वॉको फूड ने लाँच केले एनआयसी मोदक आईस्क्रीम
वॉको फूड ने लाँच केले एनआयसी मोदक आईस्क्रीम
गणेशोत्सवानिमित्त एनआयसी कडून लिमिटेड एडिशन मोदक फ्लेवर सादर
भारतात गणेशोत्सवाचा आनंददायी उत्सव सुरू होत असताना, वॉको फूड कंपनीने मर्यादित आवृत्ती एनआयसी मोदक आईस्क्रीम लाँच केले. गणपती बाप्पाच्या या आवडत्या पदार्थाची आठवण ठेवत हे आईस्क्रीम म्हणजे एनआयसीचा खास क्रिमी लूक आणि सांस्कृतिक वारसा अशा दोन्हींचे मिश्रण आहे. मखमली बेस आणि नारळ तसेच पारंपरिक मोदकांच्या गोडव्यापासून प्रेरणा घेत तयार करण्यात आलेली ही नवीन चव ग्राहकांना जुन्या आठवणी आणि आनंदाचे परिपूर्ण मिश्रण देते. याच्या प्रत्येक चमच्यागणिक कुटुंबे नवीन आठवणी तयार करतात. तसेच उत्सवाच्या काळात आवडत्या पदार्थाचा एक नवीन अनुभव घेऊ शकतात.
जितेंद्र भंडारी, संस्थापक, वॉल्को फूड कंपनी म्हणाले,"भारताच्या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा आनंद साजरा करणे आणि आधुनिक ग्राहकांना देखील तो आनंद अनुभवायला देणे हेच एनआयसीचे ध्येय आहे. मोदक आईस्क्रीम हे उत्सवाची पारंपरिकता जपत आनंद देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे एक स्वादिष्ट प्रतिबिंब आहे."
स्विगी, झोमॅटो आणि निवडक ऑनलाइन ऑर्डरिंग प्लॅटफॉर्म्स सारख्या लोकप्रिय क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तसेच सर्व एनआयसी पार्लरमधून मोदक आईस्क्रीम त्वरित ऑर्डर करता येते. खास कौटुंबिक प्रसंगांसाठी किंवा शेवटच्या क्षणी ठरणाऱ्या कार्यक्रमांच्या सेलिब्रेशनसाठी हा एकदम मस्त पर्याय आहे. लिमिटेड एडिशनमधील ही मेजवानी ग्राहकांना अगदी त्यांच्या दारात परंपरेचा आनंद मिळण्याची खात्री देते. या उत्सवी लाँचसह, वॉल्को फूडने भारतातील सर्वात प्रिय प्रीमियम आईस्क्रीम ब्रँड म्हणून एनआयसीचे स्थान अधिक भक्कम केले आहे. जे ग्राहकांना प्रादेशिक टेस्ट, उत्सवाची प्रासंगिकता आणि गुणवत्ता याचा सातत्यपूर्ण आनंद देते.
Comments
Post a Comment