महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आयोजित "चित्रपट अभिनय अभ्यासक्रम'' संपन्न

 महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आयोजित "चित्रपट अभिनय अभ्यासक्रम'' संपन्न



 महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एफटीआयआय पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला 'चित्रपट अभिनय अभ्यासक्रम' ही कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना 'अभिनय म्हणजे नेमके काय ?','संहिता लेखन','लघुपट' कसा तयार केला जातो अशा विविध विषयांवर अभिनेते डॉ. मिलिंद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एफटीआयआय पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा १० फेब्रुवारी पासून ते १९ फेब्रुवारी या कालावधीत पार पडली.  या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अभिनयासह संवाद कौशल्य, संहिता लेखन, लघुपट कसा तयार केला जातो याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. 

नाटक, सिनेमा, मालिका याची संहिता हाती आल्यानंतर तिचा कसा विचार करायला हवा, ती कशी समजून घ्यायला हवी याबद्दल विद्यार्थ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. तसेच कथा लेखन, सहिंता लेखन कसे करावे याचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले. यातून विद्यार्थ्यांनी स्वतःहून काही संकल्पना मांडून गटागटाने संहिता लेखन केले. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या संहितांपैकी 'ती स्टेशनवर का नाचली'  या सहिंतेवर विद्यार्थ्यांचा अभिनय आणि चित्रीकरणाचा सराव घेण्यात आला.चित्रीकरण केलेले विद्यार्थ्यांचे सादरीकरण हे एडिट करून त्याचा छोटा लघुपट तयार करण्यात आला. तो लघुपट पाहताना डॉ. मिलिंद शिंदे यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. त्यातील उणिवा, बदल आणि सादरीकरण अजून प्रभावी करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गर्शन केले. तसेच हिंदी आणि मराठी भाषेतील उतारा वेगवेगळ्या भावनांमध्ये कसा सादर करु शकतो याविषयी देखील विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. दहा दिवस पार पडलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध गोष्टींचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्या उपस्थितीत चित्रपट अभिनय अभ्यासक्रम या कार्यशाळेचा समारोप झाला. यावेळी प्रशांत साजणीकर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. तर, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून संयोगिता चौहान आणि बहार सूर्यवंशी यांनी या कार्यशाळेबाबत आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर, विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs