कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री शुक्रवार 10 ऑक्टोबर 2025 पासून होणार सुरू
कॅनरा
एचएसबीसी लाईफ इन्शुरन्स कंपनीची प्राथमिक समभाग विक्री
शुक्रवार 10 ऑक्टोबर 2025 पासून होणार सुरू
· प्रति इक्विटी शेअरसाठी 100 रु. ते 106 रु. किंमतपट्टा निश्चित
· फ्लोअर प्राईस इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्याच्या 10.00 पट आणि कॅप प्राईस इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्याच्या 10.60 पट
· बोली/ऑफर शुक्रवार 10 ऑक्टोबर 2025 रोजी खुली होईल आणि मंगळवार, 14 ऑक्टोबर 2025 रोजी बंद होईल (“Bid Dates”).
· यूपीआय मॅनडेटची शेवटची वेळ आणि दिनांक बोली/ऑफर बंद होण्याच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता
· प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक गुरूवार, 09 ऑक्टोबर 2025 आहे.
· प्रमुख गुंतवणूकदाराची बोली/ऑफर वेळ बोली/ऑफर सुरु होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी
· बोली किमान 140 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 140 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल (“No. of Bids”)
कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची (“कंपनी”) प्रती शेअर 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरसाठीची प्राथमिक समभाग विक्री (“इक्विटी शेअर्स”) शुक्रवार
10 ऑक्टोबर 2025 रोजी खुली करण्याचा प्रस्ताव आहे. कंपनीच्या
प्राथमिक समभाग विक्री ऑफरमध्ये प्रवर्तक विक्री समभागधारकांकडून 237,500,000 पर्यंतच्या
इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल आहे. प्रति इक्विटी शेअरसाठी 100 रु. ते 106
रु. किंमतपट्टा निश्चित करण्यात
आला आहे.
एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, बीएनपी परिबास, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, जेएम फायनान्शीयल लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायर्स लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.
ही ऑफर 1957 च्या SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(1) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR च्या 32(1) नियमांनुसार, ऑफरच्या 50% पेक्षा जास्त नसलेला भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते.
त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये समाविष्ट केले जातील.
Comments
Post a Comment