मानसिक आरोग्यावरील भारतातील पहिला सांस्कृतिक महोत्सव
मानसिक आरोग्यावरील भारतातील पहिला सांस्कृतिक महोत्सव
‘अनंतरंग २०२५’मध्ये मानसिक आरोग्याविषयी संभाषणाला मिळाली चालना
मुंबई, १० ऑक्टोबर २०२५ :जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने वेल्स्पन फाउंडेशनच्या वतीने मुंबईतील सहारा स्टार येथे ’अनंतरंग’ या मानसिक आरोग्य महोत्सवाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले. या निमित्ताने मन आणि संस्कृतीचा एक परिवर्तनकारी उत्सव साजरा होताना दिसला. ‘अनंतरंग‘ हा मानसिक आरोग्याला समर्पित असा देशातील पहिला सांस्कृतिक महोत्सव आहे. ख्यातनाम कवी आणि गीतकार जावेद अख्तर आणि वेल्स्पन वर्ल्डच्या अॅपेक्स सदस्यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. कला, संवाद आणि जिवंत अनुभव यांचा मिलाफ करणाऱ्या एका दिवसाचा अनुभव या निमित्ताने आला. मानसिक आरोग्याविषयी देशात काय चर्चा होते, याची या निमित्ताने पुन्हा नव्याने मांडणी करण्यात आली.
’अनंतरंग’च्या निमित्ताने कलाकार, शिक्षक, मानसशास्त्रज्ञ, धोरणतज्ज्ञ आणि क्रिएटर्स असे ६०० पेक्षा अधिक सहभागी एकत्र आले. वैयक्तिक आणि सांस्कृतिक प्रवासाच्या रूपाने मानसिक आरोग्याचा शोध घेण्यासाठी त्यांना प्रथमच अशा प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले.
प्रामुख्याने क्लिनिकल आणि धोरणात्मक अंतरांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या पारंपारिक शिखर परिषदेच्या उलट, अनंतरंगमध्ये विज्ञानावर आधारित सांस्कृतिक दृष्टिकोनातून मानसिक आरोग्याकडे पाहण्यात आले. यात भारतातील कथा-कहाण्या, कुटुंबे, कामाची ठिकाणे आणि सर्जनशील परंपरा भावनिक आरोग्याला कसे आकार देतात याची समीक्षा करण्यात आली.
वेल्स्पन ग्रुपचे अध्यक्ष आणि मुख्य सांस्कृतिक अधिकारी दीपक कश्यप म्हणाले, “भारतातील मानसिक आरोग्य कव्हरेजचा एक मोठा भाग अजूनही बदनामी, अज्ञान किंवा पायाभूत सुविधांमधील तफावती यांच्याभोवती फिरतो. ’अनंतरंग’च्या माध्यमातून मानसिक आरोग्याला केवळ वैयक्तिक किंवा वैद्यकीय चिंता म्हणून नव्हे तर आपण कसे जगतो, काम करतो, कुटुंबांची जोपासना करतो आणि एकमेकांची काळजी कशी घेतो याची व्याख्या करणारी सांस्कृतिक प्राथमिकता म्हणून पुढे आणण्याची आमची इच्छा आहे. हा महोत्सव मानसशास्त्रातील विज्ञान व संस्कृतीच्या पुराव्यांवर आधारित संवादाभोवती केंद्रित होता.”
अनंतरंग महोत्सवात आठ क्युरेटेड सत्रांमधून मानसिक आरोग्याचे विविध दृष्टिकोनांतून परीक्षण करण्यात आले. संस्कृती, अस्मिता आणि भावना भारताच्या सामूहिक मानसिकतेला कसे आकार देतात यावर यात प्रकाश टाकण्यात आला.
जावेद अख्तर यांच्या नेतृत्वाखाली आणि दीपक कश्यप यांनी सूत्रसंचालन केलेल्या 'कविता, दृष्टीकोन आणि मन' या सत्रात शब्दांचे रूपांतर लवचिकता आणि आत्म-शोधाच्या साधनांमध्ये करून कविता आणि कथाकथनामुळे वैयक्तिक कथांची पुनर्प्राप्ती करण्यास कशी मदत होते, याचा मागोवा घेण्यात आला. साहित्याच्या भूमिकेबद्दल बोलताना जावेद अख्तर म्हणाले, "चांगले साहित्य वाचल्याने सहानुभूती निर्माण होते. साहित्याच्या माध्यमातून, व्यक्तीला वेगवेगळ्या पात्रांचा, परिस्थितीचा आणि दृष्टिकोनाचा सामना करावा लागतो, जे सर्व वाचकांना इतरांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि सहानुभूती विकसित करण्यास मदत करतात."
तनुजा चंद्रा, गझल धालीवाल आणि सुमोना चक्रवर्ती यांचा सहभाग असलेल्या 'लाईट्स, कॅमेरा, मेंटल हेल्थ' या सत्रात कथाकथनाच्या माध्यमातून रूढीवादी विचारांच्या पलीकडे जाऊन चित्रपट सहानुभूती कशी निर्माण करू शकतात याचा आढावा घेण्यात आला.
'माइंड द पॉलिसी गॅप: मेंटल हेल्थ इन इंडिया' सत्रात अॅड. असीम सरोदे, विश्वजीत देशमुख, स्वप्नील पांगे आणि रूपा चौबळ यांनी एकत्र येत सुलभ, मानवीय मानसिक आरोग्य सेवेसाठी कायदा, धोरण आणि वैद्यकीय प्रॅक्टिस एकमेकांशी कसे सहकार्य करू शकतात यावर चर्चा केली.
'बियॉन्ड गुड व्हायब्स: द कॉस्ट ऑफ टॉक्सिक पॉझिटिव्हिटी' या सत्रात डॉ. अंजली छाब्रिया, इशांत कुमार आणि सलेहा योहान यांनी सहभाग घेतला. यात त्यांनी वेदनेला दाबून टाकणाऱ्या आणि उपचारांना अडथळा आणणाऱ्या अदम्य आशावादाच्या संस्कृतीला आव्हान दिले.
'बियॉन्ड ३७७: क्विअर मेंटल हेल्थ इन इंडिया' यात प्रिन्स मानवेंद्र सिंग गोहिल, जैनब पटेल, श्रुती चक्रवर्ती आणि अनिश गावंडे यांचा सहभाग होता. या सत्रात त्यांनी ओळख, स्वीकृती आणि चिवटपणाच्या वैयक्तिक कहाण्या सांगून कलम 377 नंतरच्या आव्हानांवर प्रकाश टाकला.
'आधुनिक भारतातील पालकत्व' या सत्रात डॉ. समिंदर सावंत आणि स्निग्धा मिश्रा यांनी वाढत्या गुंतागुंतीच्या जगात भावनिकदृष्ट्या लवचिक मुलांचे संगोपन कसे करावे यावर विचारमंथन केले.
आरती केडिया यांच्या नेतृत्वाखालील 'गट फिलिंग्स' या सत्रात नृत्य आणि सायकोड्रामा यांसारख्या शरीर-आधारित उपचारपद्धती शब्दांत व्यक्त न होऊ शकणाऱ्या भावनांना मुक्त करण्यास कशी मदत करतात हे दाखविण्यात आले.
यावेळी शनाया राठोड यांचे बहारदार कथक नृत्य सादरीकरणसुद्धा झाले. हालचालींच्या माध्यमातून त्यांच्या सुंदर कथाकथनाने प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला आणि हालचालींद्वारे उपचारांच्या संकल्पनेला मूर्त रूप मिळाले. संगीत, कविता, चित्रपट आणि कार्यशाळांच्या माध्यमातून 'अनंतरंग'ने मुक्त संवाद आणि समुदायावर आधारित उपचारांना चालना दिली, तसेच मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी संस्कृती आणि सर्जनशील अभिव्यक्तीच्या भूमिकेला पुराव्याच्या आधारे बळ दिले. या कार्यक्रमाला मिळालेल्या यशामुळे 'अनंतरंग' एक वार्षिक व्यासपीठ बनवण्याची योजना वेल्सपन फाउंडेशन आखत आहे. त्याद्वारे मानसिक आरोग्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कला, संस्कृती आणि संवादाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधील आवाजांना एकत्र आणण्यात येईल.
Comments
Post a Comment