इफ्फीमध्ये कामरान यांच्या नवीन पुस्तकाने घटक यांच्या चित्रपटीय अद्भुततेचे केले पुनरुज्जीवन
इफ्फीमध्ये कामरान यांच्या नवीन पुस्तकाने घटक यांच्या चित्रपटीय अद्भुततेचे केले पुनरुज्जीवन
(अशोक रा. शिंदे यांजकडून)
इफ्फी मधील पत्रकार परिषदेच्या सभागृहात आज चित्रपट निर्माते आणि आयआयटी मुंबईचे प्राध्यापक मजहर कामरान यांच्या 'माँ, उमा, पद्मा: द एपिक सिनेमा ऑफ ऋत्विक घटक' या नवीन पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाची सुरुवात एका गंभीर कार्यक्रमाने झाली, मान्यवरांनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यानंतर भारतातील सर्वात प्रभावशाली चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेल्या ऋत्विक घटक यांच्या सन्मानार्थ उबदार आणि अंतर्दृष्टीपूर्ण संवाद साधला.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाचे (डीपीडी) प्रमुख महासंचालक भूपेंद्र कैंथोला यांच्या हस्ते या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन झाले. प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी यांनी परिषदेत सहभाग घेतला आणि या प्रसंगाला सौहार्द आणि भारदस्तपणा मिळवून दिला
डीपीडीने 'माँ, उमा, पद्मा' प्रकाशित करण्याचा निर्णय का घेतला हे कैंथोला यांनी सविस्तरपणे सांगितले. त्यांनी वेव्हज समिट 2025 मध्ये केलेल्या घोषणेची आठवण करून दिली. हे वर्ष घटक यांच्यासह पाच दिग्गज चित्रपट व्यक्तिमत्त्वांच्या शताब्दीला समर्पित आहे. डीपीडी अशी पुस्तके प्रकाशित करते जी सर्वांना उपलब्ध असतील आणि परवडतील. कामरान यांना या दृष्टिकोनासह काम करण्यास आनंद झाला आणि सर्वकाही जुळले," असे त्यांनी सांगितले. त्यांनी असेही अधोरेखित केले की पुस्तकाचे मुखपृष्ठ आयआयटी मुंबईतील कामरान यांच्या स्वतःच्या विद्यार्थ्यांनी डिझाइन केले आहे. असे सर्जनशील सहकार्य लाभल्याने लेखकाचा आनंद द्विगुणित झाला, असेही कंथोला यांनी सांगितले.

कामरान यांनी आपल्या शब्दांना पुस्तकाच्या रूपात आकार घेताना पाहिल्यावर त्यांच्या मनात उमटलेल्या भावना कल्लोळाबद्दल सांगितले. वाचक कधीकधी त्यांच्याशी सहमत असतील किंवा कधीकधी त्यांच्याशी मतभेद असतील हे मान्य करून त्यांनी प्रत्येक शब्द लिहिला आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय चित्रपटसृष्टीतील घटक यांच्या स्थानाबद्दल बोलताना कामरान म्हणाले की जरी आज ऋत्विक घटक यांचा गौरव केला जात असला तरीही घटक हे बऱ्याचदा दुर्लक्षित राहिले. त्यांच्याकडे दूरदृष्टीची ताकद असूनही त्यांना त्यांचे चित्रपट बनवण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागला. " आपण जेंव्हा भारतीय चित्रपटांचा काळानुसार विचार करतो, तेव्हा घटक यांचा एक चित्रपट नेहमीच तिथे असतो," असे कामरान यांनी स्पष्ट केले.
कामरान यांनी ऋत्विक घटक यांच्याकडे औपचारिक फिल्म स्कूल प्रशिक्षणाच्या आभावाबद्दल असलेला गैरसमज दूर केला. "ते अत्यंत कठोर पद्धतीने शिकले होते," असे कामरान यांनी सांगितले. घटक यांचे प्रारंभीच्या काळातील लेखन, त्यांच्या समकालीन महान व्यक्तींसोबतचे त्यांचे सहकार्य तसेच आयझेनस्टाईन आणि स्टॅनिस्लाव्हस्की यांच्या कामांशी त्यांचा सखोल नात्याचा कामरान यांनी उल्लेख केला. घटक यांनी काही काळासाठी एफ टी आय आय मध्ये अध्यापनही केले होते याची त्यांनी आठवण करून दिली. यातून चित्रपट विषयक शिक्षण अनेक मार्गांनी घडू शकते हे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ही चर्चा लवकरच प्रकाशन विभाग संचालनालयाच्या भारतीय चित्रपटांवरील पुस्तकांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या व्यापक उपक्रमाकडे वळली. अलिकडच्या काळात 12 पुस्तके प्रकाशित झाली आहेत, ज्यात फाळके पुरस्कार विजेत्यांवर अलिकडचा खंड आणि एफ टी आय आय च्या लेन्साइट जर्नलमधील लेखांचा आगामी संग्रह समाविष्ट असून सुलभता वाढविण्यासाठी आता तो हिंदी भाषेत प्रकाशित होत आहे, अशी माहिती भूपेंद्र कैंथोला यांनी दिली. अजून पाच पुस्तके तयार होत आहेत ज्यात लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि लता मंगेशकर यांच्यासारख्या व्यक्तींचा समावेश असेल, अशी घोषणा त्यांनी केली.
ही चर्चा अखेर ऋत्विक घटक यांच्या कार्यात वारंवार दिसून येणाऱी स्त्री-प्रतिमा, जी कामरान यांच्या शीर्षकातील 'माँ, उमा आणि पद्मा—यात दिसते, त्याकडे वळली. मातृत्व ही स्त्रीत्वाची सर्वांत गूढ आणि गहन अभिव्यक्ती आहे, अशी घटक यांची समजूत असून ती त्यांच्या चित्रपटांमध्ये नदी पद्मा या शाश्वत प्रतीकाशी अगदी घट्टपणे जोडलेली आहे, असेही कामरान यांनी सांगितले.

चिंतन, आदर आणि पुनर्शोध यांनी विणलेले या परिषदेत ऋत्विक घटक यांच्या कलात्मक वारशाला आदरांजली वाहण्यात आली तसेच कामरान यांच्या सखोल संशोधित आणि भावपूर्ण कार्याचाही उत्सव साजरा करण्यात आला. 'माँ, उमा, पद्मा' हे पुस्तक भारतीय चित्रपटांवरील चर्चेला अधिक समृद्ध करणारे– सुलभ, सूक्ष्म उत्कटतेने प्रेरित ठरेल अशी आशा व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment