इफ्फीमध्ये प्रादेशिक सिनेमांचे वैविध्य आणि समृद्धीचा सोहळा
इफ्फीमध्ये प्रादेशिक सिनेमांचे वैविध्य आणि समृद्धीचा सोहळा
(अशोक रा. शिंदे यांजकडून)
56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतातील प्रादेशिक सिनेमांचा एक समृद्ध संग्रह प्रदर्शित केला जात आहे. त्यांपैकीच 'पिरन्थानाळ वाळ्थुकळ' (तमिळ) आणि 'दृश्य अदृश्य' (मराठी) या दोन प्रादेशिक चित्रपटांच्या चमूने आज माध्यमांशी संवाद साधला.
दिग्दर्शक राजू चंद्रा यांनी 'पिरन्थानाळ वाळ्थुकळ' (Piranthanaal Vazhthukal) या तमिळ चित्रपटाच्या निर्मितीचा रंजक अनुभव सांगितला. स्थानिक सांस्कृतिक परंपरांमध्ये रुजलेल्या चित्रपटांना, केवळ त्यांच्या स्वतःच्याच समुदायांकडून नाही, तर इतर सांस्कृतिक घटकांकडूनही प्रोत्साहन मिळणे गरजेचे असते ही बाब त्यांनी अधोरेखित केली. सांस्कृतिक स्वीकारार्हता, चित्रपटाप्रती समर्पण आणि सांघिक कार्य ही यशस्वी प्रादेशिक चित्रपटाची गुरुकिल्ली आहे असे त्यांनी सांगितले. या चित्रपटाचे मुख्य अभिनेता अप्पुकुट्टी यांनीही यावेळी माध्यमांशी संवाद साधला.
दिग्दर्शक मिलिंद लेले यांनी 'दृश्य अदृश्य' या आपल्या मराठी चित्रपटाबद्दल सांगितले. हा उत्कंठावर्धक थरारपट आपण केवळ 8 ते 10 सदस्यांच्या छोट्या चमूसह एका निर्जन रिसॉर्टवर चित्रित केला असल्याची माहिती त्यांनी दिली. मर्यादित संसाधने असूनही, चित्रपटाच्या चमूतील प्रत्येक सदस्याने समर्पण भावनेने योगदान दिले, त्यामुळेच हा चित्रपट पूर्ण करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
हा चित्रपट जानेवारीमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज असल्याची माहितीही लेले यांनी दिली. एकीकडे मोठ्या बॅनरखालील चित्रपट प्रदर्शित होत असताना, त्यांच्या समोर हा कमी बजेटचा चित्रपट कसा तग धरू शकेल असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी लेले यांना विचारला. त्यावर प्रत्येक चित्रपटाची स्वतःची एक कुंडली असते. शेवटी, प्रेक्षकच चित्रपटाची वाटचाल कशी होईल हे ठरवतात. कथा, दिग्दर्शन आणि अभिनय दमदार असेल तर, प्रादेशिक चित्रपटही अद्वितीय कामगिरी करू शकतात, हे सर्व सांघिक कार्यावर अवलंबून असते. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मोठ्या बॅनरच्या चित्रपटांच्या गर्दीत आता प्रादेशिक सिनेमा केवळ चांगला असून चालणार नाही, तर तो खूप चांगला असणे आवश्यक आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले. प्रादेशिक सिनेमातून, तिथल्या लोकांमधील आणि परंपरांमधील खरे सांस्कृतिक सार समजून घेता येते ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
चित्रपटांचे सारांश :
दृश्य अदृश्य
'दृश्य अदृश्य' चित्रपटातील उत्कंठावर्धक कथानक एका निर्जन परंतु रहस्यमय सहलीच्या ठिकाणाच्या पार्श्वभूमीवर घडते. एका लहान मुलगी अचानक गायब होते, आणि त्यातून अनेक अस्वस्थ करणाऱ्या घटनांना जन्म घेतात अशी या चित्रपटाची मांडणी आहे. हा चित्रपट मानवी भावना, सामाजिक गुंतागुंत आणि आपल्या जगण्यावर प्रभाव टाकणाऱ्या दृश्य आणि अदृश्य शक्तींचा खोलवर माग घेण्याचा प्रयत्न करतो. मुलीचे कुटुंब, स्थानिक अधिकारी आणि आसपासचे लोक यांच्या दृष्टिकोनातून हे कथानक उलगडते, त्यापैकी प्रत्येकजण भीती, अनिश्चितता आणि लपलेले सत्य याच्याशी झगडत असतो. जसजसा तणाव वाढत जातो आणि रहस्ये उघड होतात, तसतशी ही कथा श्रद्धा, भीती आणि वास्तवाचा एक शक्तिशाली शोध म्हणून समोर येते. या चित्रपटात भावनात्मक उत्कटतेसह वास्तवाचा मिलाफ घडवून आणत, अदृश्य मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक शक्ती मानवी कृती आणि निर्णयांना कशा प्रकारे चालना देतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
पिरन्थानाळ वाळ्थुकळ (तमिळ)
हा चित्रपट म्हणजे गावातील तरुणांच्या गटाचे नेतृत्व करणाऱ्या आणि तो खूप दारू पिणाऱ्या, धूम्रपान करणाऱ्या अनपु (अप्पुकुट्टी) याची कहाणी आहे. त्याची पत्नी, मित्र आणि गावकरी त्याच्या या जीवनशैलीला विरोध करत असतात आणि त्याने अति मद्यपान करणे थांबवावे यासाठी प्रयत्न करत असतात. त्याची पत्नी गर्भवती असून ती लवकरच बाळाला जन्म देणार असते. अनपुचा असा विश्वास असतो की, दारू हेच जीवनातील आनंदाचे एकमेव साधन आहे. तो परिणामांची पर्वा न करता, आपल्या इच्छेनुसार बेजबाबदारपणे जगतो. एक दिवस, त्याचे आयुष्य अनपेक्षित वळण घेते आणि त्याला समाज आपल्याला कसे पाहतो, त्याच्या सामाजिक जबाबदाऱ्या काय आणि जीवनाचे मूल्य काय याची जाणिव त्याला होते. राष्ट्रीय पुरस्कार वि
Comments
Post a Comment