डॉक्युमेंटरी ‘लिव्हिंग जैनीजम’ने उलगडले जैन धर्माच्या अध्यात्मिकतेमागील विज्ञान
डॉक्युमेंटरी ‘लिव्हिंग जैनीजम’ने उलगडले जैन धर्माच्या अध्यात्मिकतेमागील विज्ञान प्रतिनिधी- जैन धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक आहे. भारतात निर्माण झालेल्या या धर्माची पाळेमुळे गेल्या शेकडो वर्षांत जगाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचली आहेत. 30 ऑगस्ट रोजी, ‘लिव्हिंग जैनीजम’ डॉक्युमेंटरी प्रदर्शित करण्यात आली. त्यामध्ये या धर्माचे मूळ व सध्या जीवन जगण्यासाठी या धर्माचे पालन करणारे आधुनिक अनुयायी याचे दर्शन प्रेक्षकांना घडवण्यात आले आहे. रिद्धिसिद्धी बुलिअन लिमिटेडचे संचालक भवरलाल कोठारी यांनी डॉक्युमेंटरीचे अनावरण केले. हा मुंबईतील द एम्पिरिअल क्लब येथे झाला. राजेंद्र श्रीवास्तव यांची दिग्दर्शित केलेली व पल्स मीडियाने साकारलेली लिव्हिंग जैनीजम ही डॉक्युमेंटरी जगातील या सर्वात जुन्या धर्माचे मूळ, तत्त्वज्ञान, तत्त्वे व शिकवण यांचे चित्रण करते. चाळीस मिनिटांच्या या डॉक्युमेंटरीमध्ये, जैन स्कॉलर्सच्या मुलाखती व संशोधन संकलित केल्या आहेत, भगवान महावीरांची व अगदी सुरुवातीच्या तीर्थंकरांची शिकवण, तसेच दैनंदिन जीवनात जैन धर्माची तत्त्वे अंगीकारणारे आधुनिक, यशस्वी जैनधर्म...