फ्रोनियस इंडियाचे वार्षिक व्यापार दोन वर्षात दुपटीने ढवण्याचे ध्येय
फ्रोनियस इंडियाचे वार्षिक व्यापार दोन वर्षात दुपटीने ढवण्याचे ध्येय
फ्रोनियस इंडिया या सोलर पीव्ही स्ट्रींग इन्व्हर्टर, वेल्डिंग उपकरणे आणि बॅटरी चार्जिंग यंत्रणा पुरवणाऱ्या भारतातल्या अग्रेसर कंपनीने वित्तवर्ष २०१९ पर्यंत आपल्या वार्षिक व्यापारात दुपटीने वाढ करण्याचे ध्येय बाळगले आहे. २०१३ साली भारतीय बाजारपेठेत प्रवेश केलेल्या या कंपनीची नफात्मक वृद्धी गेल्या काही वर्षांत झपाट्याने झाल्याचे दिसून आले आहे. येत्या दोन वर्षांत हे आव्हानात्मक ध्येय गाठण्यासाठी, भारताच्या पूर्व व मध्य बाजारपेठांमध्ये असलेली व्यापारसंधी हेरून या बाजारपेठांमध्ये आपल्या सोलर इन्व्हर्टर व्यापाराची व्याप्ती वाढवण्याचा कंपनीचा विचार आहे.
बाजारपेठेतील समभागात लक्षणीय वाढ करण्याच्या आपल्या ध्येयाबाबत बोलताना फ्रोनियस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. व्ही. व्ही. कामथ म्हणाले, ‘‘सौरऊर्जेशी निगडीत उद्योगक्षेत्रे ज्या झपाट्याने फोफावत चालली आहेत, त्यावरून २०१९ पर्यंत आम्हाला चांगलाच नफा मिळण्याची लक्षणे दिसून येत आहेत. सध्या बाजारपेठेत आमचा ५.२ टक्के समभाग असून येत्या दोन वर्षांत ही टक्केवारी २० टक्क्यांपर्यंत पोहोचणे आम्हाला अपेक्षित आहे.
फ्रोनियस इंडिया ही कंपनी सध्या उत्पादन क्षेत्र, ऑटोमोटिव्ह, हॉस्पिटॅलि टी क्षेत्रे, सरकारी कार्यालये, शिक्षणसंस्था आणि औद्योगिक कंपन्या आदी क्षेत्रांत सोलार उत्पादने पुरवते. या कंपनीने आजवर पुणे, कोल्हापूर, नाशिक, बंगळुरू, हैद्राबाद, नवी दिल्ली, रांची या शहरांत १०० मेगा वॅटच्या सोलार इन्स्टॉलेशनचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. फ्रोनियसचे सोलर इन्व्हर्टर्स जागतिक दर्जाचे असून यांना २० वर्षांची वॉरंटी देण्यात येते. भारतातील सौरऊर्जा क्षेत्र हे आता अत्यंत झपाट्याने वाढत चालले असून २०२२ पर्यंत १०० गिगा वॅट्स सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे सरकारचे ध्येय आहे.
Comments
Post a Comment