‘ऑल टाइम प्लास्टिक्स लिमिटेड’चा आयपीओ खुला होणार गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी ·
‘ऑल टाइम प्लास्टिक्स लिमिटेड’चा आयपीओ
खुला होणार गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी
·
प्रत्येकी दोन
रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरचा प्राईज बॅंड २६० ते २७५ रुपये असा
निश्चित करण्यात आला आहे;
पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव श्रेणीत बोली लावताना प्रत्येक शेअरमागे २६ रुपयांची सवलत
देण्यात येईल.
·
‘आयपीओ’तील फ्लोअर प्राइस ही दर्शनी मूल्याच्या १३० पट असून, कॅप प्राइस ही दर्शनी मूल्याच्या १३७.५० पट आहे.
·
बोली / ऑफर
गुरुवारी, दि. ७ ऑगस्ट २०२५
रोजी खुली होईल आणि सोमवारी, दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी बंद
होईल.
·
अँकर
गुंतवणूकदारांसाठी बोलीची तारीख बुधवार, दि. ६ ऑगस्ट २०२५ निश्चित करण्यात येत आहे.
·
किमान ५४
इक्विटी शेअर्ससाठी बोली लावता येईल, त्यानंतर ५४च्या पटीतच बोली लावता येईल.
·
मुंबई, ४ ऑगस्ट २०२५ : ऑल टाइम प्लास्टिक्स लिमिटेड (“एटीपीएल” किंवा “कंपनी”) ही कंपनी
येत्या गुरुवारी, दि. ७ ऑगस्ट २०२५
रोजी आपली प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) सुरू करणार आहे. या आयपीओमध्ये अँकर
गुंतवणूकदारांसाठीची बोली प्रक्रिया बुधवार, दि. ६ ऑगस्ट
रोजी, म्हणजे बोली / ऑफर सुरू होण्याच्या एक दिवस आधी सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंड
बोर्ड ऑफ इंडियाच्या आणि इश्शू ऑफ
कॅपिटल अॅंड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन्स २०१८ (सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स) अन्वये पार पडणार आहे. सामान्य
गुंतवणूकदारांसाठी आयपीओची बोली प्रक्रिया गुरुवार, दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू होऊन सोमवार, दि. ११
ऑगस्ट २०२५ रोजी बंद होईल. (“आयपीओ इश्यूच्या तारखा”) यूपीआय मँडेट पूर्ण करण्याची
अंतिम वेळ व तारीख ११ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंतची असेल.
या आयपीओअंतर्गत २,८०० दशलक्ष (२८० कोटी) रुपयांपर्यंतच्या नवीन इक्विटी
शेअर्सचा समावेश (फ्रेश इश्यू) कंपनी करणार आहे. त्यासोबतच ४३,८५,५६२ इक्विटी शेअर्सच्या विक्रीसाठीचा प्रस्तावदेखील (ऑफर फॉर सेल) आहे. या
दोन्हींना एकत्रितपणे ‘ऑफर’ म्हणून
ओळखले जाईल.
कंपनीने फ्रेश इश्यूद्वारे मिळणाऱ्या
निव्वळ उत्पन्नाचा वापर पुढील हेतूंकरिता करण्याचा प्रस्ताव दिला आहे : (अ) कंपनीने घेतलेल्या विशिष्ट कर्जाच्या संपूर्ण किंवा
अंशतः पूर्वपरतफेड किंवा परतफेडीसाठी १४३ कोटी रुपये; (ब) माणेकपूर प्रकल्पातील उपकरणे व यंत्रसामग्रीची खरेदी आणि गोदाम यासाठी इन्स्टॉलेशन
ऑफ ओटोमेटेड स्टोरेज अॅंड रिट्रिव्हल सिस्टीम (एएसआरएस) बसविण्याकरिता अंदाजे
११३.७१ कोटी रुपये; आणि (क) सामान्य
कॉर्पोरेट गरजांसाठी उर्वरित निधी.
ऑफर फॉर सेलअंतर्गत कैलेश पुनमचंद शाह
यांच्याकडील १४,६१,८५४ इक्विटी शेअर्स, भूपेश
पुनमचंद शाह यांच्याकडील १४,६१,८५४ इक्विटी शेअर्स आणि निलेश
पुनमचंद शाह यांच्याकडील १४,६१,८५४ इक्विटी शेअर्स असा
समावेश आहे.
दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी तयार
करण्यात आलेल्या कंपनीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसची (आरएचपी) नोंदणी मुंबई येथील नोंदणी अधिकाऱ्यांकडे झाली आहे.
त्याद्वारे ऑफर करण्यात येणारे इक्विटी शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया
लिमिटेड (एनएसई) आणि बीएसई लिमिटेड (बीएसई) या दोन्ही शेअर बाजारांवर सूचीबद्ध करण्यात येणार आहेत. या आयपीओसाठी
बीएसई (बीएसई) हा शेअर बाजार निश्चित करण्यात आला आहे.
ही ऑफर बुक बिल्डिंग पद्धतीद्वारे
करण्यात येत आहे. ही प्रक्रिया सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रुल्स, १९५७ (एससीआरआऱ) मधील नियम १९(२)(ब) आणि सेबीच्या आयसीडीआरमधील
नियमन ३१ व नियमन ६(१) यांच्या अनुषंगाने राबवण्यात येत आहे. नियमन ३२(१) नुसार,
निव्वळ ऑफरमधील जास्तीत जास्त ५० टक्के हिस्सा प्रमाणानुसार
वाटपाच्या तत्त्वावर क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी (क्यूआयबी) राखीव ठेवण्यात येणार आहे (या वाटपाला "QIB पोर्शन"
असे म्हटले जाते). तसेच, कंपनी आणि बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम)
यांच्यामधील सल्लामसलतीनंतर, सेबी आयसीडीआर विनियमानुसार,
क्यूआयबी वाटपातील अधिकतम ६० टक्के हिस्सा अँकर गुंतवणूकदारांसाठी
स्वविवेकाधिकारावर वाटपासाठी राखून ठेवता येईल (हा भाग "अँकर इन्व्हेस्टर
पोर्शन" म्हणून ओळखला जातो).
एक तृतीयांश हिस्सा फक्त देशांतर्गत
म्युच्युअल फंडसाठी राखीव ठेवण्यात येतो, मात्र त्यासाठी ‘अँकर इन्व्हेस्टर अलोकेशन प्राइस’वर किंवा त्याहून अधिक
किंमतीवर देशांतर्गत म्युच्युअल फंडकडून वैध बोली मिळाल्या पाहिजेत. जर ‘अँकर
इन्व्हेस्टर’साठी राखीव ठेवलेला हिस्सा अपूर्ण राहिला किंवा त्याचे वाटप झाले नाही,
तर उर्वरित समभाग क्यूआयबी भागामध्ये (अँकर पोर्शन वगळून) सामील
केले जातील. याला ‘नेट क्यूआयबी पोर्शन’ म्हटले जाते.
‘नेट क्यूआयबी
पोर्शन’मधील ५ टक्के हिस्सा हा फक्त म्युच्युअल फंडांसाठी प्रमाणानुसार वाटपासाठी
राखीव ठेवण्यात येईल, तर उर्वरित’ नेट क्यूआयबी पोर्शन’ सर्व
‘क्यूआयबी’ गुंतवणूकदारांसाठी, त्यात म्युच्युअल फंडांचाही
समावेश असेल (अँकर इन्व्हेस्टर्स वगळता) प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध राहील.
मात्र त्यानुसार बोली ‘ऑफर प्राइस’वर किंवा त्याहून अधिक किंमतीवर प्राप्त झाल्या
पाहिजेत. म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी नेट क्यूआयबी पोर्शनच्या ५ टक्क्यांपेक्षा
कमी असेल, तर म्युच्युअल फंडांसाठीच्या वाटपाकरीता शिल्लक
राहिलेले समभाग उर्वरित ‘नेट क्यूआयबी’ हिश्श्यामध्ये समाविष्ट करून सर्व क्यूआयबी
गुंतवणूकदारांना प्रमाणानुसार वाटप केले जाईल.
नेट ऑफरपैकी किमान १५ टक्के हिस्सा नॉन-इन्स्टिट्युशनल
इन्व्हेस्टर्ससाठी प्रमाणानुसार वाटपाकरीता उपलब्ध राहील. यामध्ये (अ) अशा भागाचा
एक तृतीयांश हिस्सा २ लाखांपेक्षा जास्त आणि १० लाखांपर्यंत बोली लावणाऱ्यांसाठी
राखीव राहील, आणि (ब) उर्वरित
दोन-तृतीयांश हिस्सा १० लाखांपेक्षा जास्त रकमेची बोली लावणाऱ्यांसाठी राखीव असेल.
या उप-श्रेणींमधील कुठलाही हिस्सा अपूर्ण राहिल्यास तो दुसऱ्या उप-श्रेणीतील पात्र
अर्जदारांना वाटप करता येईल. नेट ऑफरपैकी कमाल ३५ टक्के हिस्सा किरकोळ वैयक्तिक
गुंतवणूकदारांसाठी सेबी आयसीडीआर नियमांनुसार वाटपासाठी राखीव ठेवण्यात आला आहे,
त्यासाठीदेखील ऑफर प्राइसवर किंवा त्याहून अधिक किंमतीवर वैध बोली
प्राप्त झाल्या पाहिजेत.
Comments
Post a Comment