एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल परिषदेमध्ये जैविक/रासायनिक शस्त्ररावर निर्बंध घालण्याची अपील
एमआयटी वर्ल्ड पीस युनिवर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल परिषदेमध्ये जैविक/रासायनिक शस्त्ररावर निर्बंध घालण्याची अपील समस्येचे निराकरण करण्यासाठी युनायटेड नेशन्स आणि पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये कायदेशीर रुपरेषा प्रस्तुत करण्याचा प्रस्ताव जागतिक महत्वाच्या संस्थांचे दृढीकरण्यावर भर देण्यात आला सामाजिक हितासाठी आणि सुरक्षित व दीर्घकालीन भविष्याची शाश्वती देण्यासाठी धोरण निर्माण करण्याच्या दृष्टीने व्रिचारवंतांच्या दृष्टिकोनांचे आणि शिफारशींचे दस्तऐवजीकरण करण्यात आले भारत, जून 2 9 , 2020 - जैविक युध्द आणि जैविक दहशतवाद हा सध्या जगभरासाठी, खासकरुन संपूर्ण जग कोविड-19 महामारीचा सामना करत असताना अतिशय महत्वपूर्ण समस्या म्हणून नावरुपास येत आहे. या विषाणूच्या उगमाबद्दल अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आलेले आहेत, काहींच्या मते जैविक युध्दाचे हे एक मोठे कारण आहे. आपला देश आणि चीन दरम्यान असलेला सीमेसंबंधित तणाव आणि इतर शेजारी राष्ट्रांसोबतच्या अस्थिर संबंधांमुळे दहशतवादाची जोखीम वाढली आहे, यामुळे जैविक/रासायनिक आयुधांच्या जोखमीचे मूल्यांकन करण्याची आता गरज निर्माण...