चित्रनगरीत शूट अ शॉर्ट' कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

 चित्रनगरीत शूट अ शॉर्ट' कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न 



महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने  आयोजित केलेली शूट अ शॉर्ट' ही लघुपट निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. 

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ज्येष्ठ चित्रपट समीक्षक समर नखाते आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. 

या कार्यशाळेत केवळ मुंबईतीलच नव्हे तर अकोला, पुणे, नागपूर आणि अमरावतीसारख्या दूरवरच्या जिल्ह्यातील ५० चित्रपटप्रेमींनी सहभाग घेतला. यामध्ये तरुणांसह जेष्ठांचाही विशेष सहभाग होता. 

चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित कार्यशाळा आयोजनाचा चित्रनगरीचा हा पहिलाच प्रयत्न तुफान यशस्वी ठरला असून कार्यशाळेची सांगता करताना भविष्यात अधिकाधिक तांत्रिक कौशल्याधारित उपक्रम राबविण्याचा महामंडळाचा मानस असल्याचे महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रशांत साजणीकर यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM