मारुती सुझुकीतर्फे सणासुदीच्या दिवसात मिनी SUV S-PRESSO सादर
मारुती सुझुकीतर्फे सणासुदीच्या दिवसात मिनी SUV S-PRESSO सादर डिझाइन - ' मेक इन इंडिया ' चे उत्तम उदाहरण असलेल्या S-PRESSO च्या दणकट SUV वैशिष्ट्यांमुळे तरुणांना आकर्षित करण्याची क्षमता सुरक्षितता - सुझुकीच्या पाचव्या जनरेशनच्या HEARTECT व्यासपीठावर बनवलेल्या S-PRESSO मध्ये दणकटपणा , कणखरपणा आणि सुरक्षितता आणि 10 हून अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये तंत्रज्ञान : BS 6 समर्थित 1.0 ली . K10 इंजिनची 21.7 किमी / ली अशी इंधन क्षमता स्मार्टप्ले स्टुडिओ इन्फोटेनमेंट सिस्टम Mumbai , 30 सप्टेंबर 2019 : मारुती सुझुकीने आज त्यांची बहुप्रतिक्षित मिनि -SUV S-PRESSO सादर केली . S-PRESSO ची रचना आणि संकल्पना पुर्णपणे भारतातच भारत आणि संपूर्ण जगासाठी करण्यात आली आहे . आपल्या दमदार आणि आकर्षक SUV रुपामुळे ही गाडी उठून दिसते . 5 व्या जनरेशनच्या HEARTECT व्यासपीठावर तयार करण्यात आलेल्या या गाडीत अधिक दणकट , सुरक्षित आणि स्थिर बांधणीसाठी 40 टक्के हाय टेन्साइल स्टीलचा वापर करण्यात आला आहे . देशभरातील व्यापक एरेना रीटेल नेटवर्कच्या म