इफ्फी 2025 दिवस 04: सर्जनशील मनांचा आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांचा संगम
इफ्फी 2025 दिवस 04: सर्जनशील मनांचा आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांचा संगम
दिवसाची सुरुवात क्रीएटीव्ह माईंडज् आॅफ टुमारो अर्थात उद्याची सर्जनशील मने भविष्यातील सर्जनशील तरुणाई (सीएमओटी) च्या 48-तासांचे आव्हान याच्या भव्य समारोपाने झाली. तरुण चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या कलाकृती सादर करताना थकवा, समाधान आणि आनंद यांची मिश्र अभिव्यक्ती प्रेक्षकांना जाणवली.
पीआयबी माध्यम केंद्र हा दिवसभर इफ्फीचा धडधडता केंद्रबिंदू ठरला. येथे अनेक महत्त्वाच्या पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्या. ‘डे ताल पालो’ (इव्हान डेरीयल ओर्टीझ लॅंड्राॅन, जोस फेलीक्स गोमेझ) आणि ‘पाईक रिव्हर’ (राॅबर्ट सारकीज) या चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी व कलाकारांनी त्यांच्या प्रभावी कथा मांडल्या. ‘सी साईड सेरेंडीपीटी’ (टोमोमी योशीमुरा) आणि ‘टायगर’ (आंशूल चौहान, कोसेई कुडो, मिना मोटेकी) यांच्या पथकांनी आशियाई सिनेमाची वाढती उपस्थिती अधोरेखित केली.
भारतीय प्रादेशिक चित्रपट आणि माहितीपटांनीही आपली चमक दाखवली. संदेश कडूर, परेश मोकाशी आणि देबांगकर बोर्गोहेन यांनी त्यांच्या उल्लेखनीय चित्रपटांबाबत अर्थात ‘निलगिरीज – अ शेअर्ड वाईल्डरनेस’, ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ आणि ‘सिकार’ माध्यमांशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय कला सर्जनशीलताही मनमोहक ठरली, जिथे ख्रिस्टीना थेरेसा तोउर्नाटेझेस(कार्ला) आणि हायकवा चीए (रीनोईर) यांनी संयुक्त सत्रात त्यांच्या सर्जनशील प्रवासाबद्दल सांगितले.
चौथ्या दिवसाचा मुख्य आकर्षण ठरला, अत्यंत प्रतीक्षित मास्टरक्लास: ‘गिव्हींग अप इज नाॅट अ चाॅईस!’. दिग्गज अभिनेता आणि वक्ते अनुपम खेर यांनी कला अकादमी येथे प्रभावी आणि प्रेरणादायी भाषण करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. चिकाटी आणि आवेश हे दिवसाचे मुख्य सूत्र त्यांच्या भाषणाने अधिक दृढ केले.
सीएमओटीच्या 48- तासांच्या आव्हानाचा समारोप
56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आयएफएफआय) 2025 मधील 48-तासांच्या क्रीएटीव्ह माईंडज् आॅफ टुमारो (सीएमओटी) आव्हानाचा समारोप आज 23 नोव्हेंबर 2025 रोजी गोवा येथील कला अकादमीमध्ये झाला.
Comments
Post a Comment