भारतामध्ये स्किल्स एसजी वेन्चर्स ऑफ़ सिंगापोरसह पहिल्यांदाच ऑडीसंकरा द्वारे “प्रॅकडेमिक्स” ची सुरवात
भार तामध्ये स्किल्स एसजी वेन्चर्स ऑफ़ सिंगापोरसह पहिल्यांदाच ऑडीसंकरा द्वारे “प्रॅकडेमिक्स” ची सुरवात ऑडीसंकरा समूह स्किल्स एसजी वेन्चर्स सह एका अभूतपुर्व अशा भागीदारीमध्ये सहभागी होणार आहे, ज्याच्या अंतर्गत मुंबई , १९ डिसेंबर २०१९: चेन्नई येथे मुख्यालय असलेले ऑडीसंकरा , हे दक्षिण भारतात आपली व्याप्ती वाढवित असतानाच , स्किल्स एसजी वेन्चर्स नामक सिंगापोरमधील एका कंपनीसह आंध्रप्रदेशामध्ये एका बहु-क्षेत्रीय कौशल्य विकास भागीदारीमध्ये सामील होणार आहे. याबद्दलचा समझोता करार हा डॉ. पेन्चलैआ वेन्की , ऑडिसंकरा संस्थेच्या समूहाचे अध्यक्ष आणि श्री. डेविड क्वी , स्किल्स एसजी वेन्चर्सचे अध्यक्ष यांच्यामध्ये केला गेला (छायाचित्र जोडावे). २१ व्या शतकातील शिक्षण आणि प्रायोगिक शिक्षणाच्या कौशल्यास प्रोत्साहन देत निपुण आणि गतीमान असे कार्यबल निर्माण करत ४ थ्या औद्योगिक क्रांतीच्या गरजा पूर्ण केल्या जातील. भारतामध्ये पदवीधरांची संख्या वाढत असताना देखील ४७ दशलक्ष कुशल कामगारांची कमतरता येत्या ५ वर्षात जाणविणार आहे...