बॅंक ऑफ बडोदाचा पूर्ती अॅग्री सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडशी सामंजस्य करार
बॅंक ऑफ बडोदाचा पूर्ती अॅग्री सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडशी सामंजस्य करार
बँक ऑफ बडोदा या अग्रेसर बँकेने शेतकर्यांना खते, जंतुनाशके, बियाणे यांची किफायतशीर खरेदी करता यावी, यासाठी पूर्ती अॅग्री सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. या करारांतर्गत पूर्तीतर्फे शेतकर्यांना आवश्यक ती उत्पादने पुरवण्यात येणार आहेत. `पूर्ती` हे भारतात ग्रामीण क्रांती घडवून आणण्यासाठीचे ऑनलाईन खरेदी व्यासपीठ असून बँकांतर्फे शेतकर्यांना बियाणे, खते आदी उत्पादनांसाठी कर्ज मंजूर करून घेण्यासाठी आपल्या मल्टी-पार्टी मोबाईल वाणिज्य व्यासपिठाचा या सुविधेंतर्गत वापर करण्यात येतो. डिलीव्हरी एजण्ट्सच्या रुपात ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
हा करार संमत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या समारंभाचे अध्यक्षपद बँक ऑफ बडोदाच्या ग्रामीण व कृषी बँकिंग आणि सीएसआर विभागाचे प्रमुख श्री. जी. बी. भूयन यांनी भूषवले असून पूर्ती अॅग्री सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी श्री. एन. बालसुब्रमण्यम उपस्थित होते.
या प्रसंगी बँक ऑफ बडोदाच्या ग्रामीण व कृषी बँकिंग आणि सीएसआर विभागाचे प्रमुख श्री. जी. बी. भूयन म्हणाले, ``बँकेच्या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकर्यांना आवश्यक असलेली उत्पादने किफायतशीर किंमतीत खरेदी करता यावीत व त्यांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, यासाठी आम्ही पूर्ती अॅग्री सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. बँक ऑफ बडोदा या भारतातील लोकप्रिय बँकांपैकी अग्रेसर बँकेचे पूर्ती अॅग्री सर्व्हिसेस प्रा. लि.शी जुळलेले नाते शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरणार असून त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होणार आहे.``
Comments
Post a Comment