Posts

Showing posts from May, 2021

५०० बेड्सची क्षमता असलेले कोव्हिड रुग्णालय स्थापन करण्यासाठी अर्जस स्टीलची अनंतपूर जिल्हा प्रशासनाशी भागीदारी

  ५०० बेड्स ची क्षमता असलेले कोव्हिड रुग्णालय स्थापन करण्यासाठी अर्जस स्टीलची अनंतपूर जिल्हा प्रशासनाशी भागीदारी   स्टीलच्या कारखान्यापासून कोव्हिड आरोग्य सुविधा केंद्रापर्यंत पाइपलाईनच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करणार   मुंबई   31 मे २०२१ : स्पेशालिटी स्टील उत्पादक अर्जस स्टील यांनी अनंतपूर जिल्हा प्रशासनाच्या भागीदारीने आंध्रप्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातील ताडीपत्री येथे ५०० बेड्सची क्षमता असलेले कोव्हिड आरोग्य सेवा रुग्णालय सुरू केले आहे . अर्जस स्टीलने ५०० बेड्सच्या कोव्हिड आरोग्यसेवा रुग्णालयापर्यंत ऑक्सिजन पाइपलाईन टाकली आहे आणि त्यामुळे अखंडित ऑक्सिजन पुरवठ्याची खातरजमा झाली आहे .   या संयुक्त उपक्रमामुळे हॉस्पिटलमध्ये अत्यंत महत्त्वाची गरज असलेल्या ऑक्सिजनची समस्या हाताळण्यात आली आहे . परिणामी , आधीच कमतरता असलेल्या ऑक्सिजन सिलिंडर आणि टँकर यंत्रणेवरील ओझे कमी झाले असून आता हे स्रोत राज्यातील इतर भागांमध्ये उपयोगात आणता येणार आहेत . कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेचा भाग म्हण