निटकोतर्फे पहिल्या तिमाहीत ११४ टक्क्यांची वाढ
निटकोतर्फे पहिल्या तिमाहीत ११४ टक्क्यांची वाढ
अलिबाग जमीन विकास व्यवहारातून उत्पन्न आणि टाइल्स व्यवसायाचा विकास
मुंबई, 19 ऑगस्ट 2025 – निटको लिमिटेड या टाइल्स, मार्बल आणि मोझाइक क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने आर्थिक वर्ष २५- २६ च्या पहिल्या तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. अलीबाग जमिनीच्या नुकत्याच झालेल्या संयुक्त विकास करारामुळे (जेडीए) कंपनीने चांगले उत्पन्न मिळवले असून टाइल व्यवसायातही विकास साध्य केला आहे.
३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने कामकाजातून मिळवलेले एकत्रित उत्पन्न गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ७०.२२ कोटी रुपयांवरून १५०.२२ कोटी रुपयांवर गेले असून त्यात ११४ टक्क्यांची दमदार वाढ झाली आहे. एकत्रित करोत्तर नफा ४७.४६ कोटी रुपयांवर गेला असून आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीतील ४३.५२ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.
उत्पन्नातील वाढ प्रामुख्याने अलीबाग जमीन विकास व्यवहारामुळे झाली असून या व्यवहारातून तिमाहीत ५८.४२ कोटी रुपयांचा व्याजमुक्त अॅडजस्टेबल अॅडव्हान्स कंपनीला मिळाला आहे. हा करार कंपनीच्या अॅसेट मोनेटायझेशन धोरणातील लक्षणीय टप्पा असून त्याद्वारे रियल इस्टेट होल्डिंगमधील मूल्य मिळवण्याचे ध्येय आहे.
रियल इस्टेटमधून मिळणाऱ्या लाभांबरोबरच टाइल्स आणि संबंधित उत्पादन क्षेत्रांनीही स्थिर कामगिरी केली आहे. त्यातून मिळालेले उत्पन्न ६९.६६ कोटी रुपयांवर गेले असून गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत यंदा ३१ टक्क्यांची वाढ झाली आहे. यावरून निटकोच्या डिझाइनयुक्त पृष्ठभागांना असलेली मागणी आणि कामकाजातील कार्यक्षमता यावर सातत्याने दिला जात असलेला भर दिसून आला आहे.
या निकालांविषयी निटकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेक तलवार म्हणाले, ‘पहिल्या तिमाहीने आर्थिक वर्षाची दमदार सुरुवात केली आहे. अलीबाग डेव्हलपमेंट व्यवहारामुळे जमीन व्यवहारांतून मूल्य निर्मिती करण्याची आमची बांधिलकी दिसून आली असून, आमचा टाइल्स व्यवसायही सातत्यपूर्ण प्रगती करत आहे. येत्या तिमाहींमध्येही विकासाचा हा वेग कायम राखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.’
Comments
Post a Comment