Posts

Showing posts from April, 2018

हार्टफूलनेस इन्स्टिट्यूटच्या यशात आणखी एक मानाचा तुरा, १,००० वृक्षांचे पुनर्रोपण व विस्थापन

Image
हार्टफूलनेस  इन्स्टिट्यूटच्या यशात आणखी एक मानाचा तुरा , १ , ०००  वृक्षांचे पुनर्रोपण व विस्थापन तामिळनाडू  येथील करूर जिल्ह्यातील १२० नारळाच्या झाडांचे हैद्राबाद येथील कान्हा शांती वनम येथे नुकतेच यशस्वीरित्या विस्थापन व पुनर्रोपण केले गेले . हैद्राबाद स्थित  हार्टफूलनेस इन्स्टिट्यूट  ( www.heartfulness.org )  या संस्थेने आपल्या यशोगाथेत आणखी एक विक्रम रचला असून संस्थेने केवळ एका वर्षभरात १ , ००० हून अधिक वृक्षांचे पुनर्रोपण व विस्थापन केले आहे .  या उपक्रमांतर्गत ,  तामिळनाडूमधल्या करूर जिल्ह्यातल्या १५ वर्षांपूर्वीच्या १२० नारळाच्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले .  नुकत्याच यशस्वी झालेल्या वृक्षांच्या तुकडीत ६० झाडांचा समावेश करण्यात आला असून हैद्राबाद येथील नवीन परिसरात या झाडांची नव्याने लागवड करण्यात हार्टफूलनेस या संस्थेला यश आले आहे .  केवळ झाडांचे विस्थापन व पुनर्रोपणच नव्हे , तर त्यांची मशागत करणारा हा आगळावेगळा उपक्रम हाती घेणारी ही पहिलीच संस्था ठरली आहे .  प्रत्येक वृक्षाच्या अस्तित्वाच्या कालावधीत विशिष्ट असे फायदे दडलेले असतात .  या वृक्षांचे आयुष्य वाढवून संस्थे

दिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा

Image
दिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लौंच सोहळा आरव प्रॉडक्शन्स निर्मित आणि अभय पाठक प्रॉडक्शन्ससह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लौंच नुकतेच मोठ्या दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. चेतन चावडा आणि सागर पाठक लिखित आणि दिग्दर्शित ‘लग्न मुबारक’ आज समाजामध्ये धर्माचं, जातीपातीचं जे काय राजकारण खेळलं जातं त्यामुळे अनेकांचे नुकसान झालं आहे, काही लोक धर्माचा-जातीचा वैयक्तिक फायद्यासाठी कसा वापर करून घेतात या गोष्टीवर भाष्य करतो. तेरे होठों पे मेरा नाम, जैसे हर मस्जिद में श्रीराम’ आणि ‘जहाँ भी देखू तेरा चेहरा नजर आता है,  जैसे हर मंदिर में अल्लाह बसता है’ अशा हटके शायराना अंदाजातील टीजरमुळे ‘लग्न मुबारक’ची वाढलेली उत्सुकता या ट्रेलर मुळे अधिकच वाढली आहे. या सिनेमामध्ये सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासह अभिनेत्री प्रार्थना बेहरे, संस्कृती बालगुडे, आस्ताद काळे, प्रवीण तरडे, मिलिंद दास्ताने, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, वंदना वाकनीस, अमरनाथ खराडे, पार्थ घाटगे, चेतन चावडा, गौरव रोकडे अशी स्टारकास्ट आहे,

'वाघेऱ्या' गावात वाघाने घातला धुमाकूळ !

Image
'वाघेऱ्या' गावात वाघाने घातला धुमाकूळ ! ' लांडगा आला रे आला '   ही गोष्ट लहानपणी सर्वानीच ऐकली आहे. लांडगा आला म्हणून कुणीतरी खोडी काढायची आणि मग अख्खे गाव जागे व्हायचे, अशी ती गोष्ट होती. या गोष्टीत थोडा फेरबदल केला आणि लांडग्या एवजी गावात 'वाघ' आला तर काय गोंधळ उडेल ! अगदी हाच गोंधळ 'वाघेऱ्या' या आगामी सिनेमातील वेड्यांच्या गावात आपल्याला पाहायला मिळणार आहे.   गौरमा मीडिया अँड  एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवाले निर्मित, तसेच  'बॉईज' सारखा सुपरहिट सिनेमा देणारे  सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची  प्रस्तुती   असलेल्या 'वाघेऱ्या' या आगामी सिनेमाचे नुकतेच ट्रेलर आणि 'उनाड पोरं' या गाण्याचे सादरीकरण करण्यात आले.  संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यामधून 'वाघे-या' नामक गावातील गमतीजमती प्रेक्षकांना दिसून येतात.  गावात 'वाघ' शिरला असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरते. या बातमीम

परदेशी उद्योजकांचे स्वागत करण्यासाठी कोकण सज्ज

परदेशी उद्योजकांचे स्वागत करण्यासाठी कोकण सज्ज कोकण कॉन्क्लेव्हची जोरदार तयारी सुरू ....... कोकण कॉन्क्लेव्हमध्ये जगातील ५० देशांचे उद्योजक सहभागी होणार असून त्यांच्या स्वागतासाठी कोकणवासी सज्ज झाले आहेत. कोकणातील पर्यटन, अन्न आणि अन्न प्रक्रीया उद्योगांना जागतिक व्यापार पटलावर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील ५०० उद्योजक यात सहभागी होणार आहेत. २० मे रोजी मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये कोकण कॉन्क्लेव्हचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. कोकणचे सौंदर्य केरळ पेक्षा तसूभरही कमी नाही. परंतु केरळच्या तुलनेत कोकणात येणा-या पर्यटकांची संख्या खूपच कमी आहे. ही परीस्थिती बदलण्यासाठी जगातील ५० देशांतील उद्योजकांना कोकण कॉन्क्लेव्हच्या निमित्ताने मुंबईत आणण्यात येणार आहे. सहारा स्टार हॉटेलमध्ये होणा-या दोन दिवसांच्या कार्यक्रमात हे उद्योजक विविध विषयांवर आयोजित परीसंवादात सहभागी होतील, तसेच परदेशातून येणा-या उद्योजकांसोबत, भारतातून आलेल्या गुंतवणूकदारांसोबत व्यावसायिक चर्चाही करतील. २१ मे रोजी कोकणातील उद्योजकांसाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. प्रेम जग्यासि यांच्या वर्क

नोव्हो ६५ एचपी आणि ७५ एचपी ट्रॅक्टर्स बाजारात दाखल

Image
नोव्हो ६५ एचपी आणि ७५ एचपी ट्रॅक्टर्स बाजारात दाखल महिंद्रा अॅंड महिंद्रा कंपनीच्या शेतीपूरक यंत्रसामग्री ('फार्म एक्विप्ड सेक्टर' -एफईएस) निर्मिती कंपनीतर्फे 'नोव्हो ६५ एच.पी.' आणि 'नोव्हो ७५ एच.पी.' क्षमतेच्या नवीन ट्रॅक्टर्सची घोषणा करण्यात आली. महिंद्राचे हे नवीन नोव्हो ट्रॅक्टर्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून त्याची रचना स्लायलिश आहे. या ट्रॅक्टर्सची किंमत ६५ एछपी, २ डब्ल्यूडीसाठी ९ लाख ९९ हजार रुपये एवढी असून ७५ एच.पी. ४ डब्ल्यू डी क्षमतेच्या ट्रॅक्टर्ससाठी ग्राहकांना १२ लाख ५० हजार रुपये मोजावे लागणार आहेत. या किंमती 'एक्स महाराष्ट्र' आहेत. भारतामधील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन 'महिंद्रा'ने या 'नोव्हो' ट्रॅक्टर्सची निर्मिती केली आहे. 'ओपन स्टेशन इंजिन' गटामध्ये हा ट्रॅक्टर २ डब्ल्यू डी आणि ४ डब्ल्यू डी श्रेणीमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. 'महिंद्रा रीसर्च व्हॅली'च्या चेन्नई येथील जागतिक संशोधन आणि विकास केंद्रामध्ये या नव्या युगाच्या ट्रॅक्टरची रचना आणि निर्मिती करण्यात आली आहे. देशभरामधील शेतकऱ

बंधन बँकेच्या निव्वळ नफ्यात वाढ

बंधन बँकेच्या निव्वळ नफ्यात चौथ्या तिमाहीत  20.3% म्हणजे 387.9 कोटी रुपयांपर्यंत वाढ ; * 3700 एकूण बँकिंग आउटलेट असलेले भारतातील खासगी बँकांमधील सर्वात मोठे तिसरे वितरण जाळे व 2485 बँकिंग आउटलेट असलेले पूर्व व ईशान्य भारतातील सर्वात मोठे जाळे बंधन बँक लि.च्या संचालक मंडळाने मुंबईमध्ये आज झालेल्या बैठकीत मार्च 31 2018 पर्यंतच्या आर्थिक वर्षातील ऑडिटेड आर्थिक निकालांना मंजुरी दिली. अकाउंट्स बँकेच्या वैधानिक ऑडिटर्सच्या ऑडिटच्या आधीन आहेत.   ठळक वैशिष्ट्ये : Ø   ठेवींमध्ये वार्षिक वाढ 45.8%   Ø   कर्जांमध्ये ( ऑन बुक + ऑफ बुक ) वार्षिक 37.4% वाढ Ø   कासामध्ये वार्षिक 70.1% वाढ Ø   कासा रेश्यो 34.3% Ø   नव्या 2.6 दशलक्ष ग्राहकांचा समावेश ; एकूण ग्राहक वर्ग 13.01 दशलक्ष Ø   एमटीएम नुकसानाबाबत 21.3 कोटी रुपयांचे आरबीआय डिस्पेन्शन घेतलेले नाही Ø   जीएनपीएमध्ये ( ऑन बुक + ऑफ बुक ) आर्थिक वर्ष 18 मधील तिसऱ्या तिमाहीतील 1.59% वरून आर्थिक वर्ष 18 मधील चौथ्या तिमाहीत 1.15% पर्यंत घट Ø   भांडवल पर्याप्तता गुणोत्तर ( सीआरएआर ) 31.5%; टिअर 1 30.3% मार्च