भारतीय शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ अॅप 'मित्रों'वर एका महिन्यात ९ अब्ज व्हिडीओची नोंद
भारतीय शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ अॅप 'मित्रों'वर एका महिन्यात ९ अब्ज व्हिडीओची नोंद ~ गूगल प्ले स्टोअरवरून ३३ दशलक्ष यूझर्सनी केले अॅप डाऊनलोड ~ मुंबई, ३१ जुलै २०२०: सरकारने चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर एक महिन्यातच मित्रों या शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ अॅपने त्याच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड प्रमाणात प्रेक्षकसंख्या मिळवली. जवळपास ९ अब्ज व्हिडिओ एका महिन्यात पाहिले गेले असून गूगल प्ले स्टोअरवर ३३ दशलक्ष यूझर्सनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. एप्रिल २०२० मध्ये शिवांक अग्रवाल आणि अनिश खंडेलवाल यांनी एकत्रितरित्या लाँच केलेले मित्रों हे अॅप सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरले आहे. हलक्या-फुलक्या विनोदांचा धागा पकडत लोकांनी त्यांचे नावीन्यपूर्ण व्हिडिओ ऑनलाइन टाकावेत, जेणेकरून लोकांची डिजिटल गुंतवणूक आणि मनोरंजनाची नव्याने कल्पना केली जाईल, हाच या शॉर्ट फॉर्म व्हिडिओ अॅपच्या स्थापनेमागील उद्देश आहे. मित्रोंचे संस्थापक आणि सीईओ शिवांक अग्रवाल म्हणाले, 'यूझर्सना विविध प्रकारचे शॉर्ट व्हिडिओ पाहणे आणि अपलोड करण्यासाठीचा प्लॅटफॉर्म प्रदान करणे ही संकल्पना अॅप विकसित करण्यामागे होती. अगदी थोड्या ...