Posts

Showing posts from February, 2020

राष्ट्रीय विज्ञान दिनी सरकारी शालेय विद्यार्थ्यांनी घडवून आणलेल्‍या तांत्रिक नाविन्‍यता अन्य ३,००० मुलांना देणार प्रेरणा

Image
राष्ट्रीय  विज्ञान दिनी सरकारी  शालेय  विद्यार्थ्यांनी  घडवून आणलेल्‍या तांत्रिक नाविन्‍यता अन्य ३ , ०००  मुलांना देणार प्रेरणा मुंबई  महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी नवीन युगातील तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या प्रकल्पांचे दर्शन घडवणारी  " हाय  टेक एक्स्प्रेस फॉर यंग अडोलेस ंट्स "  शाळा - शाळांमध्ये  फिरणार मुंबई ,  २८  जानेवारी २०२० :  दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी भारतभरात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो .  भारतातील भौतिकशास्त्रज्ञ डॉ .  सी .  व्ही .  रमण यांनी १९२८ मध्ये शोधून काढलेल्या  ‘ रमण प्रभावा ’ ची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो .  हे थोर शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेला हा गेल्या सहस्रकातील महत्त्वाच्या संशोधनांमध्ये गणला जाणारा शोध यांपासून प्रेरणा , घेऊन  सलाम बॉम्बे फाउंडेशनने मासून या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने शुक्रवारी   “ हाय  टेक एक्स्प्रेस ” ला   कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री श्री नवाब मलिक यांच्या हस्ते हिरवा झेंडा  दाखवला . वर्ष २०२० सुरू झाले आणि जगाने अल्ट्रासोनिक संवेदक - सक्षम ग्लोव्ह्जचा शोध लावला .  हे ग्लोव्ह्ज अंध लोक

पाच वर्षा पूर्वी लिहिलेले गीत "तुम जो मिले" आता जाऊन सादर केले आहे : सूर्यवीर

Image
पाच वर्षा पूर्वी लिहिलेले गीत "तुम जो मिले" आता जाऊन सादर केले आहे : सूर्यवीर       २०२० हे काही सुंदर आणि मधुर रोमँटिक गाण्यांनी भरलेले वर्ष आहे, आणि त्यामध्ये सूर्यवीरने आपले नवीन रोमँटिक गीत "तुम जो मिले" लाँच केले आहे, ह्या गाण्यामधील सूर्यवीरचे मधुर आवाज आणि त्या मागची सुंदर कथा तुम्हाला नक्कीच मोहित करणार. "तुम जो मिले" आता परेंत चाहत्यांच्या प्लेलिस्ट मध्ये नक्कीच सेव्हड जाले असणार. आपल्या म्युसिक विडिओ बद्दल सांगताना सूर्यवीर म्हणाले, "मी हे गीत ५ वर्षय पूर्वी लिहिला होता, आणि शेवटी ते सादर करत आहे. हे गीत डेटिंग एप "हॅपन" बरोबर मिळून सादर करत आहे, कारण आमची मानसिकता एकमत आहे कि आपल्या आयुष्यात कोण्ही कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्या आयुष्याच्या वाटीत येतात. "तुम जो मिले" हे आपल्या आयुशच्यामध्ये येणारे खास लोकांबद्दल आहे. सूर्यवीरने आधीही आपल्या चाहत्यांसाठी काही मनरुचक गाणी सादर केली आहे ज्या मध्ये त्यांना मिलिअन्स मध्ये व्यूज आहे. शिबानी कश्यप बरोबर त्यांचं गीत "अंखियान उडीक दिया आणि वे में चोरी चोरी” ह्

अँटनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड: ऑफरला 4 मार्च 2020 रोजी सुरुवात आणि शुक्रवार, मार्च 6, 2020 रोजी विक्री बंद होणार

Image
अँटनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड : ऑफरला  4  मार्च  2020 रोजी सुरुवात आणि शुक्रवार , मार्च 6, 2020 रोजी विक्री बंद होणार मुंबई , फेब्रुवारी 28, 2020: अँटनी वेस्ट हँडलिंग सेल लिमिटेड ने (“ कंपनी ”) रोख रकमेसाठी बुधवार , मार्च 4, 2020 रोजी , प्रत्येक 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सची प्रति इक्विटी शेअर 295 रुपये ते इक्विटी शेअर 300 रुपये या किंमतपट्ट्यानुसार प्रारंभी समभाग विक्री ( “ आयपीओ ” ) करायचे ठरवले आहे. यामध्ये 350 दशलक्ष रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा आणि लीड्स (मॉरिशस) लिमिटेडकडून 1,390,322 पर्यंत इक्विटी शेअर्स ; टनब्रिज (मॉरिशस) लिमिटेडकडून 2,085,502 पर्यंत इक्विटी शेअर्स ; केम्ब्रिज (मॉरिशस) लिमिटेडकडून 769,917 पर्यंत इक्विटी शेअर्स ; व गिल्डफोर्ड (मॉरिशस) लिमिटेडकडून 1,454,259 पर्यंत इक्विटी शेअर्स समाविष्ट असणाऱ्या 5,700,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. बिड / ऑफर शुक्रवार , मार्च 6, 2020 रोजी बंद होणार आहे . किमान बोलीचे प्रमाण 50 इक्विटी शेअर्स आहे आणि त्यानंतर 50 इक्विटी शेअर्स च्या

मुलांच्‍या उत्तम आयुष्‍यासाठी त्‍यांच्‍यामधील अध्‍ययन अक्षमतेचे लवकर निदान करणे अत्‍यंत महत्त्‍वाचे

Image
मुलांच्‍या उत्तम आयुष्‍यासाठी त्‍यांच्‍यामधील अध्‍ययन अक्षमतेचे  लवकर निदान करणे अत्‍यंत महत्त्‍वाचे शालेय विद्यार्थ्‍यांमधील अध्‍ययन अक्षमतेची उत्तमप्रकारे करता येणा-या हाताळणीबाबत जागरूकता निर्माण करण्‍यासाकरिता भाटिया हॉस्पिटलकडून शिक्षक ,  समुपदेशक व शिक्षणतज्ञांसाठी प्रमाणपत्र कार्यक्रमाचे आयोजन मुंबई, २८ फेब्रुवारी २०२० :  शालेय विद्यार्थ्‍यांमधील अध्‍ययन अक्षमतेचे (एलडी) प्रमाण जाणून घेण्‍यासाठी भारतात विविध संशोधन करण्‍यात आले आहेत. या संशोधनांमधून विविध राज्‍यांमधील ३ ते १० टक्‍के विद्यार्थ्‍यांमध्‍ये अध्‍ययन अक्षमता असल्‍याचे निदर्शनास आले आहे. भारतातील अध्‍ययन अक्षमता असलेल्‍या शालेय विद्यार्थ्‍यांमध्‍ये अटेन्‍शन डेफिसिट हायपरअॅक्टिव्‍हीटी डिसऑर्डर (एडीएचडी) या आजाराचे प्रमाण ४ ते ४० टक्‍के असल्‍याचे आढळून आले आहे आणि दरवर्षी या प्रमाणामध्‍ये वाढ होत आहे. अध्‍ययन अक्षमता हा सामान्‍य विकार आहे ,  जो शालेय विद्यार्थ्‍यांमधील अध्‍ययनामध्‍ये दिसून येतो. या विकारामुळे ते अभ्‍यासामध्‍ये चांगली प्रगती करत नाहीत. संशोधनातून निदर्शनास आले आहे की ,  मुलांमधील अध्‍ययन

एअरटेल पेमेंट्स बँकने 2,50,000 बँकिंग पॉईंट्समध्ये आधार सक्षम पेमेंट सिस्टम सुरू केली

एअरटेल   पेमेंट्स   बँक ने    2,50 , 000  बँकिंग   पॉईंट्समध्ये आधार   सक्षम   पेमेंट   सिस्टम   सुरू   केली एअरटेल   पेमेंट्स   बँकेने   संपूर्ण   भारतभरातील  2,50 , 000  पेक्षा   जास्त   बँकिंग   पॉईंट्सवर   आधार   सक्षम   पेमेंट   सिस्टम  ( एईपीएस )  सुरू   केली   आहे .  एईपीएस   व   एअरटेल   पेमेंट्स   बँकेचे ग्राहक ,  आधार   लिंक   बँक   खात्यांसह   एईपीएस   सक्षम   बँकेत   आर्थिक   व्यवहार   देखील   करु   शकतात .   एईपीएस   ग्राहकांना   आधार   लिंक   किंवा   व्हर्च्युअल   आयडीचा   वापर   करून   आधार   लिंक   असलेल्या   बँक   खात्यात   प्रवेश   करण्यासाठी   मायक्रो - एटीएमवर   आर्थिक   व्यवहार   करण्यास   अनुमती   देते .  त्यासाठी   ग्राहकाचा   आधार   क्रमांक   आणि   फिंगरप्रिंट   रेकॉर्डशी   जुळले   जरुरी   आहे    तरच   व्यवहार   प्रमाणित   केले   जातील .  एईपीएस   सह ,  एअरटेल   पेमेंट्स   बँक   आपल्या   खातेदारांना   तसेच   इतर   बँकांच्या   ग्राहकांनाही   अनेक   बँकिंग   सेवा   देऊ   शकेल   तसेच   ते   आता पैसे   काढू   शकतील ,  शिल्लक   विषयी   चौकशी   करु   शकतील