वाढत्या वयातील मुलांना क जीवनसत्त्वाची आवश्यकता का असते?
वाढत्या वयातील मुलांना क जीवनसत्त्वाची आवश्यकता का असते ? लेखक : डॉ . नवीन प्रकाश गुप्ता , वरिष्ठ नवजातरोगतज्ञ आणि बालरोगतज्ञ , मधुकर रेन्बो चिल्ड्रन्स हॉस्पिटल , दिल्ली लहान मुलांच्या जीवनशैलीमध्ये प्रचंड बदल झाला आहे . याआधीच्या पिढ्या आजच्या तुलनेत नियमितपणे मैदानी खेळांमध्ये अधिक प्रमाणात व्यस्त असत . मात्र जागेच्या आणि वेळेच्या कमतरतेमुळे आजकालच्या मुलांच्या आयुष्यामध्ये मैदानी खेळ खेळणे अवघड झाले आहे . सध्याच्या परिस्थितीत मुलांना बाहेरच पडणे शक्य होत नसल्यामुळे ही परिस्थिती अधिकच बिघडली आहे . ऑनलाइन शिक्षण आणि मनोरंजनामुळे स्क्रीनकडे पाहण्याचा वेळ वाढला आहे . त्यामुळे रोगप्रतिकारक्षमतेवर परिणाम होतो . तुमच्या मुलांमध्ये क जीवनसत्त्वाचे प्रमाण योग्य असणार नाही , खासकरून जेव्हा ते त्यांचा आहार योग्य प्रमाणात घेणार नाहीत . असेच सुरू राहिल्याने त्यांची रोगप्रतिकारक्षमता कमकुवत होते आणि त्यांना भविष्यात विविध रोग होण्याची शक्यता असू शकेल . ते आजारी पडू शकतात किंवा...