टर्बो ईव्ही १००० आला रे! ऑयलर मोटर्स ने मुंबईमध्ये

 टर्बो ईव्ही १००० आला रे! ऑयलर मोटर्स ने मुंबईमध्ये  

दाखल केला जगातील पहिला १ टन क्षमतेचा इलेक्ट्रिक मिनी ट्रक

√शहरातील वाहतुकीचे मार्ग, वारंवार फेऱ्या आणि खर्च-जागरूक चालक लक्षात घेऊन वाहनाची रचना

√  वाहन प्रमाणित १ टी पेलोड, १४० -१७० किमीची वास्तविक श्रेणी, १.१५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक बचत.

इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या  ऑयलर मोटर्स  एक टन क्षमतेचा ४ डब्ल्यू ऑयलर टर्बो १००० इलेक्ट्रिक  व्यावसायिक वाहन लाँच करण्याची घोषणा केली.शहराची रहदारी विनासायास धावू शकेल, वजन वाहून नेऊ शकेल त्याचवेळी  दररोज धावण्याच्या खर्चावर बचत होईल अशा प्रकारच्या गरजा लक्षात घेऊन या ट्रकची विशेषत: चालक  आणि व्यवसायांच्यादृष्टीने निर्मिती केली आहे, ५.९९ लाख रुपयांपासून  (एक्स-शोरूम)  उपलब्ध असलेला टर्बो ईव्ही १००० हे जगातील सर्वात परवडणारे एक टन भर पेलवू शकेल असे  इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन असून अन्य डिझेल वाहनांच्या  तुलनेत वार्षिक बचत १.१५ लाख रुपयांची बचत करते. यासह  अतुलनीय कामगिरी आणि उच्च परवडणारी किंमत देणारा ऑयलर टर्बो ईव्ही १००० हा जगातील पहिला ईव्ही मिनी ट्रक ठरला असून मुंबईच्या व्यावसायिक कामकाजासाठी  गेम-चेंजर बनला आहे.

डिझेल आणि सीएनजीचे पाठबळ असलेल्या  मुंबईच्या व्यावसायिक वाहन इकोसिस्टममध्ये आता स्थित्यंतर घडत आहे.   वाढत्या वाढत इंधन खर्च, पुरोगामी धोरणे आणि इलेक्ट्रिक  तंत्रज्ञानमध्ये वाढता आत्मविश्वास यासह मुंबई शहर स्वच्छ, शाश्वत आणि अधिक कार्यक्षम मोबिलिटीला प्राधान्य देऊ लागले आहेत.  कमी कामकाज खर्चापासून सुधारित शाश्वतता पर्यंत व्यवसाय आणि फ्लीट ऑपरेटर यांना देखील इलेक्ट्रिक वाहनांचे दीर्घमुल्य जाणवले असून ते   विश्वसनीयता, कामगिरी आणि भक्कम सहाय्य्यभुत पायाभूत सुविधा  एकत्रित आणणाऱ्या उपाययोजना शोधात आहेत. 

या गरजा अचूकपणे सोडवण्याच्यादृष्टीनेच टर्बो ईव्ही १००० ट्र्कची रचना करण्यात आली आहे. सांगण्यासाठी अभियंता आहेत. हे मधील पहिले इलेक्ट्रिक कमर्शियल वाहन आहे. १४० एनएम टॉर्क,  आर १३ व्हील प्लॅटफॉर्मवर  २३० मिमी डिस्क ब्रेक्स आणि १४०   १७०  किमीची वास्तविक-जगातील श्रेणी देणारे हे त्याच्या वर्गातील एक टन वजनी गटातील पहिले इलेक्ट्रिक वाहन आहे. सुरक्षितता, वेग किंवा पेलोडवर तडजोड न करता, हा तर्क वाहन चालकाला  आत्मविश्वासाने शहराच्या रस्ते हाताळण्यास सक्षम करते. टर्बोमध्ये सीसीएस २ फास्ट-चार्जिंग क्षमता देखील आहे, सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर केवळ १५ मिनिटांच्या चार्जिंगसह उद्योग क्षेत्रात प्रथमच ५० किमी श्रेणीची देत आहे.   त्याची भक्कम २.५  मिमी लॅडर फ्रेम, आयपी ६७-रेटेड बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि लेसर-वेल्डेड बॅटरी मॉड्यूल टिकाऊपणा आणि विश्वसनीयता सुनिश्चित करतात, वाहन चालकांना अधिक फेऱ्या पूर्ण करण्यात आणि  डाउनटाइम कमी करण्यास मदत करतात आणि दैनंदिन कामे वाढण्यास सहाय्य्यभुत ठरतात. कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि परवडणारी क्षमता एकत्रित करण्याबरोबरच डिझेल आणि इतर आयसीई वाहनांसाठी  विश्वासार्ह, उच्च-कार्यक्षमता पर्याय शोधणारे लहान वाहन मालक  आणि चालक-उद्योजक यांच्यासाठी टर्बो ईव्ही १००० वाहन बाजारातील महत्वाची पोकळी भरून काढते. 

बाजारात हे वाहन दाखल करतांना  ऑयलर मोटर्स चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कुमार म्हणाले, "आमची मुंबई व्यावसायिक वाहन चालकांच्या मेहनतीवर चालते. हे वाहन चालक न थकता  शहरातील सर्वात व्यस्त रस्त्यांमधील दररोजच्या आवश्यक वस्तूंपासून जड वस्तूंकडे सर्व काही अथकपणे वितरित करत असतात.टर्बो ईव्ही १००० सह, आम्ही फक्त एक वाहन सुरू करत नाही; आम्ही शहरी लॉजिस्टिक्ससाठी एक नवीन बेंचमार्क सेट करीत आहोत.मुंबईच्या वास्तविक-जगातील परिस्थितीसाठी अनुकूल टर्बो ईव्ही १००० कमी  खर्च आणि जास्त नफा देतानाच  पारंपारिक पर्यायांना मागे टाकते.महाराष्ट्राच्या पुरोगामी इलेक्ट्रिक वाहन धोरण  २०२५ च्या पाठबळावर  टर्बो ईव्ही १००० शहराच्या इलेक्ट्रिक गतिशीलतेमध्ये नवा आयाम देईल आणि शाश्वत वाहतुकीच्या या नवीन युगाचे नेतृत्व करण्यासाठी चालक आणि व्यवसायांना सक्षम बनवेल असा आम्हाला विश्वास आहे"

टर्बो ईव्ही १००० सिटी, फास्ट चार्ज आणि मॅक्सएक्स अशा तीन प्रकारांमध्ये उपलब्ध असून त्यांची किंमत अनुक्रमे ५,९९,९९९ रु, ८,१९,९९९ रु आणि ७,१९,९९९ रु आहे. ४९,९९९ रुपये डाऊन पेमेंट सह महिना १०,०००  रुपयांपासून सुरू होणारे सोपे ईएमआय पर्याय देखील आहे. 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth