किडझानियातर्फे मुंबईत ‘आझादी के रंग’ या सोहळ्याचे आयोजन
किडझानियातर्फे मुंबईत ‘आझादी के रंग’ या सोहळ्याचे आयोजन
स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला पुढे नेत 20 ऑगस्ट 2025 रोजी किडझानिया मुंबईतर्फे शिक्षण, सर्जनशीलता आणि प्रेरणाने भरलेली एक खास संध्याकाळ आयोजित करण्यात आली. महाराष्ट्राच्या विधानसभेचे सन्माननीय उपसभापती श्री. अण्णासाहेब बनसोडे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुलांसोबत आणि त्यांच्या कुटुंबांसोबत त्यांनीही किडझानिया सिटीचा अनुभव घेतला. त्यांच्यासोबत उदयोन्मुख उद्योजक सिद्धार्थ बनसोडे आणि ॲड. प्रतीक कर्डक उपस्थित होते. त्यामुळे ही संध्याकाळ अधिक संस्मरणीय ठरली.
शहराच्या प्रवेशद्वाराशी सन्माननीय प्रमुख पाहुण्यांचा औपचारिक सत्कार करत या संध्येची सुरुवात झाली. त्यानंतर किडझानियाच्या रोल-प्ले स्थळांचा परिचय करून देणारी टूर आयोजित करण्यात आली होती. या टूरमध्ये अण्णासाहेब बनसोडे यांनी विविध ॲक्टिव्हिटींचा आनंद घेतला, महिंद्रा लाइफस्पेसेसचे पर्यावरणपूरक शहररचना डिझाइन समजून घेतले, टीव्हीएस रेसिंग एक्स्पिरिअन्स सेंटरमध्ये बाइक डिझायनिंग व असेंब्लीची माहिती घेतली आणि किंडर जॉयमध्ये मुलांसोबत मेजवानी तयार केली. फायर स्टेनशवर त्यांनी छोट्या अग्निशमन जवानांची भेट घेतली आणि टीमवर्क व सुरक्षिततेचे महत्त्व समजून घेतले.
त्यानंतर किडझानिया थिएटरमध्ये या सोहळ्याचा पुढील टप्पा सुरू झाला. या ठिकाणी सन्माननीय उपसभापतींनी प्रेरणादायी भाषण केले. मोठी स्वप्ने पाहावी, शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे आणि स्वतःवर विश्वास ठेवावा यासाठी त्यांनी मुलांना प्रोत्साहित केले. प्रश्नोत्तरांच्या सत्रात मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. या माध्यमातून त्यांनी मुलांना समजेल अशा भाषेत मार्गदर्शन केले. याचा मुलांवर सखोल प्रभाव पडला.
सन्माननीय पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी किडझानियाच्या व्यवस्थापनातर्फे रंगमंचावर त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या रंगतदार सांस्कृतिक नृत्यसादरीकरणात मुलांनी आपली कला आणि उत्साह सादर करत स्वातंत्र्य आणि सर्जनशीलतेची भावना अभिव्यक्त केली.
या वेळी महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपसभापती श्री. अण्णासाहेब बनसोडे म्हणाले, "मुले ही आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे खरे प्रतीक आहेत. अशा संधीमुळे त्यांना शिकण्याची, शोध घेण्याची आणि मर्यादा न ठेवता स्वप्ने पाहण्याची संधी मिळते. जिज्ञासा आणि कल्पनाशक्तीला चालना देणारे असे अर्थपूर्ण व्यासपीठ निर्माण केल्याबद्दल मी किडझानियाचे कौतुक करतो. मुलांसोबत ही संध्याकाळ घालवणे हा खरोखरच समृद्ध करणारा अनुभव ठरला.”
किडझानिया इंडियाचे चीफ बिझनेस ऑफिसर तरणदीप सिंग सेखोन म्हणाले, “किडझानियाने नेहमीच अनुभवाधारित शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना सक्षम करण्यावर विश्वास ठेवला आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने मुलांना स्वतःला मुक्तपणे आणि सर्जनशीलतेने व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. श्री. अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीने आणि प्रोत्साहनाने ही संध्याकाळ अधिकच खास झाली.”
किडझानिया मुंबईतील या उत्सवाने मुलांसाठी आणि कुटुंबांसाठी आनंददायी आठवणी आणि अर्थपूर्ण अनुभव निर्माण केले, ज्यातून स्वातंत्र्याची भावना अनोख्या आणि आकर्षक पद्धतीने प्रतिबिंबित झाली.
Comments
Post a Comment