावरील देखभाल दुपटीने वाढवण्याचे ठरवले आहे. अपोलो हॉस्पिटल्सने चार दशकांहून अधिक काळ टिकवून ठेवलेल्या क्लिनिकल नेतृत्वावर आधारित, उचलण्यात आलेले हे धोरणात्मक पाऊल एआय-चालित, तंत्रज्ञान-सक्षम प्रतिबंधात्मक आरोग्यावर अपोलोचे लक्ष अधिक बळकट करेल त्यामुळे आजाराचे निदान करण्याच्या, भविष्याचे अंदाज वर्तवण्याच्या आणि त्यांचा प्रतिबंध करण्याच्या भारतातील पद्धतींमध्ये बदल घडवून आणले जातील. गेल्या चार दशकांच्या क्लिनिकल नेतृत्वाच्या आधारे उचलण्यात आलेले हे धोरणात्मक पाऊल, एनसीडी संकटाचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एआय-संचालित इंटेलिजन्सचा वापर करून रोग प्रतिबंधकतेवर अपोलोचा फोकस अधिक मजबूत करेल.
ही घोषणा १९७४ मध्ये सुरू झालेल्या एका मोहिमेचे प्रतिबिंब आहे, जेव्हा डॉ. रेड्डी यांनी भारतातील पहिली संरचित आरोग्य तपासणी सुविधा सुरू केली. तेव्हापासून, अपोलोने जागतिक स्तरावर बेंचमार्क केलेली एक इकोसिस्टिम तयार केली आहे - ज्याला ते "सायन्स ऑफ प्रिव्हेंटिव्ह हेल्थ" म्हणतात - ज्याने जगभरातील २९ दशलक्षाहून अधिक लोकांच्या जीवनावर प्रभाव निर्माण केला आहे.
डॉ. प्रताप सी रेड्डी, संस्थापक आणि अध्यक्ष, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप म्हणाले,“एक डॉक्टर म्हणून, मी आपल्या देशावर असंसर्गजन्य आजारांचा होत असलेला प्रचंड परिणाम पाहतो आहे - केवळ आरोग्यावरच नाही तर आपल्या अर्थव्यवस्थेवर, आपल्या कुटुंबांवर आणि आपल्या भविष्यावरही हा परिणाम होत आहे. ही एक मूक त्सुनामी आहे आणि तिच्याशी लढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शक्य तितक्या लवकर कारवाई करणे. आज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पुराव्यावर आधारित प्रतिबंधात्मक उपक्रमांच्या बळावर, आपल्याकडे रोग येण्यापूर्वीच धोका ओळखण्याची अभूतपूर्व क्षमता आहे - जी रोगाच्या वाढीला आळा घालण्यात मदत करते आणि बर्याच केसेसमध्ये परिस्थिती पूर्णपणे उलटवते. प्रतिबंध हा आपल्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाचा आधारस्तंभ असला पाहिजे.”
नॉन कम्युनिकल डिसीज (एनसीडी) लढा: एक राष्ट्रीय अभियान भारत एका अभूतपूर्व आरोग्य संकटाचा सामना करत आहे - एकूण मृत्यूंपैकी ६३% मृत्यू असंसर्गजन्य आजारांमुळे होतात. तरुण पिढीच्या जीवनावर या मूक साथीच्या आजाराचा परिणाम वाढत असल्याने समस्या अधिक गंभीर बनत आहे. रोगाचे लवकरात लवकर निदान आणि उपचार करण्याची शक्ती वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित झाली आहे: ८०% प्रकरणांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या रोखता येतात, मधुमेहाची गुंतागुंत ७०% प्रमाणात कमी करता येते आणि पद्धतशीर तपासणी आणि जीवनशैलीत बदल उपक्रमांच्या माध्यमातून कर्करोगाच्या मृत्युदरात ५०% घट करता येते.
अपोलोच्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा मॉडेलमध्ये एआयसीव्हीडी सारखी इनोवेशन्स आहेत, जे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी धोक्यांचा आधीच अंदाज लावण्यासाठी एक आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) मॉडेल आहे; ज्यामुळे देशावरील आजारांचा भार कमी होतो. होम डायग्नॉस्टिक्स, रिअल-टाइम डिजिटल रिपोर्ट यासारखी वैशिष्ट्ये; मोबाइल वैद्यकीय युनिट्स वंचित समुदायांना आरोग्यसेवा सेवा देत आहेत. अपोलोची व्यापक प्रतिबंधात्मक चौकट केवळ भारत सरकारच्या सार्वजनिक आरोग्य प्राधान्यांना समर्थन देते, इतकेच नव्हे तर जागतिक आरोग्य संघटनेच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी देखील सुसंगत आहे-आरोग्यसेवा फक्त मर्यादित उपचारांपुरती मर्यादित राहू नये, तिचे रूपांतर सातत्यपूर्ण निरोगीपणात व्हावे आणि आजार प्रतिबंधाचा अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळावा हा उद्देश अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपचा आहे.
Comments
Post a Comment