औद्योगिक वापर पाणी दरवाढ उद्योगास मारक - संतोष मंडलेचा
औद्योगिक वापर पाणी दरवाढ उद्योगास मारक - संतोष मंडलेचा ( अध्यक्ष , महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स , इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रिकल्चर ) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा आदेश क्रमांक 1/2018 नुसार औद्योगिक वापर पाणी दरवाढ होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने उद्योगांना न परवडणारे होतील व ते उद्योगास मारक ठरतील त्यामुळे याबाबत शासनाने त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी ना. उद्योगमंत्री श्री. सुभाषजी देसाई यांच्याकडे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स , इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रिकल्चरने पत्राद्वारे केली आहे. औद्योगिक विकासासाठी परवडेल अशा दरामध्ये पाणी आणि वीज मिळणे महत्वाचे असते. महाराष्ट्र राज्यामध्ये औद्योगिक वापराच्या वीजेचे दर सर्वाधिक आहेत. आता पाण्याचे दरही न परवडणारे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण म्हणजे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा आदेश क्रमांक 1/2018 हा आहे. सदरहू प्राधिकरण पाण्याच्या घाऊक वापराचे दर प्रत्येकी तीन वर्षांसाठी निश्चित करत असते. नुकतेच या प्राधिकरणाने असे दर निश्चित केले असून ते 1 फेब्रुवारी 2018 पासून लागू झाले आहेत. सर्वसाधारणरित्या पाण्या...