टीव्हीएस मोटर कंपनीतर्फे ‘टीव्हीएस इंड्स’ डिझाइन ऑनर्स लाँच करत ‘भारतातील डिझाइन्स’ना चालना
टीव्हीएस मोटर कंपनीतर्फे ‘टीव्हीएस इंड्स’ डिझाइन ऑनर्स लाँच करत ‘भारतातील डिझाइन्स’ना चालना
· टीव्हीएस इंडस हा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म असून त्याद्वारे भारतीय संदर्भ आणि सर्जनशीलतेला अनसुरून अत्याधुनिक मोबिलिटी संकल्पना अनलॉक
· तरुण क्रिएटर्सना भविष्यवेधी, सांस्कृतिक पातळीवर सुसंगत आणि जागतिक स्तरावर सर्वांना आपल्या वाटणाऱ्या सुविधांना आकार देण्याचे आवाहन
टीव्हीएस मोटर कंपनी (टीव्हीएसएम) या दुचाकी आणि तीनचाकी वाहन क्षेत्रात जागतिक आघाडीवर असलेल्या कंपनीने ‘टीव्हीएस इंडस’ डिझाइन ऑनर्स – हा नवा, वार्षिक प्लॅटफॉर्म लाँच केला असून त्याद्वारे डिझाइन क्षेत्रातील व्हिजनरी गुणवत्ता आणि वाहतूक क्षेत्राच्या भविष्याची समीकरणे नव्याने प्रस्थापित करणाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. डिझाइन्सवर आधारित इनोव्हेशन्स क्षेत्रात रूजलेल्या या उपक्रमाद्वारे ‘मेक इन इंडिया’ अभियानाला चालना दिली जाणार आहे. त्यासाठी अर्थपूर्ण, सर्वसमावेशक, भारताचे वैविध्यपूर्ण लँडस्केप्स, जीवनशैली आणि लोकांमध्ये खोलवर रूजलेल्या सुविधांवर लक्ष केंद्रित करत टीव्ही इंडस डिझाइन ऑनर्सने भारताला जागतिक डिझाइन्सचे केंद्र बनवण्याचे ध्येय ठेवले आहे.
इंडस ही संज्ञान सिंधू संस्कृतीवरून घेण्यात आली असून ही संस्कृती जगातील सर्वात आधीच्या आणि प्रगत समाजाचे ठळक उदाहरण आहे. ही संज्ञा टीव्हीएस मोटर्सच्या भारतातील डिझाइन्सचा समृद्ध वारसा आणि प्रगतीशील, भविष्यवेधी मानसिकता यांचा मेळ घालण्याच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक आहे. या उपक्रमाअंतर्गत सिंधु संस्कृतीचा वारसा नव्याने तयार करत त्याला आधुनिक जगातील वाहतुकीच्या संदर्भात, अर्थपूर्ण आणि मानवकेंद्रीत स्वरूप दिले जाणार आहे.
‘डिझाइन हा कल्पनाशक्ती व प्रभाव यांच्यातील पूल असतो. टीव्हीएस इंडस डिझाइन ऑनर्सच्या माध्यमातून आम्ही भारतीय वाहतूक क्षेत्राची ओळख सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि आपले भविष्य यांचा मेळ घालत नव्याने तयार करू इच्छिणारे आधुनिक डिझायर्न, विचारवंत आणि क्रिएटर्सना प्लॅटफॉर्म देण्याचे ध्येय ठएवले आहे. हा उपक्रम टीव्हीएस मोटर्सची डिझाइनवर आधारित नाविन्य आणि शाश्वत वाहतूक यांच्यातील बांधिलकी दर्शवणारा आहे. हा प्लॅफॉर्म भारतीय तरुणाईमध्ये डिझाइनला चालना देत डिझाइन तसेच इतर क्षेत्रांतील गुणवत्तेला केवळ वाहतूकच नव्हे, तर वाहतुकीच्या भविष्याबद्दल जागतिक संवाद घडवून आणण्यासाठी प्रेरणा दिली जाणार आहे,’ असे टीव्हीएस मोटर कंपनीच्या डिझाइन विभागाचे उपाध्यक्ष अमित राजवाडे म्हणाले.
विद्यार्थी, तरुण व्यावसायिक आणि डिझाइन प्रेमींसाठी खुली असलेली २०२५ एडिशन संकल्पनेवर आधारित, तसेच थर, सह्यादी, कच्छ आणि मुंबई अशा वैशिष्ट्यपूर्ण प्रदेशांपासून प्रेरणा घेणारी आहे. सहभागींनी मोनोव्हील, टु- व्हीलर आणि थ्री व्हीलर फॉरमॅट अशा मोबिलिटी संकल्पनांवर आधारित वैयक्तिक प्रवेशिका दाखल करणे अपेक्षित आहे. या प्रवेशिकांना पर्यावरणीय, सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ असणे आवश्यक आहे. हे चॅलेंज नोंदणीसाठी आजपासून अधिकृतपणे खुले असून प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर २०२५ आहे.
दाखल झालेल्या प्रवेशिकांचे मूल्यांकन डिझाइन व मोबिलिटी क्षेत्रातील जागतिक नामवंतांद्वारे केले जाणार आहे. त्यासाठी संकल्पनेचा अस्सलपणा, संदर्भ, ग्राहककेंद्री स्वरूप आणि व्यवहार्यता हे निकष असतील. पहिल्या तीन विजेत्यांना ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार असून व्ह्युर्स चॉइस अवॉर्डद्वारे अतिरिक्त सन्मानही मिळणार आहे. त्याशिवाय टीव्हीएसएम डिझाइन टीममध्ये इंटर्नशीपची संधीही दिली जाणार आहे.
सहभागींना टीव्हीएसची अधिकृत वेबसाइट www.tvsindus.com वर नोंदणी करता येईल. स्पर्धेत मोफत सहभाग घेता येणार असून ती केवळ वैयक्तिक सहभागापुरती मर्यादित आहे. सर्व प्रकारच्या शैक्षणिक पार्श्वभूमीसाठी ती खुली आहे. टीव्हीएस इंडस डिझाइन ऑनर्स लाँच करत टीव्हीएस मोटर्सने डिझाइनवर आधारित नाविन्य आणि शाश्वत वाहतुकीप्रती आपली बांधिलकी दृढ केली आहे. त्याचप्रमाणे कंपनीने जागतिक डिझाइन क्षेत्राचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या भारतीय क्रिएटर्साचा विकास करण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.
Comments
Post a Comment