डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्याधुनिक सुविधा सुरू, प्रादेशिक नेत्रसेवेचा दर्जा उंचावला
डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्याधुनिक सुविधा सुरू, प्रादेशिक नेत्रसेवेचा दर्जा उंचावला
• या रुग्णालयात सर्व प्रकारच्या नेत्र आजारांचे निदान आणि शस्त्रक्रिया तसेच शस्त्रक्रियेनंतरच्या काळजीसह डोळ्यांची काळजी घेण्याच्या सेवा उपलब्ध आहेत.
भारतातील सर्वात मोठ्या आणि नामांकित आय केअर चेनपैकी एक असलेल्या डॉ.अगरवाल्स आय हॉस्पिटलने छत्रपती संभाजीनगर येथे आपले नवीन रुग्णालय उघडले. उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत, मराठवाडा येथील रहिवाशांसाठी जागतिक दर्जाच्या नेत्ररक्षण सुविधेचा विस्तार करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
जालना रोडवरील हे रुग्णालय 5,746 चौरस फूट क्षेत्रावर वसलेले आहे. प्रभावी निदान आणि उपचाराच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगरमधील सर्वात मोठी नेत्र देखभाल सुविधा आहे. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मोतीबिंदू, काचबिंदू, दृष्टिपटल रोग, मधुमेही दृष्टिपटल विकार, बालरोग, कॉर्नियल देखभाल आणि ऑन-साइट ऑप्टिकल तसेच फार्मसीसह आधुनिक उपकरणे असलेल्या या रुग्णालयात डोळ्यांच्या काळजीवर लक्ष केंद्रित केले आहे. या नवीन सुविधेमुळे दरवर्षी 15,000 हून अधिक रुग्णांना सेवा मिळण्याची अपेक्षा आहे. दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत हे रुग्णालय सर्व वयोगटांना मोफत सल्ला सेवा देत आहे. मोफत सर्वसमावेशक नेत्र तपासणीसाठी नोंदणी करण्यासाठी रुग्ण 95000 24663 क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
हॉस्पिटल बिझनेसचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर राहुल अगरवाल म्हणाले, “अद्ययावत सुविधेमध्ये डोळ्यांची संपूर्ण काळजी सेवा पुरवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार असलेल्या अत्यंत कुशल निमवैद्यकीय (पॅरामेडिकल) आणि गैर-निमवैद्यकीय (नॉन- पॅरामेडिकल) कर्मचाऱ्यांच्या समर्पित टीमचा समावेश आहे. मोतीबिंदू, लॅसिक, रेटिना, कॉर्निया आणि रिफ्रॅक्टिव्ह परिस्थिती यासारख्या अत्याधुनिक उपचारांसाठी हे पथक आणि सुविधा सुसज्ज आहेत. आम्ही या रुग्णालयाच्या शुभारंभासह, जागतिक दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्यासोबत विश्वासार्ह नेत्र देखभालीसाठी उत्सुक आहोत. कारण आम्ही भारतातील 250+ केंद्रांमार्फत कार्यरत आहोत.
Comments
Post a Comment