महिंद्रा तर्फे नवीन मापदंड प्रस्थापित : XUV 3XO REVX A बनली 12 लाख रु.च्या आतील किंमतीतील डॉल्बी अॅटमॉस सुविधा असलेली जगातली पहिली एसयूव्ही प्रीमियम ऑडिओ अनुभवासह अॅक्सेसिबिलिटीची पुनर्व्याख्या

 महिंद्रा तर्फे नवीन मापदंड प्रस्थापित : XUV 3XO REVX A बनली 12 लाख रु.च्या आतील किंमतीतील डॉल्बी अॅटमॉस सुविधा असलेली जगातली पहिली एसयूव्ही

प्रीमियम ऑडिओ अनुभवासह अॅक्सेसिबिलिटीची पुनर्व्याख्या


इमर्सिव्ह एंटरटेनमेंट अनुभवामध्ये आघाडीवर असलेली कंपनी डॉल्बी लॅबोरेटरीज, Inc. (NYSE: DLB) आणि भारतातील अग्रगण्य एसयूव्ही उत्पादक महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या दोन कंपन्या अधिक अॅक्सेसिबल गाड्यांमध्ये ऑडिओ एंटरटेनमेंट अनुभवाची पुनर्व्याख्या करणार असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. महिंद्राच्या वैशिष्ट्यपूर्ण XUV 3XO मध्ये डॉल्बी अॅटमॉस सादर करत त्याची सुरुवात नुकत्याच सादर करण्यात आलेल्या XUV 3XO REVX A पासून होत आहे. यामुळे महिंद्रा XUV 3XO REVX A ही 12 लाख रु.च्या आतील किंमतीतील (एक्स शोरूम) डॉल्बी अॅटमॉस सुविधा असलेली जगातली पहिली एसयूव्ही ठरत आहे.

मुळात सिनेमा साठी निर्माण झालेला डॉल्बी अॅटमॉस हा एंटरटेनमेंट अनुभवण्याचा एक नवा मार्ग आहे. यात कलात्मक अभिव्यक्ती पूर्ण क्षमतेने अनुभवता येते. श्रोते त्यांच्या आवडत्या कंटेंटमध्ये गुंगून जातात आणि निर्माते, कलाकार आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये अधिक खोल संबंध प्रस्थापित होतो. गाडीत, डॉल्बी अॅटमॉस एंटरटेनमेंटमुळे साध्या संगीत, कार्यक्रम ऐकण्याच्या अनुभवाच्या पलीकडे जाऊन अभूतपूर्व स्पष्टता आणि खोलीसह तपशील कळतो.  ग्राहकांना त्यांच्या आवडीचे संगीत ऐकताना नवीन भावनिक आनंद मिळतो. डॉल्बी अॅटमॉस जवळजवळ प्रत्येक गाडीला एक अशी जागा बनवते जिथे ड्रायव्हर्स आणि पॅसेंजर्स त्यांच्या आवडत्या मनोरंजनामधून खूप अधिक काही मिळवू शकतात.

प्रवास करताना कामगिरी, उपलब्धता आणि उच्च दर्जाचा ऑडिओ यांना महत्व देणाऱ्या आधुनिक भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजांना पूरक ठरणारा उन्नत मनोरंजनात्मक अनुभव डॉल्बी अॅटमॉस मधून मिळतो.

REVX A च्या जोडीला डॉल्बी अॅटमॉस हे AX5L, AX7 आणि AX7L प्रकारांमध्ये देखील उपलब्ध असेल. या सिस्टीममध्ये सहा-स्पीकर ऑडिओ लेआउट आहे, जो XUV 3XO च्या युनिक केबिन आर्किटेक्चरशी जुळवून घेतला गेला आहे. त्यामुळे पॅसेंजर्सना इमर्सिव्ह साउंड अनुभव मिळतो. AX7L प्रकारामध्ये अतिरिक्त सबवूफर आहे. तो अधिक डीप बास आणि अधिक स्पष्ट आवाज देतो आणि सिनेमॅटिक साउंडस्केप तयार करतो. डॉल्बी अॅटमॉस असलेले XUV 3XO चे हे चार प्रकार ग्राहकांसाठी सप्टेंबरच्या मध्यापासून उपलब्ध असतील.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह बिझनेस (डेझिग्नेट) प्रेसिडेंट आर. वेलुसामी म्हणाले: “महिंद्रा मध्ये आम्ही प्रगत नाविन्यपूर्ण गोष्टीचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीकोनाने काम करतो. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांसाठी या गोष्टी उपलब्ध होतात. आम्हाला अभिमान वाटतो की XUV 3XO सोबत आम्ही एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. XUV 3XO REVX A पासून 12 लाख रु. किंमतीच्या आत डॉल्बी अॅटमॉससह सादर करून जगातील पहिले उदाहरण ठरली आहे. सर्वसाधारण ग्राहकांच्या मोठ्या समूहासाठी इमर्सिव्ह साउंडसह इन-केबिन ऑडिओची पुनर्व्याख्याच त्यामुळे होत असून त्यांचा प्रत्येक प्रवास बदलून टाकणारा ठरणार आहे. XUV 3XO मध्ये डॉल्बी अॅटमॉस सारखी प्रीमियम फिचर्स आणून आम्ही आजच्या एसयूव्ही  खरेदीदारांच्या बदलत्या आकांक्षांशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवत आहोत.”

डॉल्बी लॅबोरेटरीजचे कमर्शियल पार्टनरशिप्स - IMEA चे सीनियर डायरेक्टर करण ग्रोव्हर म्हणाले: “उत्तम आवाज प्रत्येकासाठी, सर्वत्र उपलब्ध असायला हवा असे आम्हाला वाटते. महिंद्रा XUV 3XO सोबत आम्ही डॉल्बी अॅटमॉस अधिकाधिक भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्यायोगे कारमधील गुंतवून टाकणारे, आकर्षक मनोरंजन  आजवर कधीही नव्हते एवढे सर्वांसाठी सहज शक्य, उपलब्ध बनवत आहोत. केबिनचे रुपांतर  ‘व्हील्सवरील पर्सनलाइज्ड कॉन्सर्ट’ मध्ये बदलून आम्ही लोकांच्या रोजच्या ड्राइव्हच्या अनुभवात परिवर्तन घडवून आणत आहोत. इन-केबिन मनोरंजनाची मर्यादा आम्ही वाढवत असताना आणि आमच्या ग्राहकांना अधिकाधिक विलक्षण अनुभव सादर करताना हा आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा क्षण आहे.”

दैनंदिन प्रवास असो किंवा विकेंडला कधीतरी करण्याचा प्रवास असो; डॉल्बी अॅटमॉस प्रत्येक ड्राइव्हला आकर्षक, गुंतवून ठेवणाऱ्या मनोरंजनात्मक मेजवानीत बदलते. गाना स्ट्रीमिंग थेट इन्फोटेन्मेंट यंत्रणेमध्ये बसवलेले असल्यामुळे प्रवासी कोणत्याही वेळी आपल्या कार मध्ये डॉल्बी अॅटमॉस म्युझिक अॅक्सेस करू शकतात. त्यायोगे प्रत्येक प्रवास अविस्मरणीय ठरतो.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202