भारतात कुठेही धावतील अशी वाहने तयार करण्यासाठी जेएसडब्ल्यू सारब्लोह मोटर्स आणि टॉमकार, यूएसए यांची धोरणात्मक भागीदारी
भारतात कुठेही धावतील अशी वाहने तयार करण्यासाठी जेएसडब्ल्यू सारब्लोह मोटर्स आणि टॉमकार, यूएसए यांची धोरणात्मक भागीदारी
संरक्षण, गृह सुरक्षा आणि औद्योगिक प्रयोगांसाठी स्वदेशी पद्धतीने धोरणात्मक प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी जेएसडब्ल्यू ग्रुपचा महत्त्वाचा उपक्रम
चंदीगड (भारत)/फिनिक्स (अॅरिझोना), 21 ऑगस्ट 2025: जेएसडब्ल्यू ग्रुप कंपनी असलेल्या जेएसडब्ल्यू डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी असलेल्या जेएसडब्ल्यू सारब्लोह मोटर्सने आज भारतातील TX श्रेणीतील एटीव्हीच्या स्थानिक उत्पादनासाठी टॉमकार यूएसए सोबत एक धोरणात्मक संयुक्त उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. टॉमकार यूएसए हा जगातील कोणत्याही भागात अत्यंत उच्च-कार्यक्षमतेने कार्यरत अशी ऑल-टेरेन वाहने (एटीव्ही) तयार करणारा जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित निर्माता आहे.
भारतीय सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF), राज्य पोलीस दल आणि टिकाऊ आणि वेगवान अशा ऑफ-रोड प्लॅटफॉर्मची आवश्यकता असलेल्या धोरणात्मक औद्योगिक क्षेत्रांसाठी स्वदेशात तयार झालेल्या निर्मितीवर भर देणाऱ्या सरकारी धोरणांच्या दृष्टीने ही ऐतिहासिक भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे. भारताच्या याच प्रयत्नांच्या अनुषंगाने JSW समूहाने हा प्रमुख उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे.
या संयुक्त उपक्रमांतर्गत, चंदीगडमधील फॅक्टरीमध्ये JSW सरब्लोह मोटर्स टॉमकार TX श्रेणीच्या गाड्यांमध्ये आपल्या गरजांनुसार बदल करून घेईल. थोडक्यात त्या गाड्यांचे स्वदेशीकरण, उत्पादन, असेंबल करेल. असे असेंबल केलेले पहिले TX युनिट २०२६ च्या सुरुवातीला भारतातील रस्त्यांवर धावण्याची अपेक्षा आहे. त्याच अनुषंगाने येत्या काही महिन्यांत अनेक संरक्षण आणि निमलष्करी एजन्सींसाठी फिल्ड चाचण्या आणि प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले आहे.
जेएसडब्ल्यू ग्रुपचे श्री. पार्थ जिंदाल म्हणाले, "जेएसडब्ल्यू सरब्लोह मोटर्स आणि टॉमकार यूएसए यांच्यातील या धोरणात्मक भागीदारीची घोषणा करताना आम्हाला आनंद होतो आहे. भारताच्या संरक्षण क्षमता वाढवण्याच्या आमच्या वचनबद्धतेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. टिकाऊपणा, लवचिकता आणि सुरक्षिततेची हमी देत या TX प्लॅटफॉर्मची रचना आमच्या सशस्त्र दलांच्या आणि सुरक्षा एजन्सीच्या आवश्यक मागण्यांची पूर्तता करण्यासाठी केली गेली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक उत्पादन क्षमतांचा परस्परांशी मेळ घालण्यावर आमचा विश्वास आहे. कारण यातूनच एक मजबूत औद्योगिक परिसंस्था तयार होईल, जी राष्ट्रीय सुरक्षा तर भक्कम करेलच पण रोजगाराच्या संधी देखील निर्माण करेल."
जेएसडब्ल्यू सारब्लोह मोटर्सचे सीईओ आणि संस्थापक संचालक श्री. जसकीरत व्लादिमीर सिंग नागरा म्हणाले, "हा संयुक्त उपक्रम म्हणजे निव्वळ व्यावसायिक भागीदारी नाही तर त्यापेक्षा अनेक पटीने जास्त आहे. दूरदृष्टी आणि धोरणीपणाचा यात मोठा वाटा आहे. भारताच्या संरक्षण आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी मजबूत, मॉड्यूलरिटी आणि विश्वासार्हता असलेले जागतिक दर्जाचे गतिशील प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या रोमांचक सहकार्यासाठी आम्ही अतयंत उत्साही आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे हे एकत्रित प्रयत्न भारत तसेच अन्य ठिकाणीही नवीन मानके स्थापित करतील."
टॉमकार यूएसएचे संस्थापक आणि प्रमुख श्री. रॅम झरची म्हणाले, "जेएसडब्ल्यू ग्रुपसोबत आमच्या धोरणात्मक संयुक्त उपक्रमाची घोषणा करताना आम्हाला आनंद होतो. टॉमकारच्या भारतातील प्रवेशाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या भागीदारी अंतर्गत आम्ही आमची कौशल्ये भारतीय सशस्त्र दलांसाठी वापरू शकू. टॉमकारच्या दशकांची मिशन-ग्रेड अभियांत्रिकी आणि जेएसडब्ल्यूचे प्रगत उत्पादन कौशल्य तसेच उत्तम नेतृत्वाची यात सांगड घातली जाईल. भारताच्या सामरिक गतिशीलता क्षमता मजबूत करण्यासोबतच आम्ही टॉमकारच्या जागतिक पातळीवरील विस्तार अधिक वाढवू, विशेषतः राईट हॅन्ड ड्राइव्ह मार्केटमध्येही टॉमकारचा विस्तार होईल."
टॉमकार यूएसएचे अंतरिम सीईओ श्री. मार्क डब्ल्यू. फॅरेज म्हणाले : "खऱ्या अर्थाने धोरणात्मक भागीदारी निर्माण करण्याच्या उद्देशाने विचारशील आणि विचारपूर्वक केलेल्या प्रक्रियेची हा संयुक्त उपक्रम म्हणजे पहिली पायरी आहे. भारतीय सैन्याला सिद्ध, युद्ध-चाचणी केलेले टॉमकार प्लॅटफॉर्म प्रदान करून युद्धाच्या आधुनिक मागण्या पूर्ण करण्यास भारताला आमची मदत होईल अशी आम्हाला आशा आहे. याव्यतिरिक्त, भारतातील विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये टॉमकारला मोठी संधी आहे, असा आमचा अंदाज आहे. खाणकाम आणि लाकूड, शोध आणि बचाव, सीमेवरील गस्त, शेती आणि त्यापलीकडेही भारतात खूप मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. देशभरातील ग्राहकांना अनोखी कामगिरी, टिकाऊपणा तसेच विश्वासार्हता प्रदान करण्यासाठी ही भागीदारी आम्हाला मदत करेल."
Comments
Post a Comment